Saturday, April 26, 2025

देविदास बसवदे यांची सदिच्छा भेट

 






*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष* तथा *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बसवदे* यांचा आज *सातारच्या राजधानीत*   *शाल श्रीफळ व सातारच्या सहवासात* हे पुस्तक देऊन अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार मार्गदर्शक *शंकरराव भुजबळ* आप्पा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर *राज्य संघटक चंद्रकांत मेकाले सर* यांचा राज्य उपाध्यक्ष तथा पश्चिम विभाग प्रमुख *दीपक जी भुजबळ* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

 *अखिलचे संघटक तुकाराम पाटील* सर यांचा सत्कार अखिल सातारा प्राथमिक संघाचे सरचिटणीस *विजयजी भुजबळ* यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

याप्रसंगी अखिल सातारा *प्राथमिक संघाचे मार्गदर्शक हनमंत नलवडे सर , किरणजी भुजबळ* आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदासजी बसवदे यांच्या हस्ते इयत्ता 5 वी मधील *शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विजय* *भुजबळ* यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..

No comments:

Post a Comment

शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

  शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न दि. १४ जुलै २०२६ आज दि. १४ जुलै २०२...