*टीईटी सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सातारा शाखा यांचेवतीने जिल्हाधिकारी सातारा मार्फत थेट पंतप्रधान यांना निवेदन.*
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा व पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीचा निर्णय दिला आहे.सदरचा निर्णयावर देशभरातील शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने याबाबतीत अनेक संघटनांमध्ये मत भिन्नता दिसून येत आहे.सदरचा निर्णय व्यवहार्य नसल्याचे शिक्षक संघटनांचे मत आहे.याबाबत देशपातळीवर कार्यरत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षकांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होईल.एकूणच शैक्षणिक गुणवत्ता ढासळून शिक्षणव्यवस्था धोक्यात येण्याची भीती संघटनेमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.आज देशभरातील सर्व जिल्ह्यात अखिल भारतीय संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ,अध्यक्ष गणेश जाधव, कार्याध्यक्ष कृष्णात हिरवळे. सरचिटणीस विजय भुजबळ,राज्य संघटक संतोष लोहार.सातारा तालुका अध्यक्ष बसवराज दोडमनी यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment