Wednesday, October 23, 2024

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये भेट






 *माननीय श्री राहुल रेखावर साहेब संचालक एससीईआरटी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने घेतली भेट...*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*पुणे- आज बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे संचालक माननीय राहुल रेखावर साहेब यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये भेट घेतली व चर्चा केली*

*१) नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कालावधीत बदल करणे बाबत- दिवाळी सुट्टी निवडणूक कालावधी निवडणूक प्रशिक्षणे आदी बाबींचा विचार करून सदर प्रशिक्षण कालावधी बदल करण्यात यावा अशी मागणी मध्यवर्ती संघटनेने केली.यावर शिक्षकांना सुट्टीत त्रास देण्याचा माझा हेतू नसून ,प्रशासकीय अडचणी मुळे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.तरीसुध्दा प्रशिक्षण कालावधीबाबत सहानुभूतीपूर्वक निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..*

*२) शाळा स्तरावर राबवण्यात येणारे उपक्रम व माहिती बाबत सुसुत्रता आणणेबाबत...*

*शाळा स्तरावर अनेक उपक्रम तसेच विविध माहिती सतत मागितल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही अशी बाबा शिष्टमंडळाने माननीय संचालक साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत गेल्या वर्षभरात कोणकोणत्या प्रकारच्या माहिती मुख्याध्यापक/शिक्षकांकडून मागितल्या गेल्या  आहेत, त्याबाबत संघटनेने विस्तृत अहवाल कार्यालयास सादर करावा. त्या माहितीचं पृथ्थकरण करून माहिती मध्ये सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील .असे स्पष्ट आश्वासन माननीय संचालक साहेबांनी दिले.स्वीप चँट मध्ये भरलेली माहिती MDM सह सर्व शासकीय बाबी साठी ग्राह्य धरली जाईल.*

*येत्या 14/ 15 नोव्हेंबर रोजी पुन्हा मध्यवर्ती संघटनेची बैठक बोलवून इतर मुद्दयाबाबत चर्चा करु असे सांगितले..*

*यावेळी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.केशवराव जाधव,सरचिटणीस-श्री.राजेश सुर्वे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस-कल्याण लवांडे, बालाजी खरात सर आदि उपस्थित होते.,*

🙏🏻🙏🏻🙏🏻▪️▪️▪️▪️▪️🙏🏻

No comments:

Post a Comment

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक.

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक...* ▪️▪️▪️▪️▪️🇳🇪🇳🇪▪️▪️▪️ *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी स...