Monday, October 10, 2022

: Request for not assigning the duties to the primary teachers as both level officer (BLO) of RTE act -2009, section -27*

🌴🌴🌴🌴🌴
*Education International*
☂️ *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*
( *All India Primary Teachers Fedaration*)

 ☂️ *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*  *(A.M.P.S.S.)*

☂️ *Subject : Request for not assigning the duties to the primary teachers as both level officer (BLO) of RTE act -2009, section -27*

☂️ *भारत निवडणूक आयोग ,नवी दिल्ली या निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील मा अवर सचिव साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी दूरध्वनीद्वारे समक्ष चर्चा केली आहे .*

☂️ *श्री रामपाल सिंग ,राष्ट्रीय अध्यक्ष , अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांचे दिनांक 3 जानेवारी 2020 चे निवेदन ,श्री राजेंद्र निमसे ,राज्य संघटक ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे प्रत्यक्ष नवी दिल्ली येथील कार्यालयातील 25 फेब्रुवारी 2020 चे निवेदन व डॉ .सुजय राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार ,भारत सरकार -  नवी दिल्ली  यांचे दिनांक 2 फेब्रुवारी 2021 चे शिफारस पत्र : यास अनुसरून मा . अवर सचिव ,भारत निवडणूक आयोग , नवी दिल्ली यांच्याशी दूरध्वनीद्वारा सविस्तर चर्चा करण्यात आली . मा . अवरसचिव ,नवी दिल्ली यांनी संघटनेने यापूर्वी दिलेली सर्व निवेदने ही  पुनश्च नवीन निवेदनासह व संबंधित संदर्भपत्रे नवी दिल्ली येथील कार्यालयात पुनश्च सादर करण्याबाबत सांगण्यात आले असून लवकरच BLO या विषयाबाबत उच्चस्तरीय पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासित केले आहे*

☂️ *लवकरच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जानेवारी / फेब्रुवारी 2023 मध्ये राष्ट्रीय पातळीवर आंदोलन हे नवी दिल्ली येथे होणार असल्यामुळे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे व राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संघाचे प्रतिनिधी मंडळ थेट भारत निवडणूक आयोगाच्या  नवी दिल्ली येथील कार्यालयास प्रत्यक्ष भेट देणार असून बीएलओ या विषयाबाबत काय कार्यवाही झाली याबाबत संपूर्णपणे माहिती घेतली जाणार आहे. तसेच हे दि : 19 ऑक्टोबर 2022 चे निवेदन  भारत निवडणूक आयोग ,नवी दिल्ली यांना प्राप्त झाल्यानंतर भारत निवडणूक आयोग ,नवी दिल्ली येथील कार्यालयाशी सतत संपर्क साधून या विषयाबाबत सतत पाठपुरावा हा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून सुरू राहणार आहे .*

☂️ *BLO या विषयाबाबत आपणास यश हे निश्चितच मिळणार असून लवकरच सर्वच प्राथमिक शिक्षकांची या अशैक्षणिक व किचकट कामातून मुक्तता होणार आहे .*

☂️( *म्हणजेच कदाचित एखाद्या शिक्षकाची  BLO हे काम करण्याची इच्छा असली तरीही संबंधित प्राथमिक .शिक्षकाला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे काम करता येणार नाही अशी शक्यता आहे )*

☂️ *याबाबतीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने हे निवेदन भारत निवडणूक आयोग , निर्वाचन सदन ,अशोका रोड, नवी दिल्ली येथे मेलद्वारे व स्पिड पोस्टाने पाठविण्यात आले आहे .*

        *आपला विनीत*

        ( *राजेंद्र निमसे*)
         *राज्य संघटक*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
( *ऐक्य मंडळ -अहमदनगर* )
☂️☂️☂️☂️☂️☂️

No comments:

Post a Comment

सातारा जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धा 2024

  *सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज...