Tuesday, June 29, 2021

वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर

 अखिल सातारा शिक्षक संघाच्या पाठपुराव्यामुळे 2089 शिक्षकांना वेतनश्रेणी

वयाच्या 82 व्या वर्षीही शंकरराव भुजबळ यांचा लढा; प्रशासनाचे मानले आभार
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) - गेल्या तीन दशकांपासून अधिक वर्षे प्रलंबित असणारी निवड वेतन श्रेणी जिल्ह्यातील 2089 सेवानिवृत्त शिक्षकांना मंजूर झाली आहे. अखिल सातारा जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव भुजबळ यांनी वयाच्या 82 व्य वर्षीही याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 747 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झाल्याने प्राथमिक शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया शंकरराव भुजबळ यांनी दिली आहे.
प्राथमिक शिक्षकांना निवड वेतनश्रेणी मंजूर झाल्याबद्दल अखिल सातारा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. याप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ, जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, कार्याध्यक्ष गणेश जाधव, सरचिटणीस अजित राक्षे, प्रसिध्दीप्रमुख उध्दव पवार, उपसरचिटणीस बसवराज दोडमणी, खजिनदार शहनाज तडसरकर, कोरेगाव तालुकाध्यक्ष विजय भुजबळ आदी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न खूप वर्षे लांबला होता. प्राथमिक शिक्षकांना निवड वेतन श्रेणी मिळावी यासाठी शंकरराव भुजबळ यांनी 1986 सालापासून प्रयत्न केले. अनेक शिक्षकांची कागदपत्रे उपलब्ध होत नव्हती. अनेक अडचणी होत्या. मात्र जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील शिक्षकांशी समन्वय साधत भुजबळ यांनी वेळोवळी जिल्हा परिषद प्रशासनास निवेदने दिली. वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिकाही घेतली. राज्यपाल, संबंधित विभागाचे सचिव यांच्याकडेही पाठपुराव केला. नागपूर विधान भवनासमोर आंदोलनही त्यांनी केले होते. खा. श्रीनिवास पाटील, ना. वर्षा गायकवाड, आ. मकरंद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष, पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्तार अधिकारी सन्मती देशमाने,सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी प्रकाश महामुलकर यांच्या सहकार्यामुळे तीन दशकांपासून प्रलंबित असणारा निवड वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाल्याचे समाधान असल्याचे शंकरराव भुजबळ म्हणाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा विषय तडीस लागल्याचे निश्चितच समाधान आहे. या निवडश्रेणीचा हजारो शिक्षकांना, त्यांचा वारसांना लाभ होणार आहे. या प्रक्रियेत अनेक अधिकारी, कर्मचार्यांनी सहभाग घेवून शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचेही ते म्हणाले.


 *लढा प्रेरणादायी -उदय कबुले* 
शंकरराव भुजबळ यांनी वयाच्या 82 व्या वर्षीही प्राथमिक शिक्षकांना न्याय देण्यासाठी घेतलेली भूमिका निश्चितच प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्त शिक्षकांसाठी आणि त्यांच्या वारसांसाठी निवड वेतन श्रेणीचा निश्चित फायदा होणार आहे. शिक्षक संघटनांच्या आजपर्यंतच्या लढ्यात 82 व्या वर्षीही उमेदीने काम करुन वेगळा आदर्श निर्माण करुन दिला आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी हा लढा निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केले.  

 
सातारा - प्राथमिक शिक्षकांना निवड वेतनश्रेणी मंजूर झाल्याबद्दल मा.CEO विनय गौडा साहेब
यांचे आभार मानताना शंकरराव भुजबळ, दीपक भुजबळ, संजीवन जगदाळे व गणेश जाधव.
Attachments area
S

No comments:

Post a Comment

मतदानानंतर 21 नोव्हेंबर सुट्टी बाबत..

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येते की संदर्भिय पत्रा नुसार शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...