प्रति,
मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री.गिरीश महाजन साहेब,
ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री.दिपक केसरकर साहेब,
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.श्री.रणजितसिंग देओल साहेब, (भा.प्र.से)
प्रधान सचिव
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , महाराष्ट्र राज्य.
मा.राजेशकुमार साहेब(भा.प्र.से)
प्रधान सचिव ग्रामविकास विभाग
महाराष्ट्र राज्य.
विषयः"आम्हाला शिकवू द्या"या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी"लक्षवेधी धरणे आंदोलन"
मा.महोदय,
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही प्राथमिक शिक्षकांची सर्वात जुनी शिक्षक संघटना असून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक संघटना आहे.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही देशभरात जवळपास २४ राज्यात काम करणारी प्राथमिक शिक्षकांची संघटना असून शिक्षकांच्या हक्का बरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी काम करते.संघटनेविषयी अधिक माहिती www.aiptfindia.org या संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ उपोषण, मोर्चे , धरणेआंदोलन तसेच निवेदन आदिच्या माध्यमातून शासनांचे लक्ष वेधत आहे.
शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शिक्षकांना शिकविण्याच्या कामांसाठी वेळ कमी मिळत असून शाळाबाह्य कामात शिक्षकांना अधिक वेळ जात आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे."आम्हाला शिकवू द्या " या प्रमुख मागणीसह शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याप्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक स़ंघ जिल्हा शाखा-............आपणांकडे विनंती करत आहे.शिक्षकांना न्याय मिळावा ही विनंती.
*⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड -२ प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे कमी करावी.
६) शिक्षकांची जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
७) ९ सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी.
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६) शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे.
तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.
आपले विश्वासू,
अध्यक्ष सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ , जिल्हा शाखा -सातारा
No comments:
Post a Comment