Saturday, November 16, 2024

मतदानानंतर 21 नोव्हेंबर सुट्टी बाबत..





अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येते की संदर्भिय पत्रा नुसार शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १८, १९ व २० नोव्हेंबर २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाब पत्र निर्गत केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया संपल्यावर निवडणूक ठिकाणाहून विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी निवडणूक साहित्य जमा करणे व त्याठिकाणाहुन पुन्हा शाळेच्या मुख्यालयी येण्यास शिक्षकांना रात्री उशिरा म्हणजे पहाट होणार आहे. व त्यानंतर पुन्हा शालेयकामी हजर होण्यास अडचण होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २१नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी असंख्य शिक्षक बांधवांनी संघटने कडे केली आहे. या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की शिक्षकांच्या अडचणीचा विचार करून २१नोव्हेंबर रोजी सुट्टी बाबत दुरुस्तीचे सुधारित पत्र आपणाकडून तात्काळ निर्गमित व्हावे ही विनंती....

Thursday, October 24, 2024

विद्यार्थी हजेरी बाबत...

 



शाळांमध्ये सकाळ व दुपारी हजेरी पत्रकावर विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवली जाते. तसेच शालेय पोषण आहाराच्या एमडीएम अॅपवरही विद्यार्थ्यांची नोंदणी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची दररोज पाचवेळा हजेरी होत असते. त्यामुळे पुन्हा स्विफ्ट चाट वापर करणे, म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे. •

दीपक भुजबळ, उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संप 





Wednesday, October 23, 2024

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये भेट






 *माननीय श्री राहुल रेखावर साहेब संचालक एससीईआरटी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने घेतली भेट...*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*पुणे- आज बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे संचालक माननीय राहुल रेखावर साहेब यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये भेट घेतली व चर्चा केली*

*१) नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कालावधीत बदल करणे बाबत- दिवाळी सुट्टी निवडणूक कालावधी निवडणूक प्रशिक्षणे आदी बाबींचा विचार करून सदर प्रशिक्षण कालावधी बदल करण्यात यावा अशी मागणी मध्यवर्ती संघटनेने केली.यावर शिक्षकांना सुट्टीत त्रास देण्याचा माझा हेतू नसून ,प्रशासकीय अडचणी मुळे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.तरीसुध्दा प्रशिक्षण कालावधीबाबत सहानुभूतीपूर्वक निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..*

*२) शाळा स्तरावर राबवण्यात येणारे उपक्रम व माहिती बाबत सुसुत्रता आणणेबाबत...*

*शाळा स्तरावर अनेक उपक्रम तसेच विविध माहिती सतत मागितल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही अशी बाबा शिष्टमंडळाने माननीय संचालक साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत गेल्या वर्षभरात कोणकोणत्या प्रकारच्या माहिती मुख्याध्यापक/शिक्षकांकडून मागितल्या गेल्या  आहेत, त्याबाबत संघटनेने विस्तृत अहवाल कार्यालयास सादर करावा. त्या माहितीचं पृथ्थकरण करून माहिती मध्ये सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील .असे स्पष्ट आश्वासन माननीय संचालक साहेबांनी दिले.स्वीप चँट मध्ये भरलेली माहिती MDM सह सर्व शासकीय बाबी साठी ग्राह्य धरली जाईल.*

*येत्या 14/ 15 नोव्हेंबर रोजी पुन्हा मध्यवर्ती संघटनेची बैठक बोलवून इतर मुद्दयाबाबत चर्चा करु असे सांगितले..*

*यावेळी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.केशवराव जाधव,सरचिटणीस-श्री.राजेश सुर्वे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस-कल्याण लवांडे, बालाजी खरात सर आदि उपस्थित होते.,*

🙏🏻🙏🏻🙏🏻▪️▪️▪️▪️▪️🙏🏻

शिक्षक समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक संवाद

 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

*अखिल शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक संवाद.......*

=================

*🔥 पुणे जिल्हा परिषदेचे नूतन लेखा व वित्त अधिकारी मा. विशाल पवार साहेब* यांची भेट घेऊन *स्वागत व अभिनंदन करण्यात आले. गुलचंद गायकवाड वित्त व लेखा विभाग सहा. लेखाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली* यावेळी शिक्षकांची *प्रलंबित रजा बिले, वैद्यकीय बिले, वरिष्ठ वेतनश्रेणी बिले, आदिवासी भागातील शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी बिलांबाबत मुख्यालयाची असणारी जाचक अट व नवीन ग्रामपंचायत शासन निर्णय 2019 नुसार स्वयंघोषणापत्र स्विकारणे व अन्य सर्व बिलांबाबत*  चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व *प्रलंबित बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या बिलांना सर्वसाधारण सभेची मान्यता दिली, १००% बिले* सर्व प्राथमिक शिक्षकांना मिळण्यासंदर्भात आवश्यक सूचना सर्व पंचायत विभागांना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी *मा.ज्ञानेश्वर पारधी सो, मुख्य अधिक्षक लेखा व वित्त विभाग* हे उपस्थित होते. यावेळी *मा.विशाल पवार साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन आवश्यक त्या सूचना विभागांना देवून १००% सर्व शिक्षकांची प्रलंबित बिले मिळण्याबाबत आश्वासित केले.*

तर निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मा.ज्योती कदम  व तंत्रज्ञान विभाग प्रमुख मा.अश्विनी करमरकर यांची भेट घेतली असता, यावेळी *प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देण्यात येवू नयेत, ज्यांना केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देण्यात आले आहेत ते रद्द करुन इतर अधिकारी म्हणून करण्यात यावेत, महिला शिक्षिकांना स्वतःच्या मतदार संघातच आदेश देण्यात यावेत, दिव्यांग, गंभीर आजार असलेले शिक्षक, गरोदर व स्तनदा माता यांना निवडणूक आदेश देण्यात येवू नयेत* अशा प्रकारची मागणी करण्यात आली. *यावेळी शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

           *मा. राहुल रेखावर सो, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे* यांची भेट घेऊन *नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण दिपावली सुट्टीत आयोजित न करता इतर कालावधीत आयोजित करण्यात यावे* अशी विनंती करण्यात आली. यावेळी *सदर विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन सर्व विभागांबरोबर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन* दिले. याबाबत सकारात्मक चर्चा  अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने करण्यात आली.

  यावेळी उपस्थित अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे व अखिल पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नेते व आमचे मार्गदर्शक शिवाजीराव वाळके उपस्थित होते.

===============

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, October 22, 2024

नवनियुक्त शिक्षण सेवकाचे प्रशिक्षण रद्द करणे बाबत

 नवनियुक्त शिक्षण सेवकांचे प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत न घेता 

पुढील कालावधीत घेण्याबाबत. 



दिवाळी सण अग्रीम बाबत


प्राथमिक शिक्षकांना दिवाळी सणासाठी अग्रिम मिळण्याबाबत
तसेच वेतन तरतुदी बाबत शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना निवेदन 




 

शनिवार शाळेच्या वेळेबाबत

माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा यांना शनिवारच्या शाळेच्या वेळेच्या बदल्याबाबत निवेदन 



जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग..

 🌴🌴🌴🌴🌴 *🟣 टीईटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे अंदोलन...* *जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा...