Monday, October 21, 2024

संचालक कार्यालय - पुणे अपडेट्स*

 🌴🌴🌴🌴🌴🌴


☔ *संचालक कार्यालय - पुणे अपडेट्स*


*Education International*

🟪 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न*

🟩 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


🔴 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षण संचालक मा श्री शरद गोसावी साहेब यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली*


 🔸 *स्थळ : प्राथमिक शिक्षण  संचालनालय  , पुणे*

 🔸 *दि : 15 ऑक्टोबर 2024*

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️


 🛑 *विषय क्रं : १*

 *दीपावली सणापूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन व दीपावली ॲडव्हान्स शासनाकडून अनुदान मिळविणे (अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 चे निवेदन )कामी पाठपुरावा करणेबाबत .*

 *मा . संचालक ( प्राथ ) यांनी त्वरित शासनास पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले व दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी तसे शासनास पत्र सादर केले आहे*


 🟥 *विषय क्रं :2*

*अहमदनगर जिल्हा परिषदेने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  प्रविष्ट केलेले आहे .त्या अनुषंगाने दिनांक 9 ऑक्टोबर 2024 च्या पत्रानुसार ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील एका शनिवारी व रविवारी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन केले असून इयत्ता पाचवी चा वर्ग असणाऱ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी यांनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी  विद्यार्थ्यांना संबंधित केंद्रावरसुरक्षित घेऊन जाण्याचे निर्देश दिलेले आहेत .तसेच याबाबत लवकरच पदवीधर शिक्षक केंद्राध्यक्ष नेमले जाणार असून  कित्येक शिक्षकांना सुपरविजनसाठी बोलावले जाणार असून रविवारच्या आदल्या दिवशी शनिवारी मुलांचे क्रमांक टाकण्यासाठी संबंधित बाहेरील गावाच्या शाळेतील शिक्षकांना बोलावले जाणार आहे .*

 *हुबेहूब शासकीय परीक्षा प्रमाणे  (5 रविवारी ) अशा पाच सराव परीक्षा घेतल्या जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षकही त्रस्त होणार आहेत .याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नसताना रविवार सारख्या सार्वजनिक सुट्टीचा अपव्यय होणार असून  याबाबत संचालक स्तरावरून  जिल्हा परिषद , अहिल्यानगर यांना आवश्यक त्या सूचना देणे बाबत कार्यवाही व्हावी , अशी विनंती संघटनेने मा शिक्षण संचालक  (प्राथमिक ) यांना समक्ष भेटून केलेले आहे* 

 *याबाबत मा शिक्षण संचालक (प्राथमिक ) यांचे लवकरच योग्य ते निर्देश अहमदनगर जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहेत .*

 *तद्नंतरच या शिष्यवृत्ती सराव परीक्षा बाबत योग्य तो निर्णय जिल्हास्तरावर  घेतला जाणार आहे*


 🟩 *विषय क्रमांक : ३ राज्यातील प्राथमिक शाळेमधील जिल्ह्या  जिल्ह्यामध्ये शालेय कामाच्या दिवसांमधील असलेली विषमता दूर होणे कामी मा शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या दि 3 सप्टेंबर 2024 रोजी च्या पत्रानुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून सुट्टयांच्या यादीचा अहवाल मागविण्यात आला आहे . मात्र अद्यापही बहुतांश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संचालनालयास  सुट्टयांच्या याद्या पाठवलेल्या नाहीत . अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्यातील 36 जिल्ह्यामधून संबंधित सुट्टयांच्या याद्या प्राप्त करून घेऊन त्या दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी संचालनालयास सादर केलेल्या आहेत .मा शिक्षण संचालक प्राथमिक यांनी 31 ऑक्टोबर 2024 नंतर याबाबतचा विस्तृत अहवाल मा प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मुंबई यांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले . लवकरच शासन स्तरावर याबाबत आवश्यक ती कार्यवाही होऊन संपूर्ण राज्यामध्ये  शालेय कामाच्या दिवसांबाबत समानता आणली जाणार आहे .*


 🟠 *विषय क्रमांक : 4*

 *शाळा पातळीवर प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामूळे विविध समस्या निर्माण होत आहेत . याबाबत मा शिक्षण संचालक यांनी ज्या शाळांचे 90% आधार कार्ड अपडेट आहेत ,त्या शाळांमधील इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तपासणी होऊन सदर अहवाल जिल्हा मार्फत शिक्षण संचालनालयास प्राप्त होणार आहे*.

(*तसेच ज्या शाळेमधील समायोजनामध्ये विद्यार्थ्यांचे केवळ आधार कार्ड प्राप्त नाहीत म्हणून समायोजन झाले आहे , अशा शाळेमधील संबंधित शिक्षकाने बदलीची मागणी केल्यास त्याबाबतची विद्यार्थी उपस्थिती तपासणी होऊन सदर शिक्षकाला संबंधीत शाळा पुनश्च देण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे यावेळी मा . शिक्षण संचालक प्राथमिक यांनी स्पष्ट केले* )


⏭️ *प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत नेहमी दक्ष असणारी तालुका ते देश स्तरापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासंबंधी पाठपुरावा करणारी एकमेव संघटना*


       🔸  *आ विनित*🔸


       *(कल्याण लवांडे )*

       *राज्यसरचिटणीस* 

तथा 

      *(संचालक )*

 *प्राथमिक शिक्षक बँक - अहिल्यानगर*


       *(राजेंद्र निमसे )*

       *राज्य संयुक्तचिटणीस*

तथा

      *( संचालक )*

 *जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ - अहिल्यानगर*

(ऐक्य मंडळ -अहिल्यानगर )

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

No comments:

Post a Comment

मतदानानंतर 21 नोव्हेंबर सुट्टी बाबत..

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येते की संदर्भिय पत्रा नुसार शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...