23एप्रिल 2017 रोजी टिटवाळा येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पोर्टेबल कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.या अविस्मरणीय प्रसंगाची काही क्षणचित्रे......💐💐💐
Monday, April 22, 2024
Wednesday, April 3, 2024
आम्हाला शिकवू द्या....लक्षवेधी धरणे आंदोलन
प्रति,
मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री.गिरीश महाजन साहेब,
ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री.दिपक केसरकर साहेब,
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.श्री.रणजितसिंग देओल साहेब, (भा.प्र.से)
प्रधान सचिव
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , महाराष्ट्र राज्य.
मा.राजेशकुमार साहेब(भा.प्र.से)
प्रधान सचिव ग्रामविकास विभाग
महाराष्ट्र राज्य.
विषयः"आम्हाला शिकवू द्या"या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी"लक्षवेधी धरणे आंदोलन"
मा.महोदय,
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही प्राथमिक शिक्षकांची सर्वात जुनी शिक्षक संघटना असून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक संघटना आहे.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही देशभरात जवळपास २४ राज्यात काम करणारी प्राथमिक शिक्षकांची संघटना असून शिक्षकांच्या हक्का बरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी काम करते.संघटनेविषयी अधिक माहिती www.aiptfindia.org या संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ उपोषण, मोर्चे , धरणेआंदोलन तसेच निवेदन आदिच्या माध्यमातून शासनांचे लक्ष वेधत आहे.
शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शिक्षकांना शिकविण्याच्या कामांसाठी वेळ कमी मिळत असून शाळाबाह्य कामात शिक्षकांना अधिक वेळ जात आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे."आम्हाला शिकवू द्या " या प्रमुख मागणीसह शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याप्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक स़ंघ जिल्हा शाखा-............आपणांकडे विनंती करत आहे.शिक्षकांना न्याय मिळावा ही विनंती.
*⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड -२ प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे कमी करावी.
६) शिक्षकांची जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
७) ९ सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी.
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६) शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे.
तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.
आपले विश्वासू,
अध्यक्ष सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ , जिल्हा शाखा -सातारा
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...
, *@संघशक्ती युगे युगे!!*
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या विवध प्रश्नांसाठी व न्यायसंगत मागण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.देशभरातील २४ राज्यात हे आंदोलन विविधस्तरावर संपन्न होत आहे .या आंदोलनाचे साक्षीदार बनूया.*
*शिक्षकांना आचार्यापासून आचारी बनवणारी व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांपासून दूर नेवून अशैक्षणिक कामात गुंतवणारी प्रशासकीय यंत्रणेला आता आम्हाला एकच मागणी करायची "आम्हाला शिकवू द्या"*
*शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आम्ही कटीबद्ध असू, परंतू आम्हाला आपली साथ हवी. विविध टप्प्यावर होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी व्हावे ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची विनंती..🙏🏻*
*१०० वर्षापेक्षा जास्त इतिहास असणारी अखिल महाराष्ट्र. प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आहे. त्यानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना ७ जानेवारी १९५४ साली याच महाराष्ट्राच्या भूमीत झाली. या देशस्तरावरील संघटनेशी फक्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव महाराष्ट्रातील शिक्षक संघटना संलग्न आहे. स्व.दादासाहेब दोंदे यांनी देशभरातील शिक्षकांना एकत्र करुन शिक्षकांच्या आत्मसन्मना साठी पहिला लढा दिला. गुरुजींचा १५ रु.पगार ३० रू.झाला. स्व.अरुण दोंदे यांनी दिल्ली येथील शिक्षक संघाच्या अधिवेशनात फक्त शिक्षकांसाठी चटोपाध्याय आयोग लागू करुन घेतला.शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, कुटुंब निवृत्ती वेतन अशा कितीतरी बाबी संघाच्या एकजुटीने शिक्षकांना मिळाल्या.*
