Wednesday, July 20, 2022

राष्ट्रीय कार्यकारिणी सभा दिल्ली AIPTF

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणी ची बैठक संपन्न...*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*नवी दिल्ली ः अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा रविवार दि.१७ जुलै २०२२रोजी जगदीश मिश्रा शिक्षक भवन जनकपुरी, नवीदिल्ली येथे स.११:००वा.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रामपाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासचिव श्री.कमलाकांतजी त्रिपाठीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाली..या बैठकीस महाराष्ट्रासह २५ राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.*

➡️ *सभेपुढील विषयः*
*१) बोध गया येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणी सभेचे इतिवृत्तास मान्यता देण्यात आली.*

*२) अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आंदोलन निधी पोटी प्रत्येक राज्याकडून प्रतिसभासद १रु.प्रमाणे संघर्ष  निधी उभा करण्यास मान्यता देण्यात आली.*

🔴 *३)आंदोलनाबाबत---- *१)जुनीपेन्शन योजना लागू करणे २)समान काम समान वेतन३) सर्व कंत्राटी शिक्षकांना नियमित करणे४) नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी काढण्यात याव्या या प्रमुख मागण्यासाठी माहे आँगस्ट२०२२ मध्ये स्वाक्षरी मोहीम राबवून५ सप्टेंबर  शिक्षक दिनी मा.पंतप्रधान ,महामहीम राष्ट्रपती व संबधीत राज्याच्या मुख्यमंत्री महोदय  यांना  निवेदन देण्यात येईल.          तसेच १५ते २० सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे.*

     ⏺️ *राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्य स्तरीय आंदोलन माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात येणार आहे.*
       ➡️ *तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये संसदीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्तरावर नवीदिल्ली येथे राष्ट्र व्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा ठराव संमत करण्यात आला.*

*🔴४)अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन-अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरात मध्ये घेणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.त्यासंबंधी तारखा लवकरच निश्चित करण्यात येतील.*

▶️ *५) जनरल कौन्सिल सभाः पुढील जनरल कौन्सिल सभा ३ते५ नोव्हेंबर २०२२ रोजी  मेघालय (शिलाँग) येथे घेण्याचे निश्चित करण्यात आली.*

➡️उपस्थित ः
      *या बैठकीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.देविदास बस्वदे,कार्याध्यक्ष-आण्णाजी आडे, हरीगोविंदम  (केरळ) ,बसवराज गुरीकर (कर्नाटक) एन.रंगराजन (तामिळनाडू)रामचंद्र दबास (दिल्ली) श्री.दिग्विजय सिंग जडेजा (गुजरात) श्री.राम आवतार पांडे (बिहार) रुतुल गोस्वामी,निलाक्षी गोगाई (आसाम), मि.शुलाई (मेघालय)अशोक चौहान (उतराखंड) के .शारदा (तेलंगाणा) ,हेमराज ठाकूर (हिमाचल प्रदेश ),सुशिलकुमार पांडे (उ.प्र.) हरीश मारन (म.प्र),विनोद ठकरान (हरियाणा), योगेद्र तिवारी (झारखंड) ,कल्याणी देवी (मणीपुर),सुभाष चंदर(पंजाब)चंद्रप्रकाश शर्मा (राजस्थान) श्रीम.गिता पांडे, मीना शर्मा(उत्तराखंड) निमईचंद्र  मंडल (पं.बंगाल)  आदि विविध राज्यातील संघटना प्रतिनिधी उपस्थित होते..*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
   *श्री.कल्याण लवांडे*
          *सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

No comments:

Post a Comment

मतदानानंतर 21 नोव्हेंबर सुट्टी बाबत..

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येते की संदर्भिय पत्रा नुसार शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...