Wednesday, April 30, 2025

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी अधिवेशन

 





🌀🌀🌀🌀🌀🌀

    माननीय नामदार पालकमंत्री उदयजी सामंत साहेब  यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हा परिषद या ठिकाणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांची शिक्षकांच्या जिल्हास्तर व राज्यस्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आज बैठक घेतली .त्या बैठकीत झालेले विषय व चर्चा पुढीलप्रमाणे


*️⃣  पालकमंत्री महोदय यांनी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केल्याबद्दल  व 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल सर्व संघटना यांच्या वतीन त्यांचा सन्मान करण्यात आला.


*️⃣ आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यासाठी माननीय शिक्षण संचालक महोदय यांच्याशी चर्चा करून व जिल्हा परिषद उत्पन्नातून एक विशिष्ट योजना तयार करून वेतन वाढ देता येईल का ते पहावे व हा प्रश्न सोडवावा अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी  यांना दिल्या.


*️⃣ तीन वर्ष कालावधी पेक्षा जास्त कालावधी ज्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे त्यांचा पदभार रोटेशनने  दुसऱ्या विस्तार अधिकारी यांच्याकडे देण्यात द्यावा अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी दिल्या.

*️⃣ केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया न्यायालयात प्रविष्ट असल्याने न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून केंद्रप्रमुख पदोन्नती पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या.

*️⃣ नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका येथे बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना ऑफलाइन एनओसी  देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी दिली.

*️⃣ शिक्षकांना क्यू आर कोड असलेले डिजिटल आयकार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकर राबवावी अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी दिल्या.

*️⃣ सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्त दिनांकाच्या दिवशी त्याची सर्व प्रकारचे देयके मिळण्यास विलंब का होतो , त्यांना आनंददायी पेन्शन योजनेचा लाभ का लगेच मिळत नाही याची विचारणा पालकमंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांना  केली. भविष्यात याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

*प्रॉव्हिडंट फंड रकमा मागणी केल्यास लवकरात लवकर त्या शिक्षकांना मिळत नाहीत त्याबाबत पालकमंत्री महोदयांनी  त्या लवकरात लवकर कशा मिळतील याची काळजी घेण्याच्या  सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

*️⃣ वैद्यकीय बिले तात्काळ मंजूर करण्यात यावेत.त्यात कोणीही दिरंगाई करू नये.

*️⃣ शालेय पोषण आहार धान्य पुरवठा वेळेत होत नसल्याबाबत पालकमंत्री महोदय यांनी नाराजी व्यक्त केली व संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषद या ठिकाणी बोलावून  घेऊन धान्य पुरवठा वेळेत कसा होईल याची काळजी घेण्यात यावी असे सांगितले.

*️⃣ संघटनांचे जिल्हाध्यक्ष किंवा सचिव यांना महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हा परिषद मध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात यावी व तसे अधिकृत पत्र काढावे असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

*️⃣ दिव्यांग शिक्षक यांना शासननिर्णया प्रमाणे विविध  सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

*️⃣ पालकमंत्री महोदय यांनी  विद्यार्थी सुरक्षा,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

*️⃣ राज्यस्तरावरील संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे ,मुख्यालय अट रद्द करणे, शिक्षण सेवक कालावधी रद्द करून नवीन शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक करणे, शिक्षकांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देणे व जुनी पेन्शन योजना लागू करणे या विषयासाठी राज्यस्तरावर संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत  संघटनांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदय यांनी दिले.

 

पालकमंत्री महोदय यांनी ही सभा आयोजित केल्याबद्दल  त्यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी अधिवेशन

  🌀🌀🌀🌀🌀🌀     माननीय नामदार पालकमंत्री उदयजी सामंत साहेब  यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनामध्ये आश्वासन द...