Tuesday, July 14, 2026

शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

 



शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न



दि. १४ जुलै २०२६


आज दि. १४ जुलै २०२६ रोजी शिक्षकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांच्या दालनात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.


या बैठकीस शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, मा. श्री. विक्रम काळे व मा. श्री. सुधाकर अडबाळे उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:


१) पदोन्नतीबाबत :


शालेय शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय प्राप्त झाला असून त्यानुसार शालेय शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे.


नागपूर खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या तारखेपर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेले सर्व सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र राहतील, अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.


कोल्हापूर खंडपीठाचा निर्णयही प्राप्त झाला असून त्याचाही विचार करून शासन अंतिम निर्णय घेणार आहे.


२) TET परीक्षेबाबत :


महाराष्ट्र शासन कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा आयोजित करणार आहे.


३) यापूर्वी झालेल्या पदोन्नतीबाबत :


यापूर्वी झालेल्या सर्व पदोन्नती प्रकरणांबाबत न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून शासन योग्य निर्णय घेणार आहे.


४) एक दिवसाच्या पगार कपातीबाबत :


एकदिवसीय धरणे आंदोलनामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची भरपाई अतिरिक्त अध्यापनाद्वारे करण्यात येणार असल्याने कोणत्याही शिक्षकाचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात येणार नाही, याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.


५) पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी :


पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून शासन निर्णय घेणार आहे.


६) आंतरजिल्हा बदली :


पवित्र पोर्टलमधून नियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीपूर्वी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी संघटनांची मागणी करण्यात आली.


SIR चे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शालेय शिक्षण व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री महोदयांनी सांगितले.


७) BLO / SIR कामकाज :


BLO व SIR कामादरम्यान काही अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी, तसेच शिक्षकांना होत असलेल्या त्रासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


या संदर्भात मा. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत बावनकुळे, निवडणूक आयोग आणि शिक्षक आमदार यांच्या उपस्थितीत पुढील मंगळवारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यक निर्णय घेतले जातील.


शिक्षकांना BLO/SIR ची कामे देऊ नयेत, या भूमिकेवर सर्व शिक्षक संघटना ठाम असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.


*सदर बैठकीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त सचिव श्रीकृष्ण चिकणे  तसेच रायगड जिल्हा सरचिटणीस  विनोद जोशी यांची उपस्थिती होती..*

Wednesday, July 8, 2026

प्रा. अरुण दोदे (भाईसाहेब) प्राथमिक शिक्षकांचे स्फूर्तीस्थान







 प्रा. अरुण दोदे (भाईसाहेब) प्राथमिक शिक्षकांचे स्फूर्तीस्थान


आज ९ जुलै २०२६ रोजी आपले प्राणप्रिय नेते शिक्षक नायक स्वर्गीय प्रा अरुण दोंदे यांचा २५ वा स्मृतिदिन

या स्मृतीदिनी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या वतीने विनम्र अभिवादन!!

आपल्या कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातीलय नव्हे तर देशभरातील प्राथमिक शिक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारा नेता व आपल्या कार्यकौशल्याचा ठसा जागतिक स्तरावर उमटवणारा शिक्षक नेता स्वर्गीय अरुणभाई असामान्य बुध्दिमता लाभलेले अलौकिक व्यक्तीमत्व होते. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांचा शिक्षक न राहता ती समाजाचाही शिक्षक व्हावा ही त्यांची शिक्षकांकडून अपेक्षा होती.

शैक्षणिक कार्य: ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धार्थ महाविद्यालयात  अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. पुढे ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य बनले आणि त्यांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'चे  सदस्य व उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.


संघटनात्मक कामाचा वारसा जरी पिढीजात मिळाला असला तरी स्वतःचे कार्यकर्तृत्व, कठीण परिश्रम, अमोघ वक्तृत्व, अभ्यासूपणाच्या जोरावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जागतिक शिक्षक संघात उमटवला. के. प्रा. अरुण दोंदे यांचे भाषण म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य देणारं असायच. आपल्या अमोघ वक्तृत्वाने शिक्षकांचे ते नेते झाले. आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कौशल्य यामुळे राजदरबारीही त्यांचा मोठा मान होता


जसे शिक्षक त्यांच्या भाषणाचे चाहते होते तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकही. जागतिक शिक्षक संघटनांच्या अनेक शिक्षण परिषदेसाठी त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. जवळपास २८ देशांना भेटी दिल्या या शिक्षण परिषदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आजही आवर्जून उल्लेख होतो. भारत सरकारच्या रशिया येथील शैक्षणिक दौऱ्याचे नेतृत्व अरुणभाई यांनी केले होते.


७ ऑक्टोबर १९६२ ला दादासाहेबांचे निधन झाल्यानंतर वयाच्या २९ व्या वर्षी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेची आणि पर्यायाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची धुरा भाईसाहेबांच्या खांद्यावर येवून पडली. सन १९६३ सालीच शिक्षकांना पेन्शन योजना मंजूर करून घेतली. सन १९६८ साली मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरावरील शिक्षण मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. त्यासाठी भाईसाहेबानी आपले संघटन कौशल्याचा वापर केला वेतन आयोग लागू करण्यापूर्वी शिक्षक संघटनेची साक्ष घेतली जावी व आजपर्यंत केवळ अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ हाच वेतन आयोगासमोर प्राथमिक शिक्षकांची संघटना म्हणून साक्ष देत आला आहे.


प्राथमिक शिक्षकाचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्याच्या जीवात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी भाईसाहेबानी आपले उभे आयुष्य पणाला लावले प्राथमिक शिक्षकांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी स्वः पंतप्रयान श्रीम इंदिरा गांधी यांच्याकडे अभ्यासपूर्ण मागणी करून चटोपाध्याय आयोगाची स्थापना करण्यात व चटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतन संरचना तयार करण्यासाठी भाईसाहेबांनी केलेले काम भारतातील प्राथमिक शिक्षक कधीही विसरु शकणार नाहीत शाळांसाठी ४ टक्के सादील अनुदान मिळावे म्हणून केलेल्या 'राष्ट्रपतींना तार पाठवण्याच्या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली व शाळांना ४ टक्के सादील अनुदान मिळू लागले. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या कारकिर्दीत त्यांनी सोडवले


स्वर्गीय अरुणभाईंनी महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे नेतेपद हायात भूषविले तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे तीनवेळा (टर्म) अध्यक्षपद भूषविले व पुढे संरक्षक म्हणून होते आपल्या पदाचा अभ्यासू वृत्तीचा व वक्तृत्वाचा वापर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला महाराष्ट्रासह भारतातील खेड्या-पाड्यापर्यंत प्रवास करुन प्राथमिक शिक्षकांचे संगठन त्यांनी मजबूत केले.


प्राथमिक शिक्षक ही एक व्यक्ती नसून प्रचंड अशी शक्ती आहे. याची जाणीव त्यांनी शिक्षकांना करुन दिली विविध शिक्षण आयोगासमोर शिक्षक, विद्यार्थी व शाळासंबंधीचे प्रश्न मांडले. प्राथमिक शिक्षणासाठी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद करावी ही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर सुट्टया कमी करुन कामाचे तास वाढवा अशी मागणी करणारा संघटनेचा भाईसाहेबांसारखा नेता दूर्मिळच म्हणावा लागेल.


