Monday, April 28, 2025

अखिल सांगली प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष निवड

 






*आज सांगली येथे मार्गदर्शक सदाशिवराव मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.देविदास बस्वदे,उपाध्यक्ष दिपक भुजबळ, माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, तुका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मोहीते पाटील सरांनी टिम अखिलचे मनस्वी स्वागत केले.*

*तदनंतर अखिल सांगली जिल्हा कार्यकारीणीची मोहीते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली   अखिल सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मुकूंद पंडीत तसेच सरचिटणीस पदी संतोष आंबे यांची निवड करण्यात आली.*यावेळी सदाशिव मोहीते,जिल्हानेते भानूदास चव्हाण, प्रकाश सुतार,प्रकाश कुचकर, सिद्राम मलमे यांची उपस्थिती होती*

Saturday, April 26, 2025

देविदास बसवदे यांची सदिच्छा भेट

 






*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष* तथा *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बसवदे* यांचा आज *सातारच्या राजधानीत*   *शाल श्रीफळ व सातारच्या सहवासात* हे पुस्तक देऊन अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार मार्गदर्शक *शंकरराव भुजबळ* आप्पा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर *राज्य संघटक चंद्रकांत मेकाले सर* यांचा राज्य उपाध्यक्ष तथा पश्चिम विभाग प्रमुख *दीपक जी भुजबळ* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

 *अखिलचे संघटक तुकाराम पाटील* सर यांचा सत्कार अखिल सातारा प्राथमिक संघाचे सरचिटणीस *विजयजी भुजबळ* यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

याप्रसंगी अखिल सातारा *प्राथमिक संघाचे मार्गदर्शक हनमंत नलवडे सर , किरणजी भुजबळ* आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदासजी बसवदे यांच्या हस्ते इयत्ता 5 वी मधील *शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विजय* *भुजबळ* यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..

Wednesday, April 16, 2025

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ..शिक्षक संघटना समवेत शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांची बैठक संपन्न.

 





*शिक्षक संघटना समवेत शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांची बैठक संपन्न..*

*_अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ _*

  ====================

      आज मंगळवारी (दि. १५ एप्रिल २०२५) शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा केली.

१.  अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे. 

 २.  शाळा स्तरावरील १५ समित्या रद्द करून ४ समित्यांमध्ये कार्यान्वित ठेवणे. 

 ३. ऑनलाईन कामकाज कमी करणे. 

४.  विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे.

 ४. संचमान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे ..१५/०४/२०२४ संच मान्यता निकष शासन आदेश निकष दुरुस्ती करणे बाबत.

     या विषयांवर मा. शालेय शिक्षणमंत्री *ना. दादाजी भुसे* यांनी संघटनांना मार्गदर्शन केले, सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे विचार व समस्या ऐकून घेतल्या व त्यावर अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्या संदर्भात आदेश दिले.

         या बैठकीसाठी शिक्षण आयुक्त *मा. सचिंद्र प्रताप सिंह*, SCERT चे संचालक *मा. राहुल रेखावार*, उपसचिव *मा. समीर सावंत*, उपसचिव *मा. तुषार महाजन*, प्राथमिक शिक्षण संचालक *मा. शरद गोसावी* उपस्थित होते.

   यावेळी *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा* चे प्रदेशाध्यक्ष *मा.देविदासराव बस्वदे* राज्य सरचिटणीस *मा.कल्याण लवांडे* यासह राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

   अखिल महाराष्ट्र  प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने *प्रदेशाध्यक्ष मा.देविदासराव बस्वदे* यांनी अशैक्षणिक कामे, शाळा स्तरावरील विविध समित्या, संचमान्यता, आधार आधारित संचमान्यता, शाळांतील विविध जुनी उपकरणे व वस्तुंचे निर्लेखन, शालार्थ वेतन प्रणाली, शाळांच्या भौतिक विकासासाठी आवश्यक सुविधा, BLO, U-DISE, Saral, Apar ID, SQAAF, शिक्षकांना ग्रामसभेसाठी दिल्या जाणाऱ्या नियुक्ती, घरकुल प्रमाणपत्र वितरण, ग्राम पंचायत प्रशासक अशा विविध विषयांवर भूमिका विशद केली.

*"""""""""""""""""""''"""*

Monday, April 7, 2025

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक संपन्न...

 







🌴🌴🌴🌴🌴

*Education International*

🛑 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक संपन्न...*

▪️▪️🇳🇪🇳🇪▪️▪️

❇️ *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची( Executive committee)सभा शिक्षक सदन ,बेंगलोर , राज्य - कर्नाटक येथे ५ व ६ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाली .*


*🔴दि.५एप्रिल रोजी शिक्षण शैक्षणिक चर्चासत्रा मध्ये  "नवीन शैक्षणिक धोरण- २०२० आव्हाने "या विषयावर विविध राज्याची स्थिती जाणून घेण्यात आली.तसेच नवीन पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे,  भविष्यातील शैक्षणिक समस्या  उपाययोजना ,शिक्षण सेवक पद्धत, शिक्षकांची रिक्त पदे व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक संघटनेची भुमिका यावर विचार विनिमय करण्यात आले.*


*🟡६ एप्रिल २०२५ रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा राष्ट्रीय अध्यक्ष श्री बसवराज गुरीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेसाठी महाराष्ट्रातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री देविदास बस्वदे, राष्ट्रीय सह सचिव-श्रीमती.विनयश्री पेडणेकर व राज्याचे सरचिटणीस कल्याण लवांडे हे  उपस्थित होते.*

▪️▪️▪️▪️▪️


*Forwarded by*


        *(राजेंद्र निमसे )*

      *राज्य संयुक्तसचिव*

 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ* 

तथा

          *( संचालक )*

 *प्राथमिक शिक्षक विकास मंडळ : जिल्हा अहिल्यानगर*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Thursday, April 3, 2025

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक.





 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक...*

▪️▪️▪️▪️▪️🇳🇪🇳🇪▪️▪️▪️

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची( executive committee)सभा शिक्षक सदन बेंगलोर कर्नाटक येथे ५ व ६ एप्रिल २०२५ रोजी संपन्न होत आहे .या सभेसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची राष्ट्रीय  कार्यकारणीचे सदस्य  व प्रत्येक राज्याचे अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.*


*🔴दि.५एप्रिल रोजी शिक्षण शैक्षणिक चर्चासत्र होणार असून "नवीन शैक्षणिक धोरण- २०२० आव्हाने "या विषयावर विविध राज्याची स्थिती जाणून घेण्यात येईल.तसेच नवीन पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे,  भविष्यातील शैक्षणिक समस्या  उपाययोजना ,शिक्षण सेवक पद्धत, शिक्षकांची रिक्त पदे व गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी शिक्षक संघटनेची भुमिका यावर विचार विमर्श होणार आहे.*

*🟡६ एप्रिल रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सभा राष्ट्रीय अध्यक्ष श्री बसवराज गुरीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या सभेसाठी महाराष्ट्रातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री देविदास बस्वदे, राष्ट्रीय सह सचिव-श्रीम .विनयश्री पेडणेकर व राज्याचे सरचिटणीस कल्याण लवांडे हे  उपस्थित रहाणार आहेत.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Wednesday, March 19, 2025

ग्रामविकासमंत्री यांची शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात बैठकसंपन्न

 जय अखिल..




*ग्रामविकासमंत्री यांची शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात  बैठकसंपन्न..*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*🔴राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विविध मागण्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती .* 


*यावेळी खालील मुद्दे वर चर्चा झाली*

*१) जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रक्रीयेसाठी ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी- याबाबत महाराष्ट्र शासन बदली धोरण ३१ मे ही बदली दिनांक ग्राह्य धरलेला आहे.तरी संघटनांच्या विनंतीवरून ५३वर्ष वयासाठी ३०जून दिनांक धरण्याबाबत चर्चा झाली त्यास मंत्रीमहोदय यांनी अनुकुलता दाखवली आहे.*


 *२) सर्व प्रकारच्या पदोन्नती करणेबाबत-- या बदली प्रक्रियेपूर्वी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक या सर्व पदांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी . याबाबत चर्चा झाली त्यास सचिव यांनी तात्काळ सर्व जि.प यांना आदेशित करु असे सांगितले.*     


*३) दुर्धर व गंभीर आजार असणाऱ्या  पाल्यांच्या शिक्षक पालकांना जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एकचा लाभ देण्यात यावा याबाबत चर्चा झाली .*


*४) सन २०१८ व सन २०२२ च्या अवघड क्षेत्राच्या यादीमध्ये समाविष्ट असलेले पण १८ जून २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सोपेमध्ये समाविष्ट असलेल्या शाळेतील शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे.*

*मात्र अवघड क्षेत्रातील सेवा तीन वर्षे असणे आवश्यक आहे.*


*५) अंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता पूर्वीच्या जिल्ह्याची धरण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला.*


*▶️६) पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या रखडलेली पद्दोन्नती प्रक्रिया पूर्ण करून, रिक्त असलेल्या मुख्याध्यापकांच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात याबाबत प्रश्न उपस्थित केला आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केला.*


*७)यापूर्वी चे बदलीबाबत शासननिर्णय ,परिपत्रक अधिक्रमित झाले असून १८जून २०२४च्या शासननिर्णयाप्रमाणे बदली प्रक्रीया राबवली जाईल असे प्रधान सचिव यांनी स्पष्ट केले.*

*या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मा. मंत्रीमहोदयानी दिले.    यावेळी आमदार श्री.राहुल कुल, आमदार श्री. अभिमन्यू पवार, श्री. सत्यजीत तांबे, श्री. सुरेश धस, श्री. संजय केळकर, श्री. निरंजन डावखरे ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री एकनाथ डवले यांच्यासह*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे ,सरचिटणीस कल्याण लवांडे, संयुक्त सचिव राजेंद्र निमसे,  शिक्षक बँक सातारा संचालक संजीवन जगदाळे,बंडू नागरगोजे सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, March 10, 2025

संकलित मुल्यमापन चाचणी /PAT परिक्षा वेळापत्रकात बदल

 





 

संकलित मुल्यमापन चाचणी /PAT  परिक्षा वेळापत्रकात बदल करुन एप्रिल महिन्याच्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात परिक्षा  घेणेबाबत मा.शिक्षण आयुक्त व संचालक एनसीईआरटी यांना निवेदन देण्यात आले....


अखिल महाराष्ट्र  प्राथमिक शिक्षक बंघ

टिईटी TET प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे

 *🟡चलो दिल्ली....* *टिईटी प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे....* *अखिल भारतीय  प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय....* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️...