🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
*अखिल शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक संवाद.......*
=================
*🔥 पुणे जिल्हा परिषदेचे नूतन लेखा व वित्त अधिकारी मा. विशाल पवार साहेब* यांची भेट घेऊन *स्वागत व अभिनंदन करण्यात आले. गुलचंद गायकवाड वित्त व लेखा विभाग सहा. लेखाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली* यावेळी शिक्षकांची *प्रलंबित रजा बिले, वैद्यकीय बिले, वरिष्ठ वेतनश्रेणी बिले, आदिवासी भागातील शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी बिलांबाबत मुख्यालयाची असणारी जाचक अट व नवीन ग्रामपंचायत शासन निर्णय 2019 नुसार स्वयंघोषणापत्र स्विकारणे व अन्य सर्व बिलांबाबत* चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व *प्रलंबित बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या बिलांना सर्वसाधारण सभेची मान्यता दिली, १००% बिले* सर्व प्राथमिक शिक्षकांना मिळण्यासंदर्भात आवश्यक सूचना सर्व पंचायत विभागांना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी *मा.ज्ञानेश्वर पारधी सो, मुख्य अधिक्षक लेखा व वित्त विभाग* हे उपस्थित होते. यावेळी *मा.विशाल पवार साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन आवश्यक त्या सूचना विभागांना देवून १००% सर्व शिक्षकांची प्रलंबित बिले मिळण्याबाबत आश्वासित केले.*
तर निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मा.ज्योती कदम व तंत्रज्ञान विभाग प्रमुख मा.अश्विनी करमरकर यांची भेट घेतली असता, यावेळी *प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देण्यात येवू नयेत, ज्यांना केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देण्यात आले आहेत ते रद्द करुन इतर अधिकारी म्हणून करण्यात यावेत, महिला शिक्षिकांना स्वतःच्या मतदार संघातच आदेश देण्यात यावेत, दिव्यांग, गंभीर आजार असलेले शिक्षक, गरोदर व स्तनदा माता यांना निवडणूक आदेश देण्यात येवू नयेत* अशा प्रकारची मागणी करण्यात आली. *यावेळी शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
*मा. राहुल रेखावर सो, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे* यांची भेट घेऊन *नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण दिपावली सुट्टीत आयोजित न करता इतर कालावधीत आयोजित करण्यात यावे* अशी विनंती करण्यात आली. यावेळी *सदर विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन सर्व विभागांबरोबर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन* दिले. याबाबत सकारात्मक चर्चा अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपस्थित अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे व अखिल पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नेते व आमचे मार्गदर्शक शिवाजीराव वाळके उपस्थित होते.
===============
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