*आपल्या असंघटित पणाचा फायदा घेवून भुतकाळात लढ्याने मिळालेल्या सुविधा शासन हिरावून घेतंय. जुनी पेन्शन गेलीय,शिक्षक शिक्षणसेवक झाला आहे.आता काहींची वक्रदृष्टी आपल्या वेतनावर आहे.शासकीय शाळांच्या खाजगीकरणाचा हा डाव आहे.विद्यार्थी गुणवत्तेसाठी आपण कटीबद्ध असू पण 'आम्हाला शिकवू द्या' ही शासन प्रशासनाला निक्षून सांगण्याची ही वेळ आहे.*
*"लोग कहते है, आंदोलन, प्रदर्शन, और जुलूस निकालनेसे क्या होता है....??*
*इससे ये सिद्ध होता है की, हम जीवीत है, अटल है और मैदान से हटे नही है!* प्रेमचंद
*शिक्षकांना समाजात आजही मानाचे स्थान आहे.कोट्यावधी रूपयांचा लोकसहभाग समाजाकडून जमा करून शाळेच्या भौतिक सुविधा शिक्षकांनी पुर्ण केल्या आहेत.हे त्याचे द्योतक आहे.याविषयी कधी कोणत्याही लोकप्रतिनिधीनी कौतुकांची थाप शिक्षकांच्या पाठीवर टाकली नाही.तर शिक्षकांविषयी द्वेषभावना पसरवण्याचे पातक काही मंडळी करतांना दिसत आहेत. असं म्हटलं जातं "एका पिढीने दुस-या पिढीकडे सुसंस्कृतीचा वारसा संक्रमित करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय." शिक्षकांचा द्वेष करण्याचा वारसा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पुढील पिढीला देणार आहात का???*
त्यामुळे आपल्या संघटीत प्रयत्नातून शिक्षण व्यवस्थेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच बालकांच्या व शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सज्ज होऊ या!!
*⏺️आंदोलन कार्यक्रम⏺️*
*१) स्वाक्षरी मोहीम ः दि३१ आँगस्ट पर्यत ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली .व यानंतर ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , व राज्याच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .*
टप्पा -२
*२)२४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालययेथे एकदिवशीय थरणे आंदोलन.*
टप्पा ३
*३) राज्यस्तरावर धरणे आंदोलन ः.माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य स्तरावर एकदिवशीय धरणे आंदोलन*
टप्पा-४
*४) राष्ट्रव्यापी आंदोलनः जानेवारी २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे जंतरमंतर येथे धरणे आंदोलन.*
*⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड - प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे कमी करावी.
६) ९ सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
७) शिक्षक जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी.
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६)सर्व मुलांना शालेय गणवेश देण्यात यावा.
१७) राज्य पातळीवरून शिक्षणाचे धोरण ठरवावे. जिल्हा किंवा तालुका पातळीवर कोणतेही समांतर कार्यक्रम/ उपक्रम राबवले जाऊ नयेत.तसेच शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची संख्या मर्यादित असावी.
१८) नक्षलग्रस्त आणि आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता आणि एकस्तरीय वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा .
१९)नगरपालिका ,महानगर पालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान हे शासनाकडून नियमितपणे देण्यात यावे .
२०)शाळांसाठी मोफत इंटरनेट सुविधा, वीजबील, पाणी पट्टी इ.साठी निधी उपलब्ध करुन द्यावा.
२१)शालेय स्तरावरील विविध समित्याचे पुनर्गठन करुन शाळास्तरावर फक्त शाळाव्यवस्थापन समितीच असावी.
२२)जिल्हा/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढी देण्यात याव्यात.
२३)वस्ती शाळा शिक्षकांची सेवा 2001 पासून कायम धरून तेव्हा पासूनचे वस्तीशाळा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वित्तीय लाभ मिळावेत.
२४) प्राथमिक शिक्षकांनी धारण केलेल्या उच्च अर्हता उदा : पीएचडी , एम एड ,एम ए ( एज्यूकेशन ) साठी शिक्षण सेवा वर्ग -१, वर्ग - २ मध्ये किंवा अन्य पदांवर पदोन्नती व मर्यादित विभागीय परीक्षा अथवा सरळ सेवा परीक्षेद्वारा पात्र होण्यासाठी कालबाह्य झालेला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम -१९६७ तसेच शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्याही सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात करावी .
२५) शाळांना मिळणारे अनुदानासाठी असणाऱ्या बँका या एकच ठेवण्यात याव्यात.कायम बँका बदलण्याचा प्रकार थांबविण्यात यावा .
२६)शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे.
तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.
आपले विश्वासू,
*देविदास बस्वदे कल्याण लवांडे*
*अध्यक्ष सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
Monday, October 10, 2022
: Request for not assigning the duties to the primary teachers as both level officer (BLO) of RTE act -2009, section -27*
🌴🌴🌴🌴🌴
*Education International*
☂️ *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*
( *All India Primary Teachers Fedaration*)
☂️ *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ* *(A.M.P.S.S.)*
☂️ *Subject : Request for not assigning the duties to the primary teachers as both level officer (BLO) of RTE act -2009, section -27*
☂️ *भारत निवडणूक आयोग ,नवी दिल्ली या निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील मा अवर सचिव साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी दूरध्वनीद्वारे समक्ष चर्चा केली आहे .*
☂️ *श्री रामपाल सिंग ,राष्ट्रीय अध्यक्ष , अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांचे दिनांक 3 जानेवारी 2020 चे निवेदन ,श्री राजेंद्र निमसे ,राज्य संघटक ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे प्रत्यक्ष नवी दिल्ली येथील कार्यालयातील 25 फेब्रुवारी 2020 चे निवेदन व डॉ .सुजय राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार ,भारत सरकार - नवी दिल्ली यांचे दिनांक 2 फेब्रुवारी 2021 चे शिफारस पत्र : यास अनुसरून मा . अवर सचिव ,भारत निवडणूक आयोग , नवी दिल्ली यांच्याशी दूरध्वनीद्वारा सविस्तर चर्चा करण्यात आली . मा . अवरसचिव ,नवी दिल्ली यांनी संघटनेने यापूर्वी दिलेली सर्व निवेदने ही पुनश्च नवीन निवेदनासह व संबंधित संदर्भपत्रे नवी दिल्ली येथील कार्यालयात पुनश्च सादर करण्याबाबत सांगण्यात आले असून लवकरच BLO या विषयाबाबत उच्चस्तरीय पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासित केले आहे*
☂️ *लवकरच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जानेवारी / फेब्रुवारी 2023 मध्ये राष्ट्रीय पातळीवर आंदोलन हे नवी दिल्ली येथे होणार असल्यामुळे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे व राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संघाचे प्रतिनिधी मंडळ थेट भारत निवडणूक आयोगाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयास प्रत्यक्ष भेट देणार असून बीएलओ या विषयाबाबत काय कार्यवाही झाली याबाबत संपूर्णपणे माहिती घेतली जाणार आहे. तसेच हे दि : 19 ऑक्टोबर 2022 चे निवेदन भारत निवडणूक आयोग ,नवी दिल्ली यांना प्राप्त झाल्यानंतर भारत निवडणूक आयोग ,नवी दिल्ली येथील कार्यालयाशी सतत संपर्क साधून या विषयाबाबत सतत पाठपुरावा हा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून सुरू राहणार आहे .*
☂️ *BLO या विषयाबाबत आपणास यश हे निश्चितच मिळणार असून लवकरच सर्वच प्राथमिक शिक्षकांची या अशैक्षणिक व किचकट कामातून मुक्तता होणार आहे .*
☂️( *म्हणजेच कदाचित एखाद्या शिक्षकाची BLO हे काम करण्याची इच्छा असली तरीही संबंधित प्राथमिक .शिक्षकाला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे काम करता येणार नाही अशी शक्यता आहे )*
☂️ *याबाबतीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने हे निवेदन भारत निवडणूक आयोग , निर्वाचन सदन ,अशोका रोड, नवी दिल्ली येथे मेलद्वारे व स्पिड पोस्टाने पाठविण्यात आले आहे .*
*आपला विनीत*
( *राजेंद्र निमसे*)
*राज्य संघटक*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
( *ऐक्य मंडळ -अहमदनगर* )
☂️☂️☂️☂️☂️☂️
Thursday, September 15, 2022
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
, *@संघशक्ती युगे युगे!!*
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या विवध प्रश्नांसाठी व न्यायसंगत मागण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.देशभरातील २४ राज्यात हे आंदोलन विविधस्तरावर संपन्न होत आहे .या आंदोलनाचे साक्षीदार बनूया.*
*शिक्षकांना आचार्यापासून आचारी बनवणारी व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांपासून दूर नेवून अशैक्षणिक कामात गुंतवणारी प्रशासकीय यंत्रणेला आता आम्हाला एकच मागणी करायची "आम्हाला शिकवू द्या"*
*शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आम्ही कटीबद्ध असू, परंतू आम्हाला आपली साथ हवी. विविध टप्प्यावर होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी व्हावे ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची विनंती..🙏🏻*
*१०० वर्षापेक्षा जास्त इतिहास असणारी अखिल महाराष्ट्र. प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आहे. त्यानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना ७ जानेवारी १९५४ साली याच महाराष्ट्राच्या भूमीत झाली. या देशस्तरावरील संघटनेशी फक्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव महाराष्ट्रातील शिक्षक संघटना संलग्न आहे. स्व.दादासाहेब दोंदे यांनी देशभरातील शिक्षकांना एकत्र करुन शिक्षकांच्या आत्मसन्मना साठी पहिला लढा दिला. गुरुजींचा १५ रु.पगार ३० रू.झाला. स्व.अरुण दोंदे यांनी दिल्ली येथील शिक्षक संघाच्या अधिवेशनात फक्त शिक्षकांसाठी चटोपाध्याय आयोग लागू करुन घेतला.शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, कुटुंब निवृत्ती वेतन अशा कितीतरी बाबी संघाच्या एकजुटीने शिक्षकांना मिळाल्या.*
*आपल्या असंघटित पणाचा फायदा घेवून भुतकाळात लढ्याने मिळालेल्या सुविधा शासन हिरावून घेतंय. जुनी पेन्शन गेलीय,शिक्षक शिक्षणसेवक झाला आहे.आता काहींची वक्रदृष्टी आपल्या वेतनावर आहे.शासकीय शाळांच्या खाजगीकरणाचा हा डाव आहे.विद्यार्थी गुणवत्तेसाठी आपण कटीबद्ध असू पण 'आम्हाला शिकवू द्या' ही शासन प्रशासनाला निक्षून सांगण्याची ही वेळ आहे.*
*"लोग कहते है, आंदोलन, प्रदर्शन, और जुलूस निकालनेसे क्या होता है....??*
*इससे ये सिद्ध होता है की, हम जीवीत है, अटल है और मैदान से हटे नही है!* प्रेमचंद
*शिक्षकांना समाजात आजही मानाचे स्थान आहे.कोट्यावधी रूपयांचा लोकसहभाग समाजाकडून जमा करून शाळेच्या भौतिक सुविधा शिक्षकांनी पुर्ण केल्या आहेत.हे त्याचे द्योतक आहे.याविषयी कधी कोणत्याही लोकप्रतिनिधीनी कौतुकांची थाप शिक्षकांच्या पाठीवर टाकली नाही.तर शिक्षकांविषयी द्वेषभावना पसरवण्याचे पातक काही मंडळी करतांना दिसत आहेत. असं म्हटलं जातं "एका पिढीने दुस-या पिढीकडे सुसंस्कृतीचा वारसा संक्रमित करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय." शिक्षकांचा द्वेष करण्याचा वारसा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पुढील पिढीला देणार आहात का???*
त्यामुळे आपल्या संघटीत प्रयत्नातून शिक्षण व्यवस्थेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच बालकांच्या व शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सज्ज होऊ या!!