संघटनेचा पदाधिकारी हा आधी विद्यार्थ्यांचा शिक्षक आहे, म्हणून विद्यार्थी टिकला तर शाळा टिकतील व शाळा टिकल्या तर शिक्षक टिकतील. म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. असा उपदेश ते भाषणातून नेहमी देत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध पदे त्यांनी भूषवली व स्वकर्तृत्वाने व स्वपरिश्रमाने पदाची शान उन्नत ठेवली. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे नेते, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व संरक्षक, सार्क शिक्षक संघाच्या विविध समित्यांवर सदस्य, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, एस.एस.सी बोर्डाचे सदस्य, गोखले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य, एन.सी.ई.आर.टी. चे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषवली सन १९७६ साली विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्याची निवड झाली. परंतु सत्ता व पदाचा मोह मात्र त्यांनी कधी ठेवला नाही.


भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शिक्षकांचे एक हक्काचे शिक्षक भवन असावे हे भाईसाहेबांचे स्वप्न होते. त्याचा ध्यास त्यानी घेतला होता. भाईसाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या श्रीम सुलभाताई दोंदे यानी खूप प्रयत्न केले व करत आहेत. आज अखिल महाराष्ट्राचे शानदार पोर्टेबल कार्यालय या जागेत सुरु झाले. माईसाहेबांच्या श्वासाची माळ तुटली पण ध्यासाची माळ ताईसाहेबांनी कधीही तुटू दिली नाही. त्याच्या पश्चात महाराष्ट्रातील शिक्षकांचा आधार बनल्या आहेत. त्यांचे कार्य जोमाने पुढे ठेवले आहे. आज शिक्षकांच्या प्रत्येक लढ्यात व प्रत्येक प्रश्नात स्वतःला झोकून देवून अहोरात्र परिश्रम करीत आहेत. त्याग करीत राहिल्याने जीवनास मोल प्राप्त होते ही शिकवण दोदे घराण्याने आपल्या आचरणातून समाजापुढे ठेवली.


भाईसाहेबांच्या जीवनावर लिहिण्यासारखे खूप आहे. कारण त्यांचं कर्तृत्व विशाल आहे तरीसुध्दा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न... ९ जुलै २००१ रोजी आकस्मात माईसाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु, प्राथमिक शिक्षकांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरकाल राहतील, त्यांचा स्मृतीदिन हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी स्फूर्तीदिन ठरावा हीच सदिच्छा! व आपल्या लाडक्या नेत्याला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

श्रेष्ठ दान ...रक्तदान

 





श्रेष्ठ दान ...रक्तदान 

आदरणीय बापूंनी काल आपल्या वाढदिवशी 59 व्या वेळा रक्तदान केलं. एका शिक्षकाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे.संघटना, कुटुंब,अध्यापन या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत समाजासाठी स्वतः च्या कृतीने आदर्श निर्माण केला आहे.


अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा दातृत्वाचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव,श्री विजय भुजबळ, उपाध्यक्ष, बसवराज दोडमनी सरचिटणीस,राजेंद्र भुजबळ, देवेंद्र भुजबळ,अनिकेत भुजबळ,श्री.सावंत,श्री.भिंगारदेवे,श्री हणमंत नलावडे.व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन


 टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन



अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सातारा जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या टीईटी सक्तीच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.


संघटनेने निवेदनाद्वारे आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या सक्तीमधून कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी केली. तसेच टीईटी परीक्षेतील किमान पात्रता गुणांची अट ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली.


संघटनेच्या मते, आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी राज्य शासनाच्या नियमानुसार नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन कार्य केले असून, नव्या अटींची पूर्वलक्षी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांच्या सेवासातत्यावर व भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी टीईटी सक्तीच्या विषयावर वैयक्तिक चर्चा करून शिक्षकांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.


या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष श्री दीपक भुजबळ, राज्य संघटक श्री संतोष लोहार, जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव, उपाध्यक्ष श्री विजय भुजबळ, जिल्हा सरचिटणीस श्री बसवराज दोडमनी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

९ जुलै रोजीच्या 'शाळा बंद' आंदोलनात सक्रिय सहभागाबाबत

 प्रति,

*सर्व राज्य पदाधिकारी / जिल्हा / नपा संघ अध्यक्ष / सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


*​विषय: ९ जुलै रोजीच्या 'शाळा बंद' आंदोलनात सक्रिय सहभागाबाबत ..*

​महोदय 

सस्नेह नमस्कार.

*​वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, टीईटी (TET), पदोन्नती, संचमान्यता आणि शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक कामे या अत्यंत महत्त्वाच्या व प्रलंबित मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती संघटनेने ९ जुलै रोजी 'शाळा बंद' ची हाक दिली आहे.*


*​या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होत आहे, याचे अधिकृत पत्र यापूर्वीच आपणास निर्गमित करण्यात आले आहे.*

*​आंदोलनात सहभाग:* आपल्या जिल्ह्यातील स्थानिक नियोजनानुसार सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे व सक्रिय सहभागी व्हावे.

*​आंदोलनाचे स्वरूप:* शासनाचे सध्याचे धोरण हे शाळा आणि शिक्षण विरोधी आहे. सरकारी शाळा वाचवण्यासाठी आणि शिक्षकांवरील अन्यायाचा तीव्र निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा / धरणे आंदोलन आयोजित करून आपला रोष व्यक्त करावा.

*आवाहन*

 जिल्हा, तालुका आणि केंद्र पातळीवरील प्रत्येक शिक्षकांपर्यंत हा संदेश पोहोचवून आंदोलन शंभर टक्के यशस्वी करावे.

​📢 "सरकारी शाळा वाचवण्यासाठी आणि आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या, ९ जुलैचे आंदोलन यशस्वी करा!"

​आपले नम्र,

​(अध्यक्ष / सरचिटणीस)

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, June 22, 2026

TET प्रश्नी लक्षवेधी आंदोलन करणार

 






*संघशक्ती युगे युगे!!*

▪️▪️▪️▪️▪️▪️


*🟣टिईटी प्रश्नी लक्षवेधी आंदोलन करणार..*🟣

*🟥अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचा निर्णय*


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*☸️अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची आँनलाइन सभा रविवार दि.२१जून रोजी राज्य अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.टिईटी न्यायालयीन निर्णयाने उद्भवलेल्या सेवारत शिक्षकांच्या सेवा व पदोन्नती प्रश्नी चर्चा होऊन संघटनेने "लक्षवेधी "आंदोलन  करण्याचा निर्णय घेतला आहे .*

*याबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने घेतलेल्या निर्णयानुसार भारतातील २४ राज्यात हे आंदोलन होणार आहे .*

 *📍अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने'  देशाचे शिक्षणमंत्री मा.धर्मेद्र प्रधान, एनसीटीई चे अध्यक्ष तसेच विविध मंत्री यांची भेट घेवून निवेदन दिले .तसेच टिईटी प्रश्नी पुन्हा आंदोलनाची हाक दिली.सन २०१० पुर्वीच्या शिक्षकांना टिईटी  तून सवलत मिळावी यासाठी संसदेत कायद्यात दुरुस्ती करावी यासाठी जिल्हा/राज्य तसेच देशस्तरापर्यत आंदोलन करण्याचे ठरले आहे.त्याप्रमाणे राज्यात टिईटी प्रश्नी लक्षवेधी आंदोलन करण्याचे ठरले.*

