मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.ना.देवेंद्र फडवणीस साहेब,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.ना.दिपकजी केसरकर साहेब,
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.रणजीत सिंह देओल (भा.प्र.से)
अपर मुख्य सचिव
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.
विषयःशिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....
मा.महोदय,
"आपले गुरुजी" या उपक्रम अंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये A4 साईज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत.
शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सदरचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख पत्रामध्ये आहे.व दोन आठवड्यात या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शिक्षकांचा सन्मान करण्याची शासनाची भूमिका असेल तर शिक्षकाला पुर्ण वेळ शाळेमध्ये उपस्थित राहाता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.ना की शिक्षकांचे फोटो शाळेत लावून, या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान दुखवल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून,याबाबत शिक्षकांनी संघटनेकडे नाराजी व्यक्त केली आहे.
आई-वडिलांच्या नात्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे नातं अधिक दृढ असतं घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी दिवसभर शिक्षकांच्या सानिध्यात असतो असे असताना संबंधित शिक्षकाचा फोटो वर्गामध्ये लावण्याचा नेमका हेतू काय ?सदरचा फोटो लावणे म्हणजे शिक्षक अपराधी आहे की काय ? अशी भावना सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे .शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दृढ नात्यांमध्ये कुठे ही फोटो लावण्याची आवश्यकता आजपर्यंत वाटली नाही.त्यामुळे शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याच्या निर्णयास संघटनेचा विरोध असेल.व संघटना या उपक्रमावर बहिष्कार टाकत आहे.तरी हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नम्र विनंती.
आपले विश्वासू,
देविदास बस्वदे कल्याण लवांडे
अध्यक्ष सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
No comments:
Post a Comment