*🔴शिक्षणमंत्री मा.ना.दादाजी भुसे यांची संघटना प्रतिनिधी बरोबर चर्चा*
🔶🔶🔶🔶🔶🙏🏻🙏🏻🔶🔶
*मुंबई-आनंददायी गुणवत्ता पूर्ण शिक्षण कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय ना. दादाजी भुसे साहेब यांनी राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचे शी संवाद साधला यावेळी प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते .*
*▶️त्याचप्रमाणे राज्याचे शिक्षण सचिव मा. रणजितसिंह देवल, शिक्षण आयुक्त मा. सचिंद्र प्रतापसिंह, एस सी आर टी चे संचालक मा.राहुल रेखावार ,शिक्षण संचालक ,उपसचिव मा.तुषार महाजन,मा.शरद गोसावी आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.*
*🔷शिक्षण विभागाची सुत्रे हाती घेताच शिक्षणमंत्री अँक्शन मोडवर आले असून विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षकांचे प्रश्न ,शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे .*
*🔴यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपाययोजना सुचवल्या तसेच शिक्षकांच्या समस्या मंत्रीमहोदया समोर मांडल्या.हे सर्व प्रश्न समजून घेवून ते सोडवण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल. हे सर्व प्रश्न एकाच वेळी सुटतील अशी खात्री मी देत नाही परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाते व आगामी काळात त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित दिसतील असे आश्वासन माननीय शिक्षण मंत्री यांनी दिले- ग्रामीण भागातील शाळांचे पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने व गुणवत्ता पूर्ण आनंददायी शिक्षण राबवण्याच्या दृष्टीने शिक्षक संघटनाची भूमिका महत्त्वाची आहे असे सांगितले.*
*➡️यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी.शिक्षकांना फक्त शिकवू द्या, शालेय पोषण आहार योजनेतील त्रुटी, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी , १५ मार्च २०२४ संचमान्यता शासन निर्णय, आधार आधारित संचमान्यता याचबरोबर विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न शिक्षक संघटनांनी मांडले ते सर्व प्रश्न स्वतः शिक्षणमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी लिहून घेवून सर्व संघटनांची निवेदन स्वीकारले.ही बैठक अंतीम नसून ठरावीक कालावधी नंतर शिक्षक संघटनांशी नियमित संवाद साधून या बाबींवर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असेही ते म्हणाले.*
*▶️यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संयुक्त सचिव श्री.राजेंद्र निमसे यांची उपस्थिती होती.*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*