*⏺️आंदोलन कार्यक्रम⏺️*
*१) स्वाक्षरी मोहीम ः दि३१ आँगस्ट पर्यत ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली .व यानंतर ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , व राज्याच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .*
टप्पा -२
*२)२४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालययेथे एकदिवशीय थरणे आंदोलन.*
टप्पा ३
*३) राज्यस्तरावर धरणे आंदोलन ः.माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य स्तरावर एकदिवशीय धरणे आंदोलन*
टप्पा-४
*४) राष्ट्रव्यापी आंदोलनः जानेवारी २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे जंतरमंतर येथे धरणे आंदोलन.*
*⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड - प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे कमी करावी.
६) ९ सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
७) शिक्षक जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी.
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६)सर्व मुलांना शालेय गणवेश देण्यात यावा.
१७) राज्य पातळीवरून शिक्षणाचे धोरण ठरवावे. जिल्हा किंवा तालुका पातळीवर कोणतेही समांतर कार्यक्रम/ उपक्रम राबवले जाऊ नयेत.तसेच शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची संख्या मर्यादित असावी.
१८) नक्षलग्रस्त आणि आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता आणि एकस्तरीय वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा .
१९)नगरपालिका ,महानगर पालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान हे शासनाकडून नियमितपणे देण्यात यावे .
२०)शाळांसाठी मोफत इंटरनेट सुविधा, वीजबील, पाणी पट्टी इ.साठी निधी उपलब्ध करुन द्यावा.
२१)शालेय स्तरावरील विविध समित्याचे पुनर्गठन करुन शाळास्तरावर फक्त शाळाव्यवस्थापन समितीच असावी.
२२)जिल्हा/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढी देण्यात याव्यात.
२३)वस्ती शाळा शिक्षकांची सेवा 2001 पासून कायम धरून तेव्हा पासूनचे वस्तीशाळा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वित्तीय लाभ मिळावेत.
२४) प्राथमिक शिक्षकांनी धारण केलेल्या उच्च अर्हता उदा : पीएचडी , एम एड ,एम ए ( एज्यूकेशन ) साठी शिक्षण सेवा वर्ग -१, वर्ग - २ मध्ये किंवा अन्य पदांवर पदोन्नती व मर्यादित विभागीय परीक्षा अथवा सरळ सेवा परीक्षेद्वारा पात्र होण्यासाठी कालबाह्य झालेला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम -१९६७ तसेच शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्याही सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात करावी .
२५) शाळांना मिळणारे अनुदानासाठी असणाऱ्या बँका या एकच ठेवण्यात याव्यात.कायम बँका बदलण्याचा प्रकार थांबविण्यात यावा .
२६)शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे.
तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.
आपले विश्वासू,
*देविदास बस्वदे कल्याण लवांडे*
*अध्यक्ष सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
Saturday, September 3, 2022
निश्चयाचे महामेरू
* *निश्चयाचे महामेरू शंकरराव विठ्ठल भुजबळ (अप्पा ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂💐💐🌹🌹
आज 84व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
