Wednesday, July 20, 2022

अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ यांची पुणे भेट

*जय अखिल*
💐💐💐💐💐💐💐💐
*अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची भेट.....*
      अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने काल दि.19/07/2022 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी महोदयांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध कामांविषयी चर्चा केली तसेच प्रलंबित कामाबाबत पाठपुरावा करणेसाठी विनंती करण्यात आली  व सदरबाबत त्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
    *भेटीवेळी उपस्थित अधिकारी महोदय*
*मा. रणजितसिंह देओल,*
 मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य.
*मा. कैलास पगारे*
राज्य प्रकल्प संचालक, MPSP मुंबई
*मा. सुरजकुमार मांढरे*
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
*मा. एम. डी. सिंह*
संचालक, SCERT पुणे
*मा. महेश पालकर*
संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे
*मा. देविदास कुलाल* 
संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे
*मा. दिनकर पाटील*
संचालक, निरंतर शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
*मा. रमाकांत काठमोरे* 
संचालक, मिपा, संभाजीनगर
      तसेच मा. नेहा बेलसरे, मा. नामदेव माळी, मा. विकास गरड , मा. दत्ता कठाळे हे ही मान्यवर उपस्थित होते.
      *सदर भेटीवेळी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. दिपक भुजबळ, सातारा जिल्हा अध्यक्ष, मा. संजीवन जगदाळे, सातारा जिल्हा सरचिटणीस, अजित राक्षे हे पदाधिकारी उपस्थित होते..*

 *भेटीदरम्यान खालील विषयावर चर्चा करण्यात आली.* 

👉🏻ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी सद्या शिक्षकांची माहिती अपडेट केली जात आहे. अखिल संघाकडे अनेक शिक्षकांनी दिलेल्या सेवाज्येष्ठता संदर्भातील तक्रारीनुसार *सध्याच्या शाळेवरील रूजू दिनांक* विषयी एकवाक्यता आणण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.. याबाबतीत अवघड क्षेत्रातील कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा व सदर प्रश्नाची गंभिरता लक्षात आणून द्यावी अशी संघाने विनंती केली.

👉🏻पगारासाठी ZPPFMS प्रणाली कार्यान्वित करताना पगारातून होणार्‍या कपाती BDO साहेबांच्या खात्यावरच जमा करण्यात येतील.

👉🏻सातवा वेतन आयोग फरक जमा व रोखीचा दुसरा हप्ता जूलै महिन्याच्या पगारापुर्वीच प्राप्त व्हावा.

👉🏻 DCPS कपातीचा हिशोब मिळणे व NPS खाते उघडणे बाबत चर्चा झाली..

👉🏻 शालेय पोषण आहाराची प्रलंबित देयके लवकरात लवकर प्राप्त व्हावीत यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही मा. कुलाळ साहेब यांनी दिली.

👉🏻  चालू वर्षाचे व मागील वर्षाचे  देखिल परत गेलेले संयुक्त शाळा अनुदान मिळावे याबाबत चर्चा झाली .
💐💐💐💐💐💐💐
       *याप्रकारे निवेदने सादर करीत कालच्या भेटीत चर्चा करण्यात आली...*
        *तसेच अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सातारी कंदी पेढे, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अजित राक्षे
सरचिटणीस
अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

No comments:

Post a Comment

मतदानानंतर 21 नोव्हेंबर सुट्टी बाबत..

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येते की संदर्भिय पत्रा नुसार शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...