*🟣आंदोलनाचे स्वरुप*

 *टीईटी बाबत  करावयाच्या आंदोलनाची दिशा  ठरवण्यात आली.*

 *🟣जुलै पहिल्या आठवड्यापर्यत मा.राज्य सभा व लोकसभेचे खासदार यांना निवेदनदेणे व शिक्षकांच्या प्रश्नी संसदेत आवाज उठविण्याचे आवाहन करणे.*


*🟣विधान सभा /विधानपरिषद सदस्य यांना निवेदन देणे सेवारत शिक्षकांना टिईटी गुणात सवलत, विभागीय परिक्षेचे आयोजन, परिक्षेची काठिण्य पातळी कमी करणे याबाबत पावसाळी अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेणेबाबत विनंती करणे.*


*🟣धरणे आंदोलन:११जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , मा.शिक्षणमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येईल.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*सदर सभेस सर्व राज्य संघ पदाधिकारी जिल्हा संघ अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Tuesday, June 9, 2026

जनगणना संदर्भात निवेदन...





अखिल सातारा शिक्षक संघाच्या वतीने जनगणनेसंबंधाने जिल्हाधिका-यांना निवेदन....

         सध्या सुरु असलेल्या भारताची जनगणना २०२६ - २०२७ च्या अनुषंगाने अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी सातारा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने जनगणनेच्या कर्तव्यावर असणा-या प्रगणक व पर्यवेक्षकांना माहे मे व जून महिन्याचा प्रवासभत्ता अदा करण्यात यावा.तसेच जनगणना कर्तव्यावर असताना एखाद्या कर्मचा-याचा अपघात झाल्यास,अपघाती मृत्यू झाल्यास ₹ ५० लाखांचे विमा संरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे,तसेच प्रगणक व पर्यवेक्षकांना किमान ६० दिवसांची अर्जित रजा सेवापुस्तकात जमा करावी,जनगणनेचे काम करत असताना प्रगणकांना काही अडचण निर्माण झाल्यास 'तात्काळ मदत कक्ष' निर्माण करावा व त्याचा संपर्क क्रमांक सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना देण्यात यावा तसेच जनगणनेचे राष्ट्रीय काम सुट्टीच्या काळात पूर्ण केल्याबद्दल सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना मा.जिल्हाधिकारी यांचे सहीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे.अशा विविध मागण्यांचे निवेदन सन्माननीय जिल्हाधिकारी यांचे वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मा.नागेश पाटील यांनी स्वीकारले व सर्व मागण्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

      यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख दीपक भुजबळ, राज्य संघटक संतोष लोहार, रजनी चव्हाण ,अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश जाधव,सरचिटणीस बसवराज दोडमणी उपाध्यक्ष विजयकुमार भुजबळ, सुशांत येवले,उपसरचिटणीस उद्धव पवार, कार्याध्यक्ष कृष्णात हिरवळे, महिला आघाडी प्रमुख प्रणिता देवकर, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन तथा विद्यमान संचालक संजीवन जगदाळे,कराड पाटण सोसायटीचे संचालक संतोष यादव,

पाटणचे शिक्षक नेते राजू पवार आदी शिक्षक उपस्थित होते.

Monday, March 2, 2026

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळ सभा संपन्न.. 2026

 


*संघशक्ती युगे युगे!!!*


*🔴अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळ सभा संपन्न....*


> टिटवाळा-अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा रविवार दिनांक १मार्च २०२६,  रोजी राज्यध्यक्ष मा.श्री.देविदास बस्वदे सर यांचे अध्यक्षतेखाली  व राज्य सल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत  ठिकाण-"विस्डम किड्स "प्री-स्कुल , गणेश मंदिरा जवळ टिटवाळा (पू) ता.कल्याण जि.ठाणे. येथे संपन्न झाली.


 *श्रद्धांजली व अभिवादन*


 *महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून तसेच शिक्षक नेते स्व. आचार्य दादासाहेब दोंदे ,शिक्षक नेते भाईसाहेब दोंदे,  स्वर्गीय सुलभाताई दोंदे यांना अभिवादन करून सभेची  सुरुवात करण्यात आली.*


*🌀यानंतर नूतन निवड झालेले  जिल्हाध्यक्ष नंदुरबार- अशोक देसले,  व अविनाश मोकाशे सरचिटणीस धाराशीव  यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.*


*🟥सभेपुढील विषयः*

*🌀कोअर कमेटीतील झालेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.त्यानुसार टिटवाळा येथे शिक्षक भवन बांधणे कामी आवश्यक कायदेशीर बाबी पुर्ण करणे.*

*🌀 आर्थिक आढावा- सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी सन २०२५-२६ वर्षाचा जमाखर्च सभेसमोर सादर केला. व सभासद नोंदणी चा आढावा घेतला.*

*🌀 शिक्षक नेते स्व. भाईसाहेब दोंदे व सुलभाताई दोंदे यांचा स्मृतिदिन समारंभ जुलै महिन्यात यवतमाळ या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आले.*

*🟣यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.*


*१)अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने टिईटी बाबत मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून गेल्या तीन महिन्यात देश पातळीवर दोन आंदोलन केले आहेत .टिईटी बाबत लढा कायम सुरू राहणार असून 2011 पूर्वीच्या  शिक्षकांना टीईटी तू मुक्त करू असे आश्वासन राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदास बसवदे यांनी दिले.*

*२) संच मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयात  अखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघाने याचिका दाखल केली असून त्याबाबत लवकरच सुनावणी होईल व शिक्षकांना न्याय मिळेल अशी आशा वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केली.*

*३)सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दोन वर्षात टिईटी उत्तीर्ण करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे निर्णयाच्या अधीन राहुन सेवाज्येष्ठतेने पदोन्नती द्यावी याबाबत राज्य संघाने याकामी प्रयत्न करावे अशी मागणी पदाधिकारी यांनी  करण्यात आली.*

*४)वस्ती शाळा शिक्षकांची मुळ सेवा  पदोन्नती,  वरीष्ठ वेतनश्रेणी व  पेन्शन साठी ग्राह्य धरावी तसेच अप्रशिक्षित शिक्षकांचे पत्राद्वारे प्रशिक्षण पुर्ण करावे यासाठी प्रयत्न करावेत..*

*५)अपंग समावेशीत शिक्षकांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरुन पुढील लाभ मिळावे.*

*६)शिक्षकांवरील बीएल ओ तसेच इतर अशैक्षणिक व आँनलाइन काम कमी करावेत अन्यथा आँनलाइन कामावर बहिष्कार टाकावा.*

*७)आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली प्रक्रीया राबविण्यात यावी.व ३० जून च्या संदर्भ दिनांकावर बदल्या व्हाव्यात.*

*८)संचमान्यते साठी पटावरील संख्या विचारात घ्यावी.तसेच संचमान्यते तील त्रुटी दूर  करण्यात याव्यात.*

*९)नगर पालिका शाळेतील* 

*शिक्षकांचे प्रश्न तसे सातव्या वेतन आयोगाचा फरक भविष्य निर्वाह खाती जमा करणे बाबत पाठपुरावा करणे.*

*११) शिष्यवृत्ती परीक्षा १००℅ अट शिथील करुन शिक्षकांना जबाबदार धरण्याच्या शासन निर्णयाबाबत मा.शिक्षणमंत्री यांची भेट घेणे.*

*१२) शालेय कामाचे दिवस व सुट्टी बाबत एकसमानता आणणे.*

*१३)विभागस्तरीय संघटना सभा आयोजित करुन संघटन कार्याचा नियमित आढावा घेणे.*

*१४) जिल्हा कार्यकारणी कार्यान्वित करुन सभासद संख्या वाढविणे यासाठी संपर्क अभियान राबवणे.तसेच प्रत्येक तालुक्यात शाखा स्थापन करणे*

*आदि प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली*

*🟥प्रमुख उपस्थिती-*

*सभेस राज्य सल्लागार -सुरेश भावसार ,विश्वनाथ सूर्यवंशी जेष्ठ नेते-मोहनबापू थोरात, कार्याध्यक्ष -अण्णाजी आडे, कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील* *उपसरचिटणीस-महेश देशमुख ,महिला विभाग प्रमुख- उर्मिला बोंडे, सचिव-रंजना केणी, सदस्य-वंदना सावंत*

*उपाध्यक्ष- हरिदास घोगरे ,कोकण विभाग प्रमुख -प्रमोद पाटील परमेश्वर बालकुंदे , मराठवाडा विभाग-सुनील हाके ,अनिल महाजन ,रवींद्र काकडे,राजेंद्र निमसे, शिवाजीराव वाळके ,विजय पंडीत, बाळासाहेब कदम, कांचन कडू, सविता पिसे,विलास आळे,संध्या ठाकरे,आदि राज्य पदाधिकारी*

      *तसेच मोहन बिस्नारीया, सोपान चांदे, सुनील कुर्लेकर ,सुरेश पांचाळ, महेश पालव, अशोकराव देसले, अविनाश मोकाशे, सतीश बावणे राकेश गोणेलवार शरद वांढेकर,  सुनील शिंदे, गजानन चौधरी सुभाष सहारे,संगीता साखरे, , संजय साखरे, अशोकराव पठारे, रविकांत आसेकर ,रियाज अन्सारी, उज्वल बोरसे, प्रकाश पाटील, महेश लोखंडे, संतोष ठाणगे,  आदि जिल्हा व नपा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*कल्याण लवांडे* 

*सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, February 9, 2026

TET.मधून सूट देण्यासाठी कायद्यात सुधारणा. AIPTF

 




*अखिल भारतीय शिक्षक संयुक्त कृती  समितीची शिक्षणमंत्री मा.धर्मेद्र प्रधान यांचेशी चर्चा मागण्याचे निवेदन केले सादर...*

> नवी दिल्लीःअखिल भारतीय शिक्षक संघ संयुक्त कार्य समिती (AIJACTO) ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना TET मधून सूट देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची विनंती केली. राज्यसभेचे  सदस्य खा.शिवदासन यांच्या नेतृत्वाखाली, समितीचे सदस्य बसवराज गुरीकर, कमलाकांत त्रिपाठी,नरसिंह रेड्डी  आणि एन. भारती यांनी शुक्रवारी संसद भवनात मंत्र्यांना समक्ष निवेदन सादर केले व चर्चा केली.

 

*🟡१ सप्टेंबरपासून दोन वर्षांच्या आत TET उत्तीर्ण न झाल्यास सेवारत शिक्षकांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकण्यात येईल, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा देशभरातील ३० लाख शिक्षकांवर परिणाम झाला आहे,ही बाब अधोरेखीत केली.*


 *🌀त्याच बरोबर शिष्टमंडळाने नवीन पेन्शन योजना  रद्द करणे, शिक्षक एमएलसी निवडणुकीत प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणातील  सरकारी शिक्षणाला हानी पोहोचवणारे मुद्दे रद्द करणे या प्रश्नी लक्ष वेधले.*


*🟣केंद्रीय शिक्षणमंत्री मा.धर्मेंद्र प्रधान यांनी शिष्टमंडळाला सांगितले की,  टीईटी मुद्द्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर न्यायव्यवस्थेशी   चर्चा करत आहोत.सन २०११ पूर्वीच्या शिक्षकांना सरकार न्याय देण्याच्या भुमिकेत आहे ,असे सांगितले. परंतु पेन्शन बाबतच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगले, पूर्वीच्या सरकारचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.* *🟥त्यानंतर,शिष्टमंडळाने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष मा.मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली. विरोधी पक्षाने टीईटी मुद्द्याचे निराकरण करण्यासाठी व जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करावा अशी शिष्टमंडळाने विनंती केली.*

**************************

*🟣देविदास बस्वदे-राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष*

*🟡कल्याण लवांडे-सरचिटणीस*

 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Wednesday, January 14, 2026

चलो दिल्ली! चलो दिल्ली !!चलो दिल्ली!!!*

 





*चलो दिल्ली! चलो दिल्ली !!चलो दिल्ली!!!*

✊🏽🔰🔰🔰🔰🔰🔰✊🏽✊🏽

`🟣 अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त समिती  काढणार संसदेवर मोर्चा*`

> नवीदिल्ली ः प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त मोर्चाच्या वतीने 5 फेब्रुवारी 2026  रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री बसवराज गुरीकर यांनी कळविले आहे.

*☸️सेवेतील शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा मुक्त करण्याचा निर्णय न्यायालयीन प्रकरणात देण्यात आलेला असून त्याचबरोबर शिक्षणाचे खाजगीकरण, कमी पटाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात येत असून गोरगरिबाचे शिक्षण यामुळे प्रभावित होत आहे या सर्व गोष्टीचा विचार करून देश पातळीवर काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येत संसद घेराव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*

*🌀यापूर्वी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली असून ती न्यायप्रविष्ठ आहे. तसेच २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे  प्रातिनिधिक धरणे करून सरकारला इशारा दिला होता. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान व शिक्षणमंत्री यांना व लोकसभा व राज्यसभेचे सर्व सन्माननीय सदस्य यांना निवेदन देण्यात आले होते.संसदेत त्यावर चर्चा झाली असली तरी ठाम निर्णय शासनाने घेतलेला नाही.*


`🟣मागण्या :-`


*1.सेवेतील सर्व शिक्षकांना TET मधून सूट मिळावी*


*2.NPS/UPS रद्द करा - OPS लागू करा* 


*3.NEP-2020 मागे घ्या*


*4.शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा*


*5.शाळांचे विलीनीकरण  आणि कमी पटाच्या शाळा बंद करणे थांबवा*


*6.अशैक्षणिक कामातून शिक्षकांना   मुक्त करा.*


*7.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि किमान वेतन लागू करा.*


*8.आठव्या वेतन आयोगाची  वेळेवर अंमलबजावणी*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*या शिक्षक हिताच्या प्रमुख मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिक्षक सदर मोर्चात उपस्थित राहातील या दृष्टीने प्रयत्न करावेत .व शिक्षकांच्या विराट शक्तीचे दर्शन घडवावे.*

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

आपले विश्वासू-

*🔴श्री.देविदास बस्वदे*

*राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्याध्यक्ष*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

*🟤श्री.कल्याण लवांडे*

  *राज्य सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Wednesday, December 10, 2025

केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट..

 





*🟣केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*🟥नवीदिल्ली: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय श्री धर्मेंद्र प्रधान यांची आज दि.१०/१२/२०२५ रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली व टिईटी अनिवार्यतेतून शिक्षकांना  वगळण्यासाठी संशोधन बील केंद्र शासनाने संसदेत मांडावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.*

*🟣यावर मा.शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच योग्य तो निर्णय केंद्र सरकार घेईल असे अश्वासन प्रतिनिधी मंडळास दिले.*

*🟥प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उत्तर प्रदेश चे विधानपरिषद  सदस्य मा.श्री.देवेंद्र प्रताप सिंह यांनी केले .समवेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुरीकर, ज्युनिअर हायस्कूल शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.योगेश त्यागी ,उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.विनय तिवारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री.उमाशंकर सिंह जी यांचेसह   पदाधिकारी उपस्थित होते.*

 *☸️अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनाचे तसेच सर्व संसद सदस्यांना दिलेल्या निवेदनाचा परीणाम स्वरूप संसदेच्या दोन्ही सभागृहात टिईटी मुद्दा गाजत आहे .*

*🌀अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही दाखल केलेली आहे.*

*टिईटी प्रश्नी शिक्षकांनालवकरच  योग्य तो न्याय मिळेल असा आशावाद राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बसवराज गुरीकर यांनी व्यक्त केला असून शिक्षकांनी कोणत्याही  प्रकारची  काळजी करू नये  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक हितासाठी सदैव तयार आहे.*


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 *☸️ श्री.देविदास बस्वदे -राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष*

*🌀कल्याण लवांडे-राज्य सरचिटणीस*

  *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Wednesday, November 26, 2025

जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग..

 🌴🌴🌴🌴🌴


*🟣 टीईटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे अंदोलन...*


*जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️🌺🌺


*🟥नवी दिल्ली- टीईटी अनिवार्यतेसंबधी झालेले नवीन संशोधन रद्द करून शिक्षण अधिकार कायदा लागू होण्या पूर्वीच्या शिक्षकांना सेवेत संरक्षण द्यावे तसेच जुनी  पेन्शन योजना लागू करावी या दोनच मागण्यांसाठी देशभरातील हजारो शिक्षकांनी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर वर धरणे आंदोलन केले.*


*🌀एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या पात्रतेविषयी दिलेल्या निकालात दोन वर्षात ज्यांची पाच वर्षापेक्षा अधिक सेवा शिल्लक आहे त्यांना टीईटी अनिवार्य केली .*


*➡️भारत सरकारने यात हस्तक्षेप करून शिक्षकांच्या  सेवेचे संरक्षण पदांचा सन्मान व सुरक्षितता ठेवावी ,सेवाशर्ती च्या आधारे झालेल्या निवडी कायम ठेवावी, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष  देविदास बस्वदे यांनी केली.*


*🌀यावेळी बोलतांना राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी सांगितले की नियुक्ती नंतर पात्रता परिक्षा पुन्हा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना लागू नाही , मग ती फक्त शिक्षकांनाच का?*

*जे टीईटी पात्र आहेत त्यांना पेन्शन नाही.ज्यांना पेन्शन आहे ते टीईटी नाही म्हणून त्यांना नोकरीतून शासन काढत आहे .या शासनाच्या परस्परविरोधी भूमिकेचा  त्यांनी निषेध केला.*


*🟣 फेब्रुवारी 2026 मध्ये रामलीला मैदानावर आक्रोश मोर्चा ,संसदेचा करणार घेराव-*

*या बाबत केंद्रसरकारने गंभीरपणे दखल घेतली नाही तर येत्या फेब्रुवारी महिन्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेचा घेराव करण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गु र्रीकर यांनी दिला.*


*आंदोलनानंतर देशाचे शिक्षणमंत्री मा.धर्मेंद्र प्रधान यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले.*

*आमदार देवेंद्र प्रताप सिंह (उ.प्र) तसेच अँड .विक्रम हेगडे यांनी आंदोलन कर्त्यांना संबोधित केले.*


 *या आंदोलनात राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , संयुक्त सचिवराजेंद्र निमसे, संघाचे जिल्हा नेते संजय शेळके, ऐक्यमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप चक्रनारायण, अखिल पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव ससाणे, श्रीगोदा संघाचे तालुकाध्यक्ष नंदू गायकवाड  आदी पदाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यातून सहभागी झाले होते.*

*************************

        

     *आ स्नेहांकित*


       (*कल्याण लवांडे* )     

       *राज्य सरचिटणीस*


       *(राजेंद्र निमसे )*

        *राज्य संयुक्तसचिव*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

☘️☘️☘️☘️☘️

Sunday, November 16, 2025

चलो दिल्ली !चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!

 






*🟣चलो दिल्ली !चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!*


*टिईटी व जुनी पेन्शन प्रश्नी जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघाचे २४नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन....*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*मा.सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर २०२५ रोजी टिईटी अनिवार्यते संबधी दिलेला निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिध्द कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे अस्तित्व मिटवणारा आहे.*


*🌀या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २५ सप्टेंबर रोजी शिक्षक संघटनेच्या वतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या पाच याचिका संघटना दाखल करत आहे .या संबधी कायदे तज्ञांचा सल्ला संघटना घेत आहे.विविध राज्यांनीही याचिका दाखल केल्या असून देशभरातील समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.*


 *असे जरी असले तरी न्यायालयीन लढाई बरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे .कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही.*

*🌀मा.पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी निवेदन दिले.लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेवून येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.*


*🟣आता २४नोव्हेंबर रोजी देशभरातील शिक्षक प्रातिनिधिक लक्षवेधी धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर वर करणार आहेत.शासनाने आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी च्या शिक्षकांना टिईटी मधून सुट मिळावी यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी ही प्रमुख मागणी असेल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या दोनच प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. .या आंदोलनाचा आपण भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवा ही विनंती.*

*☸️ठिकाण:जंतरमंतर ,नवी दिल्ली*

*☸️वेळः सकाळी १०ते ३:३०वा.पर्यंत*

*अधिकार की लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते,जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन मे आ जाते है*.. !

▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा*

TET आणि जुनी पेन्शन संदर्भात आंदोलन दिल्ली...

 







*🟣चलो दिल्ली !चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!*


*टिईटी व जुनी पेन्शन प्रश्नी जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघाचे २४नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन....*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*मा.सर्वोच्च न्यायालयाने  एक सप्टेंबर २०२५ रोजी टिईटी अनिवार्यते संबधी दिलेला  निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिध्द कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे  अस्तित्व मिटवणारा आहे.*


*🌀या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २५ सप्टेंबर रोजी  शिक्षक संघटनेच्या वतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या पाच याचिका संघटना दाखल करत आहे .या संबधी कायदे तज्ञांचा सल्ला संघटना घेत आहे.विविध राज्यांनीही याचिका दाखल केल्या असून  देशभरातील समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.*


 *असे जरी असले तरी न्यायालयीन लढाई बरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे .कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही.*

*🌀मा.पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी निवेदन दिले.लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेवून येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.*


*🟣आता २४नोव्हेंबर रोजी देशभरातील शिक्षक प्रातिनिधिक लक्षवेधी धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर वर करणार आहेत.शासनाने आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी च्या शिक्षकांना टिईटी मधून सुट मिळावी यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी ही प्रमुख मागणी असेल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या दोनच प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. .या आंदोलनाचा आपण भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवा ही विनंती.*

*☸️ठिकाण:जंतरमंतर ,नवी दिल्ली*

*☸️वेळः सकाळी १०ते ३:३०वा.पर्यंत*

*अधिकार की लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते,जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन मे आ जाते है*.. !

▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा*

Sunday, October 12, 2025

टिईटी TET प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे

 *🟡चलो दिल्ली....*

*टिईटी प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे....*

*अखिल भारतीय  प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय....*




▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*🟥नवी दिल्ली ः अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे ऑनलाइन सभा 12 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत काही महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.*

*🟣 टीईटी प्रश्नी व जुनी पेन्शन योजनेसाठी 24 नोव्हेंबरला जंतरमंतरवर करणार धरणे आंदोलन--🌀*

*एक सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ज्यांची सेवा ५वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना तसेच पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे .दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण  न झाल्यास सेवा मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.*

*याविरुद्ध संघटनेने पुनर्विचार याचिका तारखेला आहे .त्याचबरोबर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनावर दबाव निर्माण करण्यात येत आहे.*

*या विरोधात आंदोलनाचं हत्यार संघटनेने उपसले आहे.टिईटी प्रश्न व जुनी पेन्शन योजना या दोनच विषयावर 24 नोव्हेंबर रोजी देशभरातील जवळपास 25 हजार  प्राथमिक शिक्षक जंतर-मंतरवर दोन दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत..*

*🟣फेब्रुवारी मध्ये होणार जेलभरो....*

*यानंतर संसदेच्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अधिवेशन कालावधीत देशभरातील लाखो शिक्षक संसदेला घेराव घालून जेलभरो आंदोलन करणार आहेत.*

*➡️यापूर्वी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.पंतप्रधान व मा.केंद्रीय शिक्षणमंत्री यांना तसेच मुख्यमंत्री यांना याप्रश्नी शासनाने हस्तक्षेप करावा म्हणून निवेदन दिले आहे.व राज्य भर स्वाक्षरी मोहीम राबवली.*

*🌀अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जो पर्यंत शिक्षकांना न्याय मिळत नाही. तो पर्यत हा लढा सर्व पातळीवर लढेल असे राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी यावेळी बोलतांना सांगितले.*

*यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदास बस्वदे राष्ट्रीय सचिव तथाराज्य कोषाध्यक्षा  विनय पेडणेकर राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांची उपस्थिती होती.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*कल्याण लवांडे*

*राज्य सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, October 6, 2025

आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे..

 *आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे* 





२० व्या शतकातील प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्रातील अनेक शिलेदार अधोरेखित आहेत. आचार्य मो. वा. दोंदे हे त्यापैकीच एक. त्यांचे संपूर्ण नांव मोरेश्वर वासुदेव दोंदे. *दादासाहेब* या आदरयुक्त उपाधीने ते परिचित राहिलेले आहेत.  ते मुळचे ठाणे जिल्ह्यातील.४ आँगस्ट १८९४ ही त्यांची जन्म तारीख. विल्सन काँलेजमधून १९१५ साली, त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली.  नामदार गोपाळ क्रुष्ण गोखले यांंची विचारश्रुष्टी व प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अथक कर्तृत्वातून, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापन झालेली होती. त्या संस्थेच्या मुंबईतील परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये आचार्य दोंदे यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. १९२८ ते १९५४ या काळात त्यांनी उपरोक्त शाळेत प्राचार्यपद  सांभाळलं.

 मोरेश्वर यांचे ना.म.जोशी यांच्या समाज सेवा संघाच्या कार्यालयात नेहमी जाणेयेणे असे. बाबासाहेबही जोशींच्या कार्यालयात कधीकधी जात असत. त्याच कार्यालयात मोरेश्वर यांची बाबासाहेबांशी भेट झाली. गांधीजींच्या दलितोध्दाराच्या संकल्पनांपेक्षा बाबासाहेबांची ध्येयधोरणं आणि विचार प्रभावी व ठोस असल्याचे मोरेश्वर यांना जाणवले.मोरेश्वर बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले. दलितोध्दारासाठी गांधीजींचा हरिजनोध्दाराचा मार्ग कुचकामी व बेगडी असल्याचे मोरेश्वर यांची पक्की खात्री झाली. ते गांधीजींपासून, त्यांच्या विचारांपासून आणि पर्यायाने काँग्रेसपासून राजकीयदृष्ट्या बाजूला होऊ लागले. त्यांच्या मनावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा बसू लागला. ते काँग्रेस पक्षापासून १९२८ साली कायमचे व पूर्णतः अलिप्त झाले. आता ते जनमानसात ' *दादासाहेब* ' म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले होते.

 कधी समाज सेवा संघाच्या कार्यालयात, तर कधी बाबासाहेबांच्या कार्यालयात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, अनंतराव चित्रे, भास्करराव कद्रेकर, कमलाकांत चित्रे, दत्तात्रय प्रधान, रामचंद्र कवळी आणि दादासाहेब दोंदे यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक गप्पा होऊ लागल्या.

 एव्हाना बाबासाहेब आणि दादासाहेब यांचे संबंध खूपच दृढ झाले होते. त्या दोघांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता.

      

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक  संघ ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी शिक्षक संघटना १९१० साली स्थापना झाली .त्याकाळी स्वातंत्र्य चळवळ उभारणे हा एकमेव हेतू होता .मुंबई इलाखा प्राथमिक शिक्षक संघ नावाने संघटनेची स्थापना झाली होती.

सन १९४५ ला मुंबई राज्य प्राथमिक शिक्षक संघ अशी पुनर्रचना करण्यात आली,व पहिंले अधिवेशन पुणे येथे घेण्यात आले ,अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक आचार्य दादासाहेब उर्फ मो.वा.दोंदे हे होते.पहिली मागणी शिक्षकांचा पगार १५ रु.वरुन ३० रु.करणे त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी, त्यांनी शिक्षकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला होता.कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांची साथ संपाला लाभली.  संपाच्या परिणामातून शिक्षकांच्या मुलभूत मागण्यांंची दखल, स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीतील सरकारला घ्यावी लागलेली होती. त्यांनी अव्याहतपणे शैक्षणिक कार्यात स्वताला झोकून दिलेलं होतं. सेवानिव्रूतीच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेलं उत्पन्नही, त्यांनी विविध शाळांना दान म्हणून दिलेलं होतं. 

७ जानेवारी १९५४ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना नागपूर येथे तत्कालीन प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत झाली.तेव्हापासून दर दोन वर्षाला संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन होते.सन १९६०ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाने महाराष्टात संघटनेच नामकरण झालं.


  बाबासाहेबांनी १५ आॅगस्ट १९३६ रोजी ' *स्वतंत्र मजूर पक्षाची* ' स्थापना करीत असल्याची घोषणा केली. त्यांची या पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली, तर पक्षाचे *उपाध्यक्ष* म्हणून मोरेश्वर वासुदेव अर्थात *दादासाहेब दोंदे* यांची निवड करण्यात आली. त्यावरूनच बाबासाहेबांचे आणि दादासाहेबांचे संबंध किती घनिष्ठ होते याचा प्रत्यय येतो. स्वतंत्र मजूर पक्षाला १९३७ सालच्या मुंबई इलाख्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.


 बाबासाहेबांनी लिहिलेल्या 'थाॅट्स आॅन पाकिस्तान' या ग्रंथावर मुंबईतील हेमंत व्याख्यानमालेत वागळे हाॅलमध्ये १८ ते २० फेब्रुवारी १९४२ या तीन दिवशी परिसंवाद झाला. या तीनही दिवसातील परिसंवादाचे अध्यक्ष दादासाहेब दोंदे होते.

बाबासाहेब कायदेमंत्री असताना मुंबईतील एका भेटीदरम्यान त्यांनी दादासाहेबांना राष्ट्रीय कामगार आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी मुंबईमध्ये ' *पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस)* या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. संस्थेच्या पहिल्या कार्यकारी मंडळावर निस्पृह आणि विश्वासू असलेले दादासाहेब दोंदे यांची सचिव म्हणून निवड केली. बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा पीईएसच्या कार्यकारिणीची बैठक होई. या बैठकीला दादासाहेब न चुकता हजेरी लावत.


मास्तरकीच्या नोकरीवर त्यांचे सर्वात जास्त प्रेम होते. मास्तर या शब्दाची व्याख्या ते ' *मायेचे अस्तर पांघरणारा तो मास्तर* ' अशी करीत असत.


बासाहेबांनी आपला मुलगा यशवंत तथा भैय्यासाहेब यांस, दोंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. भट हायस्कूलमध्ये दाखल केलेलं होतं. आचार्य दोंदे सर, हे प्रभावी वक्ते होते. त्यांचे विवेचन चिंतनगर्भ असे. १९४२ साली डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला होता.  त्या समारंभाचे अध्यक्षस्थान दोंदे सरांनी भुषविले होते.  " *डॉ. आंबेडकरांचे संर्घशमय कार्य हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्वपुर्ण ठरते आहे* ." असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. १९४८ साली त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या सुविद्य सहचारिणी, सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ आर. एम. भट. हायस्कूलमध्ये घडवून आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुुंबईतील 'राजग्रुह' हे निवासस्थान त्यांच्या हजारो दुर्मिळ ग्रथांचे माहेरघर होतं. त्या ग्रंथालयातील पंचवीस हजार ग्रंथांची क्रमवार सूची तयार करण्यात, दोंदे सरांचा मोलाचा सहभाग राहिलेला होता.

 १४ आँक्टोंबर १९५६ रोजी, बाबासाहेबांनी बुद्धधम्माची नागपुरात दिक्षा स्वीकारली. त्या धर्मांतराचे समर्थन व स्वागत करणारे पत्र, दोंंदे सरांंनी बाबासाहेेबांंना पाठविलेे होतेे.


 ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. ७ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर आंदरांजली सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड,  प्र. के. अत्रे आणि आचार्य दोंदे यांसह काही मोजक्याच धुरीणांची शोक प्रकट करणारी भाषणं, सदर सभेत झाली होती. त्यावेळी आचार्यांनी अत्यंत भावोत्कट असं मनोगत व्यक्त केलेलं होतं.


प्रिन्सिपाल मो. वा. दोंदे यांचे मुंबईत नभोवाणीवर बाबासाहेबांच्या वर भाषण झाले.  ते 'नवशक्ति च्या ८ डिसेंबर १९५६ च्या अंकात दुसऱ्या पानावर प्रसिद्ध झाले.

प्राचार्य दोंदे यांनी गुरुवारी मुंबई आकाशवाणी केंद्रावर बाबासाहेबांना आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहाणारे भाषण केले होते‌.त्यात त्यांनी त्यांच्या धर्मांतराच्या तत्त्वज्ञानाची साधकबाधक विचारांची चर्चा केली होती.   


१९५७ च्या  विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांत संयुक्त महाराष्ट्र समितीला दणदणीत यश मिळाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत १३१ जागा होत्या. त्यापैकी ७२ जागा समितीला आणि ५७ जागा काँग्रेसला मिळाल्या.

महापौरपदाच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार आचार्य दोंदे ७७ मते मिळवून विजयी झाले.  


अशा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीच्या क्रुतीशील समर्थकाचे ७ ऑक्टोबर सन १९६४ला मुंबईत निधन झाले.


संदर्भ : चांगदेव भवानराव खैरमोडे,भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२

डाॅ.बाबासाहेब.आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी.- योगीराज बागुल

Thursday, October 2, 2025

TET आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

 *संघ शक्ती, युगे युगे*

*टी ई टी व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ.....*

    *--------------------------------------*



 *4 -ऑक्टोबर 2025 चा महाराष्ट्र मध्यवर्ती शिक्षक संघटनेचा मूक मोर्चा स्थगित करण्यात यश मिळाले. टी ई टी बाबत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे आज संपूर्ण देशात रण माजले असतांना व टी ई टी हा सर्व शिक्षकांच्या गळ्यातील फास झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व शिक्षक तारणहार म्हणून सर्व संघटनाकडे शिक्षक मोठ्या अपेक्षेनी बघत आहेत. आणि झाले ही तसेच, बऱ्याचश्या संघटना ह्या आपल्या राज्याच्या पुनर्विचार याचिकेची वाट बघतांना दिसतात.*

    *मुकमोर्चा काढायचा म्हटला पण तो स्थागित झाल्यावर त्यावरती पण राज्य संघटना होकार दर्शविल्यानंतर आता शिक्षकांकडून प्रश्न विचारल्या जात आहे.* 

*जर राज्य सरकार कडून* *30 दिवसानंतर न्यायालयात याचिका घातल्यास ती स्वीकार होणार काय?*

*महाराष्ट्र राज्याच्या विरुद्धच निर्णय* *असल्यामुळे पुढे काय*

   अश्या अनेक प्रश्नांमुळे शिक्षक पुर्णतः नैराश्येत आहे.

    आणि त्यामुळेच आज सर्व राज्य संघटना अखिल भारतीय शिक्षक संघाशी जुळवून घेतांना दिसत आहेत. त्यांची स्तुती करत आहेत. कारणही तसेच आहे.

*जिथे मोठ्या- मोठया नी पाठ फिरवली तिथे 25 ते 30 लक्ष रुपये खर्चून सर्व शिक्षकांसाठी टी ई टी विरुद्ध याचिका घालणारी* व *लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भरतीय प्राथमिक शिक्षक संघटना*.आणि पुढे याच याचिकेवर सर्व कायद्याची बाब सर्वांना लढविणे आहे.

आणि त्यामुळेच सर्व राज्यांना आता देश पातळी पासून ते जिल्ह्या पर्यंत एकच आशेचा किरण आहे.तो म्हणजे

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

 त्यामुळे सर्वांनी पुढील लढ्यासाठी *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघांनी पुढील लढ्यासाठी जी हाक दिली त्या हाकेस आपला लढवय्या बाणा दाखवून व निराश न होता सोबत साथ द्यावी हिच नम्र विनंती*.


*शिक्षक हितासाठी सदैव सेवेत*


*अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघ महाराष्ट्र*

     *सर्व सन्माननीय शिक्षक बंधू/भगिनींना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक -हार्दिक शुभेच्छा!!*

  *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ...

   🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, September 26, 2025

टिईटी TET exam प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

 *संघ शक्ती युगे युगे!!*

*शिक्षक एकता जिंदाबाद...*

************************************

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

*🟣टिईटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


*नवी दिल्ली-देशातील प्राथमिक शिक्षकांना  (१ली ते ८वी) शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणारा निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने १सप्टेंबर २०२५  निर्णयाने दिलेला आहे.यामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून यामुळे देशभरातील लाखो शिक्षक प्रभावित झालेले आहे.*

*ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे त्यानांच फक्त सूट मिळाली असून बाकी शिक्षकांना दोन वर्षांत टिईटी करणे बंधनकारक केले आहे.*

 *🌀या विषयी अखेल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देवून सदरील प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.तसेच लोकप्रतिनिधी यांना भेटुन निवेदन देण्यात येत आहेत.*


*🟣अखेर २५ सप्टेंबर पुर्वी याचिका दाखल-*

*सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एक महिन्याच्या आत रिव्हिव पिटीशन दाखल होणे आवश्यक असते त्यानुसार दि. २५ सप्टेंबर २०२५रोजी  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने  मा.सर्वोच्च न्यायालयात "रिव्हिव पिटीशन" दाखल केली  आहे.यासाठी माजी अँटनी जनरल मुकुल रोहतगी तसेच माजी सॉलिसिटर जनरल मा.संतोष हेगडे हे ख्यातनाम वकील शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर तसेच राष्ट्रीय सचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी सांगितले आहे.*


*🟣उत्तर प्रदेश शासनानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची  दुसरी याचिका मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.यावरून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच कठीण काळात शिक्षकांसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.*


*🟠राज्यातील शिक्षकांना आवाहन-*

*राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या नौकरी विषयी कोणतीही भिती बाळगू नये.शिक्षकांच्या  व शिक्षणाच्या न्याय मागणीसाठी आपले हक्क आबादीत ठेवण्यासाठी संघटना कायम आपल्या सोबत आहे.संघटीत व्हा ,संघटनेवर विश्वास ठेवा शिक्षकांच्या अस्तित्वाच्या लढाईत सहभागी व्हा!!*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


 *मा.दिपक भुजबळ महाराष्ट्र राज्य*उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख*

 .

 **मा संतोष लोहार राज्य संघटक* 


 *मा.गणेश जाधव अध्यक्ष**


**मा. विजयकुमार भुजबळ*  *सरचिटणीस**


 *मा.कृष्णत हिरवळे कार्याध्यक्ष* 


 *मा.रवींद्र लटिंगे** 

*मा.सुशांत येवले* ,

*मा.उद्धव पवार जिल्हा उपाध्यक्ष** 

आणि सर्व जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी सदस्य..

🙏🙏



*अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ*


Saturday, September 20, 2025

TET परीक्षा पुनर्विचार संदर्भात निवेदन सातारा जिल्हा

 




*टीईटी सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सातारा शाखा यांचेवतीने  जिल्हाधिकारी सातारा मार्फत थेट पंतप्रधान यांना निवेदन.*


सर्वोच्च न्यायालयाने नुकताच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा व पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीचा निर्णय दिला आहे.सदरचा निर्णयावर देशभरातील शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने याबाबतीत अनेक संघटनांमध्ये मत भिन्नता दिसून येत आहे.सदरचा निर्णय व्यवहार्य नसल्याचे शिक्षक संघटनांचे मत आहे.याबाबत देशपातळीवर कार्यरत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षकांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होईल.एकूणच शैक्षणिक गुणवत्ता ढासळून शिक्षणव्यवस्था धोक्यात येण्याची भीती संघटनेमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.आज देशभरातील सर्व जिल्ह्यात अखिल भारतीय संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.अखिल सातारा जिल्हा  प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ,अध्यक्ष गणेश जाधव, कार्याध्यक्ष कृष्णात हिरवळे. सरचिटणीस विजय भुजबळ,राज्य संघटक संतोष लोहार.सातारा तालुका अध्यक्ष बसवराज दोडमनी यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

TET संदर्भात निवेदन भंडारा जिल्हा..

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा देशव्यापी राज्या-राज्यातून लढा...........*



  *दिनांक -०१सप्टेंबर २०२५ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील प्राथमिक शिक्षकांना TETपरीक्षा सक्तीची केली असल्याचा निकाल दिला आहे.सदर निकालात हस्तक्षेप करून पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी विनंती करणारे पत्र देशाचे मा. पंतप्रधान,मा . शालेय शिक्षणमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघा कडून नियोजन करण्यात आले.त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने १९/२० सप्टेंबर यापैकी आपल्या स्तरावरून सोयीनुसार निवेदन द्यायचे ठरवले..अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे आव्हाना नुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भंडारा च्या वतीने आज दिनांक -२०/०९/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजता भंडारा जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी माननीय लिना फलके मॅडम यांचेमार्फत टी ई टी रद्दबाबत भारताचे प्रधानमंत्री मा . नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री मा .धर्मेंद्र प्रधान  व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.*

 *टीईटी असो किंवा जुनी पेन्शन केंद्रापासून ते जिल्ह्यापर्यंत लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ. भविष्यातील आपल्या नोकरीवर येणारे संकट लक्षात घेऊन टी ई टी बाबत देशभर लढा सुरू केलेला आहे.*

  *भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अशी आग्रहाची विनंती आहे की, आपणही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात एकसंघ होऊन हा लढा जोमाने लढूया परत एकदा नम्र विनंती करण्यात येते की, आपण आपल्याकडे येणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करून संघटनेचे सभासद होण्यासाठी व लढ्यासाठी निस्वार्थपणे मदत करावी. आज टी ई टी आणि अशाच प्रकारची अनेक संकटे  ओळखून अनेक जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व शिक्षक अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेतृत्वावर विश्वास घेऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी जुडतांना दिसून येत आहेत. आपणही या लढ्यात एकजुटीने सहभागी व्हावे.हिच नम्र विनंती.*

    *यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे श्री.मनोहर कहालकर जिल्हाध्यक्ष, श्री.देवानंद दुबे जिल्हा सरचिटणीस, श्री.लोकेश गायकवाड राज्य हिशोबनिस,सौ.रोहीनीताई खोकले मॅडम महिला राज्यपदाधिकारी , श्री.नरेंद्रजी रामटेके सर , श्री.गणेशजी खोकले सर,श्री.लक्ष्मणजी ईश्वरकर सर, श्री.विजयभाऊ जाधव सर, श्री.किरणभाऊ मेश्राम सर, श्री.आशिषकुमार मेश्राम सर, श्री.रामभाऊ गेडाम सर, श्री.टेकरामजी झलके सर, श्री.सुखदेवे सर उपस्थित होते.*

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

  शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न दि. १४ जुलै २०२६ आज दि. १४ जुलै २०२...