Wednesday, March 19, 2025

ग्रामविकासमंत्री यांची शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात बैठकसंपन्न

 जय अखिल..




*ग्रामविकासमंत्री यांची शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात  बैठकसंपन्न..*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*🔴राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विविध मागण्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती .* 


*यावेळी खालील मुद्दे वर चर्चा झाली*

*१) जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रक्रीयेसाठी ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी- याबाबत महाराष्ट्र शासन बदली धोरण ३१ मे ही बदली दिनांक ग्राह्य धरलेला आहे.तरी संघटनांच्या विनंतीवरून ५३वर्ष वयासाठी ३०जून दिनांक धरण्याबाबत चर्चा झाली त्यास मंत्रीमहोदय यांनी अनुकुलता दाखवली आहे.*


 *२) सर्व प्रकारच्या पदोन्नती करणेबाबत-- या बदली प्रक्रियेपूर्वी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक या सर्व पदांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी . याबाबत चर्चा झाली त्यास सचिव यांनी तात्काळ सर्व जि.प यांना आदेशित करु असे सांगितले.*     


*३) दुर्धर व गंभीर आजार असणाऱ्या  पाल्यांच्या शिक्षक पालकांना जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एकचा लाभ देण्यात यावा याबाबत चर्चा झाली .*


*४) सन २०१८ व सन २०२२ च्या अवघड क्षेत्राच्या यादीमध्ये समाविष्ट असलेले पण १८ जून २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सोपेमध्ये समाविष्ट असलेल्या शाळेतील शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे.*

*मात्र अवघड क्षेत्रातील सेवा तीन वर्षे असणे आवश्यक आहे.*


*५) अंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता पूर्वीच्या जिल्ह्याची धरण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला.*


*▶️६) पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या रखडलेली पद्दोन्नती प्रक्रिया पूर्ण करून, रिक्त असलेल्या मुख्याध्यापकांच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात याबाबत प्रश्न उपस्थित केला आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केला.*


*७)यापूर्वी चे बदलीबाबत शासननिर्णय ,परिपत्रक अधिक्रमित झाले असून १८जून २०२४च्या शासननिर्णयाप्रमाणे बदली प्रक्रीया राबवली जाईल असे प्रधान सचिव यांनी स्पष्ट केले.*

*या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मा. मंत्रीमहोदयानी दिले.    यावेळी आमदार श्री.राहुल कुल, आमदार श्री. अभिमन्यू पवार, श्री. सत्यजीत तांबे, श्री. सुरेश धस, श्री. संजय केळकर, श्री. निरंजन डावखरे ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री एकनाथ डवले यांच्यासह*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे ,सरचिटणीस कल्याण लवांडे, संयुक्त सचिव राजेंद्र निमसे,  शिक्षक बँक सातारा संचालक संजीवन जगदाळे,बंडू नागरगोजे सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

No comments:

Post a Comment

केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट..

  *🟣केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *...