Thursday, October 24, 2024
विद्यार्थी हजेरी बाबत...
Wednesday, October 23, 2024
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये भेट
*माननीय श्री राहुल रेखावर साहेब संचालक एससीईआरटी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने घेतली भेट...*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*पुणे- आज बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे संचालक माननीय राहुल रेखावर साहेब यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये भेट घेतली व चर्चा केली*
*१) नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कालावधीत बदल करणे बाबत- दिवाळी सुट्टी निवडणूक कालावधी निवडणूक प्रशिक्षणे आदी बाबींचा विचार करून सदर प्रशिक्षण कालावधी बदल करण्यात यावा अशी मागणी मध्यवर्ती संघटनेने केली.यावर शिक्षकांना सुट्टीत त्रास देण्याचा माझा हेतू नसून ,प्रशासकीय अडचणी मुळे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.तरीसुध्दा प्रशिक्षण कालावधीबाबत सहानुभूतीपूर्वक निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..*
*२) शाळा स्तरावर राबवण्यात येणारे उपक्रम व माहिती बाबत सुसुत्रता आणणेबाबत...*
*शाळा स्तरावर अनेक उपक्रम तसेच विविध माहिती सतत मागितल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही अशी बाबा शिष्टमंडळाने माननीय संचालक साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत गेल्या वर्षभरात कोणकोणत्या प्रकारच्या माहिती मुख्याध्यापक/शिक्षकांकडून मागितल्या गेल्या आहेत, त्याबाबत संघटनेने विस्तृत अहवाल कार्यालयास सादर करावा. त्या माहितीचं पृथ्थकरण करून माहिती मध्ये सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील .असे स्पष्ट आश्वासन माननीय संचालक साहेबांनी दिले.स्वीप चँट मध्ये भरलेली माहिती MDM सह सर्व शासकीय बाबी साठी ग्राह्य धरली जाईल.*
*येत्या 14/ 15 नोव्हेंबर रोजी पुन्हा मध्यवर्ती संघटनेची बैठक बोलवून इतर मुद्दयाबाबत चर्चा करु असे सांगितले..*
*यावेळी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.केशवराव जाधव,सरचिटणीस-श्री.राजेश सुर्वे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस-कल्याण लवांडे, बालाजी खरात सर आदि उपस्थित होते.,*
🙏🏻🙏🏻🙏🏻▪️▪️▪️▪️▪️🙏🏻
शिक्षक समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक संवाद
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
*अखिल शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक संवाद.......*
=================
*🔥 पुणे जिल्हा परिषदेचे नूतन लेखा व वित्त अधिकारी मा. विशाल पवार साहेब* यांची भेट घेऊन *स्वागत व अभिनंदन करण्यात आले. गुलचंद गायकवाड वित्त व लेखा विभाग सहा. लेखाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली* यावेळी शिक्षकांची *प्रलंबित रजा बिले, वैद्यकीय बिले, वरिष्ठ वेतनश्रेणी बिले, आदिवासी भागातील शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी बिलांबाबत मुख्यालयाची असणारी जाचक अट व नवीन ग्रामपंचायत शासन निर्णय 2019 नुसार स्वयंघोषणापत्र स्विकारणे व अन्य सर्व बिलांबाबत* चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व *प्रलंबित बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या बिलांना सर्वसाधारण सभेची मान्यता दिली, १००% बिले* सर्व प्राथमिक शिक्षकांना मिळण्यासंदर्भात आवश्यक सूचना सर्व पंचायत विभागांना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी *मा.ज्ञानेश्वर पारधी सो, मुख्य अधिक्षक लेखा व वित्त विभाग* हे उपस्थित होते. यावेळी *मा.विशाल पवार साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन आवश्यक त्या सूचना विभागांना देवून १००% सर्व शिक्षकांची प्रलंबित बिले मिळण्याबाबत आश्वासित केले.*
तर निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मा.ज्योती कदम व तंत्रज्ञान विभाग प्रमुख मा.अश्विनी करमरकर यांची भेट घेतली असता, यावेळी *प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देण्यात येवू नयेत, ज्यांना केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देण्यात आले आहेत ते रद्द करुन इतर अधिकारी म्हणून करण्यात यावेत, महिला शिक्षिकांना स्वतःच्या मतदार संघातच आदेश देण्यात यावेत, दिव्यांग, गंभीर आजार असलेले शिक्षक, गरोदर व स्तनदा माता यांना निवडणूक आदेश देण्यात येवू नयेत* अशा प्रकारची मागणी करण्यात आली. *यावेळी शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
*मा. राहुल रेखावर सो, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे* यांची भेट घेऊन *नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण दिपावली सुट्टीत आयोजित न करता इतर कालावधीत आयोजित करण्यात यावे* अशी विनंती करण्यात आली. यावेळी *सदर विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन सर्व विभागांबरोबर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन* दिले. याबाबत सकारात्मक चर्चा अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपस्थित अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे व अखिल पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नेते व आमचे मार्गदर्शक शिवाजीराव वाळके उपस्थित होते.
===============
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tuesday, October 22, 2024
दिवाळी सण अग्रीम बाबत
शनिवार शाळेच्या वेळेबाबत
माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा यांना शनिवारच्या शाळेच्या वेळेच्या बदल्याबाबत निवेदन
विधानसभा निवडणूक आदेश
प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या निवडणूक आदेश बाबत
माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना इलेक्शन ड्युटी बाबत निवेदन
चलो दिल्ली! चलो दिल्ली !!चलो दिल्ली!!!*
*चलो दिल्ली! चलो दिल्ली !!चलो दिल्ली!!!* ✊🏽🔰🔰🔰🔰🔰🔰✊🏽✊🏽 `🟣 अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त समिती काढणार संसदेवर मोर्चा*` >...
-
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे निवेदन..
-
*🟡चलो दिल्ली....* *टिईटी प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे....* *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय....* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️...
-
To, The President/General Secretary All State Affiliates of AIPTF Dear Colleague, Greetings from AIPTF We convey our sincere appreciation ...




.jpg)
.jpg)