🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा 71 वा वर्धापन दिन....*🙏
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची ७जानेवारी १९५४ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मा.श्री. पंडीत नेहरू यांच्या उपस्थितीत अधिवेशन घेऊन आचार्य कै.दादासाहेब दोंदे यांनी स्थापना केली....*
*म्हणून ७ जानेवारी शिक्षकसंघटना वर्धापन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो..*
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
🔵 *संघटनेचा इतिहास:अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी शिक्षक संघटना १९१०साली स्थापना झाली .त्याकाळी स्वातंत्र् चळवळ उभारणे हा एकमेव हेतूहोता मुंबई इलाखा प्राथमिकशिक्षक संघ नावाने संघटनेची स्थापना झाली,,,,सन 1945 ला मुंबई राज्य प्राथमिक शिक्षक संघ अशी पुर्नरचना करण्यात आली,व पहिंले अधिवेशन पुणे येथे घेण्यात आले ,अध्यक्ष स्थानी आचार्य दादासाहेब उर्फ मो.वा.दोंदे हे होते. पहिली मागणी शिक्षकांचा पगार १५ रु.वरुन ३० रु.करणे ४५दिवसाच्या संपानंतर मागणी मंजूर झाली.कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांची साथ संपाला लाभली. ७ जानेवारी १९५४ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना नागपूर येथे तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत झाली.स्वागताध्यक्ष भारताचे पहिले कृषीमंत्री मा.डॉ. पंजाबराव देशमुख होते.तेव्हापासून दर दोन वर्षाला संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन होते.सन १९६०ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाने महाराष्टात संघटनेच नामकरण झालं .सन १९६४ला आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या निधना नंतर मा.अरुणभाई दोंदे यांच्याकडे संघटनेचे अध्यक्षपद आले त्यांनी प्राथमिक शिक्षकाला सन १९६६ला बडकस आयोग ,१९६७ला प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण .शिक्षकांना फँमीली पेन्शन योजना जी की २००५ पर्यत चालू होती.सन१९८४ साली फक्त शिक्षकांसाठी चटोपाध्याय आयोग ही कै.अरुण दोंदेच्या कार्याची प्रचीती सर्व देशाने अनुभवली .सन १९७७ ला विक्रोली (मुंबई) येथे अखिल भारतीय अधिवेशनाच्या वेळी संघटनेत फूट पाडली आणि प्राथमिक शिक्षकांची महाराष्ट्रातील एकजूट विभागली गेली. महाराष्ट्रातील शिक्षकांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले.आज त्याचेही कीती शकलं झाली हे सर्व महाराष्ट्रातील शिक्षक पाहात आहे..भाईसाहेब दोंदेना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदारकीही मिळाली तो त्यांचा सन्मान ठरला,तसेच काँग्रेस पक्षाचे प्रतोद म्हणून त्यांनी काम केले.सन १९८२ ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ श्री अरुणभाई दोंदेच्या कार्यकालात जागतिक शिक्षक संघास संलग्न झाला.संपूर्ण जगात १६७ देशात त्याचे काम चालते ..२००१ भाईसाहेबांच्या निधनानंतर या महाराष्ट्राचं नेतृत्व श्रीमती.सुलभाताई दोंदे यांनी केलं.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वरीष्ठ उपाध्यक्षा. तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या women network च्या चेअर पर्सन..म्हणून त्यांनी काम केलं .शिक्षिकांना संघटन चळवळीत पुढे आणण्याचे काम त्यांनी केले आहे.*
*वेतन आयोगापुढे आज पर्यत फक्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साक्ष देत आला.तो सातव्या वेतन आयोगापर्यत..नवे.शैक्षणिक धोरण, प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय आयोग या मागण्या केंद्र शासनाकडून मान्य करून घेतल्या आहेत.जुन्या पेन्शन साठी निरंतर संघर्ष चालू आहे.२१ ते २७ फेब्रुवारी २०२० ला देशव्यापी धरणे आंदोलन केले आहे. भविष्यात लढाई चालू राहिल..*
*शैक्षणिक गुणवत्तेसाठी संघ आग्रही आहे.खाजगीकरणाला विरोध करतो आहे.*
*महाराष्ट्रात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे.आंतरजिल्हा बदली लढा, कोरोनाचा वैद्यकीय प्रतिपुर्ती त समावेश , हे काम अखिलचं यश आहे.शिक्षणसेवकांचे मानधन वाढवणे, विना अट निवडश्रेणी, शिक्षकांना कँशलेस मेडीकल सुविधा, याबरोबरच अनेक प्रश्नांबाबत लढा सुरू आहे.*
*संपूर्ण भारतात आज ७ जानेवारी शिक्षक संघटना दिन म्हणून साजरा होतो.*
*महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना आज शिक्षक संघटना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अध्यक्ष
गणेश जाधव
सरचिटणीस
विजयकुमार भुजबळ
दिपक भुजबळ
राज्य उपाध्यक्ष
ज्येष्ठ नेते
*अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ*
No comments:
Post a Comment