Tuesday, September 8, 2026

शिक्षकांच्या प्रश्नासोबत विद्यार्थांच्या गुणवत्तेवरही विचार करणे गरजेचे-शिक्षणमंत्री दादा भुसे

 





*शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा-*

*शिक्षकांच्या प्रश्नासोबत विद्यार्थांच्या गुणवत्तेवरही विचार करणे गरजेचे-शिक्षणमंत्री दादा भुसे*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

> मुंबई ः​शिक्षणमंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत प्रलंबित प्रश्न, शिक्षक संघटनांच्या मागण्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.

*​बैठकीतील प्रमुख निर्णय व चर्चेचे मुद्दे:*

🌀​जुनी पेन्शन योजना (OPS): शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे व वस्तीशाळा शिक्षकांना पेन्शन लागू करणेबाबत चर्चा झाली.याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यांची सूचना शिक्षणमंत्री यांनी दिली.

🌀​अशैक्षणिक कामांचा बोजा: शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी BLO काम अन्य कर्मचाऱ्यांना देण्याबाबत महसूल विभागाशी चर्चा करणे.

🌀​माहितीचा वार शनिवार: शालेय माहिती फक्त शनिवारीच मागवली जावी, याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करून तत्काळ परिपत्रक काढण्यात येईल.

शनिवार शिवाय कोणतीच माहिती देवू नये असे आवाहन त्यांनी केले.

🌀​मुख्याध्यापक पद (१०० पटसंख्या): प्राथमिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १०० पटसंख्येवर मुख्याध्यापक पद निर्माण करण्याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणे.


🌀​टिईटीपरीक्षा व पदोन्नती: सेवारत शिक्षकांच्या TET बाबत इतर राज्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच त्याबद्दल निर्णय घेवू.

 पदोन्नतीबाबत न्यायालयीन प्रकरण आहे .शासन योग्य भूमिका न्यायालयात मांडेल.

🌀​१०-२०-३० आश्वासित प्रगती योजना: योजनेचा त्वरित लाभ देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग पुन्हा वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करणार.

🌀​पदवीधर सरसकट वेतनश्रेणी: पदवीधर वेतनश्रेणीचा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

🌀​आधार नसलेले विद्यार्थी: आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे शिक्षण सचिवांचे आश्वासन.

🌀​शाळा स्वच्छता: शाळा परिसर व स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायतींकडून मदत मिळण्याबाबत निर्णय.

🌀​घरभाडे भत्ताः याबाबत शिक्षकांना खोटे दाखले सादर करावे लागतात .याबाबत स्पष्ट आदेश काढणे आवश्यक आहे.ग्रामविकास विभागाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेवू असे शिक्षणमंत्री यांनी सांगितले.

🌀​डाटा एन्ट्री ऑपरेटर: प्रत्येक केंद्रावर शैक्षणिक माहिती संकलनासाठी 'डाटा एन्ट्री ऑपरेटर' देण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणे.

🌀​१ तारखेला पगार: शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेलाच होण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना निर्देश दिले जातील

🌀.शिक्षण सेवक पद रद्द/सुधारणा: शिक्षण सेवक पद पूर्णपणे रद्द करण्यात यावे, किंवा सद्यस्थितीत शिक्षण सेवकाचा कालावधी १ वर्षाचा करून मानधनात वाढ करण्यात यावी.

🌀​E-KYC व ऑफलाइन नोंद: E-KYC साठी मुदतवाढ मिळावी याबाबत संघटना यांनी मागणी केली.

🌀पूर्वश्रमीची सेवा ग्राह्य धरणे: शिक्षकांची (मागील) सेवा ही पेन्शन आणि इतर सेवाविषयक लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावी.

तसेच शासकीय सेवेतून नियुक्त शिक्षकांना पुर्वीच्या सेवेचे वेतनसंरक्षण,सेवाजोड व तांत्रिक राजीनाम्याचा लाभ देण्यात यावा.


🌀​शाळांसाठी निधी व सुविधा ('चला शाळेत जाऊ' अभियान): जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) माध्यमातून शाळांसाठी ५% ऐवजी १५% निधी खर्च केला जाईल.तसेच शिक्षणाबाबत आकांशित १७८ तालुक्यांत प्रत्येकी ५ कोटी रुपये शैक्षणिक सुविधांसाठी दिले जातील.