-शंकरराव विठ्ठल भुजबळ जन्म -4/9/1939 सर्जापूर ता .जावली जिल्हा सातारा. मातृछत्र वयाचे 7व्या वर्षी हरपले पितृछत्र वयाचे 14 वे वर्षी हरपले.अप्पांना एक छोटा भाऊ आहे वय 75आहे.आमचे एकत्र कुटूंब आहे. एक विवाहित मुलगी, तीन विवाहित मुले,सुना व नातवंडे , परतुंड असे मोठे सुखी समाधानी कुटूंबाचे प्रमुख अप्पा🙏 माझ्या आईचे 24_1_2018 रोजी निधन झाले ही पोकळी कधीच भरून येणार नाही. 🙏 अप्पांचे शिक्षण कोंडवे येथे सहावी पर्यत _ 7वी नगरपालिका शाळा नंबर 1 येथे _ज्युनिअर व सिनियर ट्रेड महात्मा फुले काॅलेज व दहावी बाहेरून वयाचे 16 वर्षी शिक्षक नोकरी मिळवली. कारण उत्तम मजबूत शरीर 18 वर्ष वय लागते नोकरी करणेसाठी त्यांनी तसा दाखला त्यावेळी civil surgeon यांचेकडून मिळवला.रयत मध्ये 1955ते1957 नोकरी केली.चोरगेवाडी व पिलाणी वरची तालुका जिल्हा सातारा येथे ,नंतर आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन 1959 ते 1997 लोकल बोर्ड सातारा व सातारा जिल्हा परिषद मध्ये नेले, किडगाव, नुने, गवडी, कोंडवे ,कळंबे मुख्याध्यापक म्हणून कृष्णानगर व नेले याठिकाणी उत्तम नोकरी केली सेवेत असताना कधीच पुरस्कार, मेडीकल बील यासाठी अर्ज केला नाही.Scout या विषयावर प्रभुत्व आजही अनेक विद्यार्थी त्यांचें नांव काढतात.सुंदर अक्षर, उत्तम शरीर, क्रिडा, गायन, वादन, वाचन, प्रवास, पाककला, भाषण करणे व एखादी गोष्ट ठरविलेनंतर कोणत्याही दबावाला, संकटाना न घाबरता पूर्ण करणे या जमेच्या बाजू . काॅलेज मध्ये असताना मित्रांबरोबर सुरू केलेली पंढरपूरची आषाढी वारी गेली 63वर्ष अखंड सुरू आहे.माझे आजोबांचे आयुष्य 45 वर्ष त्यांनी 45 वर्ष पुण्यतिथी कार्यक्रम केला .दरवर्षी उत्तम गायक व वादक व महाप्रसाद बेंदराच्या दुसर्या दिवशी ही परंपरा आम्ही पुढे चालवली आहे.ते शेती उत्तम करत सेवानीवृती नंतर शेतात पाऊल ठेवला नाही कारण जबाबदारी दिल्याशिवाय समोरचा माणूस समर्थ होत नाही.अप्पांनी आम्हांला शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही परंतु pocket money कधीच दिला नाही.आयुष्यात कपडे नेहमीच पांढरा सदरा, पायजमा, व टोपी यात बदल नाही.रेडिओ, टी व्ही, मोबाईल, जागा , बंगला अशी खरेदी नाही.त्यांचे तत्व माणसाने गरजा मर्यादित ठेवाव्यात म्हणजे समाधान लाभते.साधी रहाणी उच्च विचारसरणी याचे आचरण त्यांनी केले करत आहेत.पद व प्रसिद्धी, स्तुती प्रत्येकाला आवडते अप्पा त्यापासून दूर परंतु आव्हान स्विकारणे व पार पाडणे हा त्यांचा स्वभाव 1977ते 1979 ते शिक्षक बॅक संचालक दोन वेळेस निवडून आले तेही अपक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आचार्य दादासाहेब दोंदे प्रणित संघटनेत माझे आजोबा, वङील व मी काम केले.करत आहोत यापुढे करत रहाणार.कारण माझे आजोबांना सुरवातीला 5 रूपये पगार होता मला आता 92 हजार रूपये पगार आहे.तो संघटनेमुळेच हे विसरून चालणार नाही.अप्पांनी जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, राज्य संघटक, संयुक्त चिटणीस ही पदे भूषविली. आता अखिल सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष आहेत. याकाळात अनेक आंदोलन केली.संप मोर्चे यात सक्रिय सहभाग घेतला.अधिवेशनाला शेकडो शिक्षकांना सहकुटूंब बरोबर घेऊन गेले भारत दर्शन घडविले अनेक जण आदराने नाव काढतात शंकरराव भुजबळ यांचे मुळे आम्हाला हे शक्य झाले.मीही त्यांचा वसा घेऊन वारसा चालवत आहे.भारत दर्शन बरोबरच 9देश सहकारी सहकुटूंब पाहिले आहेत.वडिलांचे म्हणणे आपण इतिहास, भूगोल शिकवतो आपण प्रत्यक्ष ठिकाणे पाहिलेस ज्ञानात भर पडते.अध्यापन करताना फायदा होतो.त्यांनी जमा खर्च कधी लिहला नाही भावाला तीन मुलांना किंवा नातवांना एक रूपाया आजपर्यंत मागितला नाही किंवा हिशोब विचारला नाही.आमच्या पंखांना बळ दिले स्वातंत्र्य दिले हे खूपच मोठे काम केले.शिस्त व दरारा कायम आहे आजही घराला कुलुप नसते.कधीच चोरी झाली नाही कारण पुस्तकाशिवाय त्यांनी कांहीच खरेदी केले नाही.संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी, ज्ञानेश्वरी पारायण, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर वेलफेअर फंड, अंबाई सहकारी पाणीपुरवठा संस्था या कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेतला.त्यांचे संस्कारामुळेच आमचे एकत्रीत कुटूंब सुखात व समाधानात आहे. आजही रोज मोटारसायकल सुरूच आहे. लोकांना भेटले की त्यांना ऊर्जा मिळते.त्यांनी आयुष्यात नको ते खरेदी केली नाही त्यामुळे रद्दी व भंगार विकले नाहीं.माणसे मिळवली यापुढील आयुष्य लोकसेवा करणेसाठी आहे असे प्रतिपादन करतात.माझे वडिल हे माझे गुरू आहेत मार्गदर्शक आहेत आदरणीय,वंदनीय🙏 आहेत.यापुढील आयुष्य आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना🙏 अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ 🙏🙏🙏