​🌀 पेसा क्षेत्रातील शिक्षकांना एकस्तर लाभ देण्याबाबत निर्णय घ्यावा:काही जिल्ह्यात अद्याप लाभ दिला गेला नाही त्याबाबत सर्वसमावेशक धोरण राबविण्या बाबत मागणी संघटनांनी केली.


​शिक्षणमंत्र्यांचे आवाहन:

बैठकीदरम्यान शिक्षकांच्या सर्व रास्त मागण्यांवर शासन सकारात्मक असून लवकरच योग्य मार्ग काढला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री मा. ना. दादाजी भुसे यांनी दिले. तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.चला शाळेत जावू अभियान सर्व शिक्षण विभागातील व शासनाचे प्रमुख एक दिवस शाळा भेटी करतील त्यातून शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील

​'

*☸️​शासकीय व लोकप्रतिनिधींची उपस्थिती:*

​मा. ना. दादाजी भुसे – शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

​मा. विक्रम काळे – शिक्षक आमदार

​मा. महेंद्र दळवी – आमदार

​मा. रणजीत सिंह देओल – शिक्षण सचिव

​मा. सचिन्द्र प्रताप सिंह – शिक्षण आयुक्त

​मा. तुषार महाजन – उपसचिव, शालेय शिक्षण विभाग

​मा. शरद गोसावी – शिक्षण संचालक (प्राथमिक)

*​शिक्षक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी व पदाधिकारी:*

​मा. केशवराव जाधव – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक मध्यवर्ती संघटना

​मा. राजेश सुर्वे – सरचिटणीस

​मा. कल्याण लवांडे – सरचिटणीस, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

​मा. मनोज मराठे – सरचिटणीस, पदवीधर शिक्षक संघटना

​मा. साजिद अहमद – अध्यक्ष, उर्दू शिक्षक संघ

​मा. किशोर पाटील – कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

​मा. नवनाथ गेंड – अध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

​मा. सतीश कांबळे – कास्ट्राईब शिक्षक संघटना

चिंतामण वेखंडे-शिक्षक सेना त्याचप्रमाणे

​माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांचे इतर सर्व प्रतिनिधी

Tuesday, September 1, 2026

TET विरोध मे प्रदर्शन...






 




*TET की बाध्यता के विरुद्ध शिक्षक दिवस पर काली पट्टी बांध कर विरोध प्रदर्शन ।*

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ और ADPSS 1 सितम्बर 2025 से ही सुप्रीम कोर्ट के TET की बाध्यता के आदेश का विरोध कर रहा है। इसी क्रम में  संसद के मानसून सत्र में नेता प्रतिपक्ष राहुल गाँधी, नए शिक्षा मंत्री  प्रहलाद जोशी जी समेत 50 से ज्यादा लोक सभा और राज्य सभा सांसदों को ज्ञापन सौंपा। बहुत सारे सांसदों ने शिक्षकों की माँग को संसद में उठाया और शिक्षा मंत्री जी को भी ज्ञापन सौंपा। *नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी वादा किया है वो शिक्षक हित में TET का मुद्दा लोक सभा में उठाएंगे।*

इसी क्रम में AIPTF ने 5 सितम्बर को राष्ट्रीय शिक्षक दिवस पर सांकेतिक विरोध दर्ज कराने के लिए देश के सभी शिक्षकों से काली पट्टी बांध कर काम करने की अपील की है।अखिल दिल्ली प्राथमिक शिक्षक दिल्ली के सभी शिक्षकों से इस विरोध में भाग लेने की अपील करता है।


रविंद्र प्रधान 
कार्यकारी अध्यक्ष 

विजय धनखड़ 
उपाध्यक्ष 

देवेंदर माथुर 
सचिव 
*अखिल दिल्ली प्राथमिक शिक्षक संघ।*

शिक्षकांचे पंचप्राण स्व.आचार्य दादासाहेब दोंदे

*शिक्षकांचे पंचप्राण स्व.आचार्य दादासाहेब दोंदे यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन...💐💐* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *आचार्य मोरेश्वर वामन तथा दा...