Saturday, August 27, 2022
शिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....
मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.ना.देवेंद्र फडवणीस साहेब,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.ना.दिपकजी केसरकर साहेब,
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.रणजीत सिंह देओल (भा.प्र.से)
अपर मुख्य सचिव
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.
विषयःशिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....
मा.महोदय,
"आपले गुरुजी" या उपक्रम अंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये A4 साईज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत.
शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सदरचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख पत्रामध्ये आहे.व दोन आठवड्यात या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शिक्षकांचा सन्मान करण्याची शासनाची भूमिका असेल तर शिक्षकाला पुर्ण वेळ शाळेमध्ये उपस्थित राहाता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.ना की शिक्षकांचे फोटो शाळेत लावून, या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान दुखवल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून,याबाबत शिक्षकांनी संघटनेकडे नाराजी व्यक्त केली आहे.
आई-वडिलांच्या नात्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे नातं अधिक दृढ असतं घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी दिवसभर शिक्षकांच्या सानिध्यात असतो असे असताना संबंधित शिक्षकाचा फोटो वर्गामध्ये लावण्याचा नेमका हेतू काय ?सदरचा फोटो लावणे म्हणजे शिक्षक अपराधी आहे की काय ? अशी भावना सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे .शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दृढ नात्यांमध्ये कुठे ही फोटो लावण्याची आवश्यकता आजपर्यंत वाटली नाही.त्यामुळे शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याच्या निर्णयास संघटनेचा विरोध असेल.व संघटना या उपक्रमावर बहिष्कार टाकत आहे.तरी हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नम्र विनंती.
आपले विश्वासू,
देविदास बस्वदे कल्याण लवांडे
अध्यक्ष सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
Subscribe to:
Posts (Atom)
ग्रामविकासमंत्री यांची शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात बैठकसंपन्न
जय अखिल.. *ग्रामविकासमंत्री यांची शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात बैठकसंपन्न..* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *🔴राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नामदार ...

-
शालेय पोषण आहार योजनेचे सुलभीकरण करण्याची मागणीः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण संचालकांना निवेदन शालेय ...
-
🌴🌴🌴🌴🌴🌴 ☔ *संचालक कार्यालय - पुणे अपडेट्स* *Education International* 🟪 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न* 🟩 *अखिल महाराष्ट्...
-
, *@संघशक्ती युगे युगे!!* *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...* 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ...