Thursday, September 15, 2022

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

, *@संघशक्ती युगे युगे!!*
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या विवध प्रश्नांसाठी  व न्यायसंगत मागण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.देशभरातील २४ राज्यात हे आंदोलन विविधस्तरावर संपन्न होत आहे .या आंदोलनाचे साक्षीदार बनूया.*
   *शिक्षकांना आचार्यापासून आचारी बनवणारी व्यवस्था तसेच  विद्यार्थ्यांपासून दूर नेवून अशैक्षणिक कामात गुंतवणारी प्रशासकीय यंत्रणेला आता आम्हाला एकच मागणी करायची "आम्हाला शिकवू द्या"*
      *शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी  आम्ही कटीबद्ध असू, परंतू आम्हाला आपली साथ हवी. विविध टप्प्यावर होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी व्हावे ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची विनंती..🙏🏻*
*१०० वर्षापेक्षा जास्त इतिहास असणारी अखिल महाराष्ट्र. प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आहे. त्यानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना ७ जानेवारी १९५४ साली याच महाराष्ट्राच्या भूमीत झाली. या देशस्तरावरील संघटनेशी फक्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव महाराष्ट्रातील शिक्षक संघटना संलग्न आहे. स्व.दादासाहेब दोंदे यांनी देशभरातील शिक्षकांना एकत्र करुन शिक्षकांच्या आत्मसन्मना साठी पहिला  लढा दिला. गुरुजींचा १५  रु.पगार ३० रू.झाला. स्व.अरुण दोंदे यांनी दिल्ली येथील शिक्षक संघाच्या अधिवेशनात फक्त शिक्षकांसाठी चटोपाध्याय आयोग लागू करुन घेतला.शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, कुटुंब निवृत्ती वेतन अशा कितीतरी बाबी संघाच्या एकजुटीने शिक्षकांना मिळाल्या.*
    *आपल्या असंघटित पणाचा फायदा घेवून भुतकाळात लढ्याने मिळालेल्या सुविधा शासन हिरावून घेतंय. जुनी पेन्शन गेलीय,शिक्षक  शिक्षणसेवक झाला आहे.आता काहींची वक्रदृष्टी आपल्या वेतनावर आहे.शासकीय शाळांच्या खाजगीकरणाचा हा डाव आहे.विद्यार्थी गुणवत्तेसाठी आपण कटीबद्ध असू पण 'आम्हाला शिकवू द्या' ही शासन प्रशासनाला निक्षून सांगण्याची ही वेळ आहे.*
     *"लोग कहते है, आंदोलन, प्रदर्शन, और जुलूस निकालनेसे क्या होता है....??*
     *इससे ये सिद्ध होता है की, हम जीवीत है, अटल है और मैदान से हटे नही है!* प्रेमचंद   
     *शिक्षकांना  समाजात आजही मानाचे स्थान आहे.कोट्यावधी रूपयांचा लोकसहभाग समाजाकडून जमा करून शाळेच्या भौतिक सुविधा शिक्षकांनी पुर्ण केल्या आहेत.हे त्याचे द्योतक आहे.याविषयी कधी कोणत्याही लोकप्रतिनिधीनी कौतुकांची थाप शिक्षकांच्या पाठीवर टाकली नाही.तर शिक्षकांविषयी द्वेषभावना पसरवण्याचे पातक काही मंडळी करतांना दिसत आहेत. असं म्हटलं जातं "एका पिढीने दुस-या पिढीकडे सुसंस्कृतीचा वारसा संक्रमित करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय." शिक्षकांचा द्वेष करण्याचा वारसा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पुढील पिढीला देणार आहात का???*

   त्यामुळे आपल्या संघटीत प्रयत्नातून शिक्षण व्यवस्थेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी  तसेच बालकांच्या व शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सज्ज होऊ या!!
        
      *⏺️आंदोलन कार्यक्रम⏺️*
*१) स्वाक्षरी मोहीम ः दि३१ आँगस्ट पर्यत ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली .व यानंतर ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , व राज्याच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .*
टप्पा -२
*२)२४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालययेथे   एकदिवशीय थरणे आंदोलन.*
टप्पा ३
*३) राज्यस्तरावर धरणे आंदोलन ः.माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य स्तरावर एकदिवशीय धरणे आंदोलन*
टप्पा-४
*४)  राष्ट्रव्यापी आंदोलनः जानेवारी २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे  जंतरमंतर येथे धरणे आंदोलन.*

   *⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना  रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड - प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे  कमी करावी.
६) ९  सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
७) शिक्षक जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी. 
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६)सर्व मुलांना शालेय गणवेश देण्यात यावा.
१७) राज्य पातळीवरून शिक्षणाचे धोरण ठरवावे. जिल्हा किंवा तालुका पातळीवर कोणतेही समांतर कार्यक्रम/ उपक्रम  राबवले जाऊ नयेत.तसेच शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची संख्या मर्यादित असावी.
१८) नक्षलग्रस्त आणि आदिवासी  व दुर्गम भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता आणि एकस्तरीय वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा .
१९)नगरपालिका ,महानगर पालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान हे शासनाकडून नियमितपणे देण्यात यावे .
२०)शाळांसाठी मोफत इंटरनेट सुविधा, वीजबील, पाणी पट्टी इ.साठी निधी उपलब्ध करुन द्यावा.
२१)शालेय स्तरावरील विविध समित्याचे पुनर्गठन करुन शाळास्तरावर फक्त शाळाव्यवस्थापन समितीच असावी.
२२)जिल्हा/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढी देण्यात याव्यात.
२३)वस्ती शाळा शिक्षकांची सेवा 2001 पासून कायम  धरून तेव्हा पासूनचे वस्तीशाळा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वित्तीय लाभ मिळावेत.
२४) प्राथमिक शिक्षकांनी धारण केलेल्या उच्च अर्हता उदा : पीएचडी , एम एड ,एम ए ( एज्यूकेशन ) साठी शिक्षण सेवा वर्ग -१, वर्ग - २ मध्ये किंवा अन्य पदांवर पदोन्नती व मर्यादित विभागीय परीक्षा अथवा सरळ सेवा परीक्षेद्वारा पात्र होण्यासाठी कालबाह्य झालेला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम -१९६७ तसेच शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्याही सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात करावी .

२५) शाळांना मिळणारे अनुदानासाठी असणाऱ्या बँका या एकच ठेवण्यात याव्यात.कायम  बँका बदलण्याचा प्रकार थांबविण्यात यावा .
२६)शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे.
   तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.

आपले विश्वासू,


*देविदास बस्वदे    कल्याण लवांडे*
*अध्यक्ष           सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Saturday, September 3, 2022

निश्चयाचे महामेरू

 

* *निश्चयाचे महामेरू शंकरराव विठ्ठल भुजबळ (अप्पा ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂💐💐🌹🌹 
आज 84व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 
-शंकरराव विठ्ठल भुजबळ जन्म -4/9/1939 सर्जापूर ता .जावली  जिल्हा सातारा. मातृछत्र वयाचे 7व्या वर्षी हरपले पितृछत्र वयाचे 14 वे वर्षी हरपले.अप्पांना एक छोटा भाऊ आहे वय 75आहे.आमचे एकत्र कुटूंब आहे.  एक विवाहित मुलगी, तीन विवाहित मुले,सुना  व नातवंडे , परतुंड असे मोठे सुखी समाधानी कुटूंबाचे प्रमुख अप्पा🙏 माझ्या आईचे 24_1_2018 रोजी निधन झाले ही पोकळी कधीच भरून येणार नाही.  🙏 अप्पांचे  शिक्षण कोंडवे येथे सहावी पर्यत _ 7वी नगरपालिका शाळा नंबर 1 येथे  _ज्युनिअर व सिनियर ट्रेड महात्मा फुले काॅलेज व दहावी बाहेरून वयाचे 16 वर्षी शिक्षक नोकरी मिळवली. कारण उत्तम मजबूत शरीर 18 वर्ष वय लागते नोकरी करणेसाठी त्यांनी तसा दाखला त्यावेळी civil surgeon यांचेकडून मिळवला.रयत मध्ये 1955ते1957 नोकरी केली.चोरगेवाडी व पिलाणी वरची तालुका जिल्हा सातारा येथे ,नंतर आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन 1959 ते 1997 लोकल बोर्ड सातारा व सातारा जिल्हा  परिषद मध्ये नेले, किडगाव, नुने, गवडी, कोंडवे ,कळंबे मुख्याध्यापक म्हणून  कृष्णानगर व नेले याठिकाणी उत्तम नोकरी केली सेवेत असताना कधीच पुरस्कार, मेडीकल बील यासाठी अर्ज केला नाही.Scout या विषयावर प्रभुत्व आजही अनेक विद्यार्थी त्यांचें नांव काढतात.सुंदर अक्षर, उत्तम शरीर, क्रिडा, गायन, वादन, वाचन, प्रवास, पाककला, भाषण करणे व एखादी गोष्ट ठरविलेनंतर कोणत्याही दबावाला, संकटाना न घाबरता पूर्ण करणे या जमेच्या बाजू . काॅलेज मध्ये असताना मित्रांबरोबर सुरू केलेली पंढरपूरची आषाढी वारी गेली 63वर्ष अखंड सुरू आहे.माझे आजोबांचे आयुष्य 45 वर्ष त्यांनी 45 वर्ष पुण्यतिथी कार्यक्रम केला .दरवर्षी उत्तम गायक व वादक व महाप्रसाद बेंदराच्या   दुसर्या   दिवशी ही परंपरा आम्ही पुढे चालवली आहे.ते शेती उत्तम करत सेवानीवृती नंतर शेतात पाऊल ठेवला नाही कारण जबाबदारी दिल्याशिवाय समोरचा माणूस समर्थ होत नाही.अप्पांनी आम्हांला शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही परंतु pocket money कधीच दिला नाही.आयुष्यात कपडे नेहमीच पांढरा सदरा, पायजमा, व टोपी यात बदल नाही.रेडिओ, टी व्ही, मोबाईल, जागा , बंगला अशी खरेदी नाही.त्यांचे तत्व माणसाने गरजा मर्यादित ठेवाव्यात म्हणजे  समाधान लाभते.साधी रहाणी उच्च विचारसरणी याचे आचरण त्यांनी केले करत आहेत.पद व प्रसिद्धी, स्तुती प्रत्येकाला आवडते अप्पा त्यापासून दूर परंतु आव्हान स्विकारणे  व पार पाडणे हा त्यांचा स्वभाव 1977ते 1979 ते शिक्षक बॅक संचालक दोन वेळेस निवडून आले तेही अपक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आचार्य दादासाहेब दोंदे प्रणित संघटनेत   माझे आजोबा, वङील व मी काम केले.करत आहोत यापुढे करत रहाणार.कारण माझे आजोबांना सुरवातीला 5 रूपये पगार होता मला आता 92 हजार रूपये पगार आहे.तो संघटनेमुळेच हे विसरून चालणार नाही.अप्पांनी जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, राज्य संघटक, संयुक्त चिटणीस ही पदे भूषविली. आता अखिल सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष आहेत. याकाळात अनेक आंदोलन केली.संप मोर्चे यात सक्रिय सहभाग घेतला.अधिवेशनाला शेकडो शिक्षकांना सहकुटूंब बरोबर घेऊन गेले भारत दर्शन घडविले अनेक जण  आदराने नाव काढतात शंकरराव भुजबळ यांचे मुळे आम्हाला हे शक्य झाले.मीही त्यांचा वसा घेऊन वारसा चालवत आहे.भारत दर्शन बरोबरच 9देश सहकारी सहकुटूंब पाहिले आहेत.वडिलांचे म्हणणे आपण इतिहास, भूगोल शिकवतो आपण प्रत्यक्ष ठिकाणे पाहिलेस ज्ञानात भर पडते.अध्यापन करताना फायदा होतो.त्यांनी जमा खर्च कधी लिहला नाही भावाला तीन मुलांना किंवा नातवांना एक रूपाया आजपर्यंत मागितला नाही किंवा हिशोब विचारला नाही.आमच्या पंखांना बळ दिले स्वातंत्र्य दिले हे खूपच मोठे काम केले.शिस्त व दरारा कायम आहे आजही घराला कुलुप नसते.कधीच चोरी झाली नाही कारण पुस्तकाशिवाय त्यांनी कांहीच खरेदी केले नाही.संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी, ज्ञानेश्वरी पारायण, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर वेलफेअर फंड, अंबाई सहकारी पाणीपुरवठा संस्था या कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेतला.त्यांचे संस्कारामुळेच आमचे एकत्रीत कुटूंब सुखात व समाधानात आहे. आजही रोज मोटारसायकल सुरूच आहे. लोकांना भेटले की त्यांना ऊर्जा मिळते.त्यांनी आयुष्यात नको ते खरेदी केली नाही त्यामुळे रद्दी व भंगार विकले नाहीं.माणसे मिळवली यापुढील आयुष्य लोकसेवा करणेसाठी आहे असे प्रतिपादन करतात.माझे वडिल हे माझे गुरू आहेत मार्गदर्शक आहेत आदरणीय,वंदनीय🙏 आहेत.यापुढील आयुष्य आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना🙏 अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ 🙏🙏🙏 

Saturday, August 27, 2022

शिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....





प्रति, 
मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, 
 मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.ना.देवेंद्र फडवणीस साहेब,
  उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.ना.दिपकजी केसरकर साहेब,
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.रणजीत सिंह देओल (भा.प्र.से)
अपर मुख्य सचिव 
शालेय शिक्षण  विभाग, महाराष्ट्र राज्य.

विषयःशिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....

मा.महोदय,
"आपले गुरुजी" या उपक्रम अंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये A4 साईज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत  देण्यात आले आहेत.
       शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सदरचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख पत्रामध्ये आहे.व  दोन आठवड्यात या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शिक्षकांचा सन्मान करण्याची शासनाची भूमिका असेल तर शिक्षकाला  पुर्ण वेळ शाळेमध्ये उपस्थित राहाता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.ना की शिक्षकांचे फोटो शाळेत  लावून, या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान दुखवल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून,याबाबत शिक्षकांनी संघटनेकडे नाराजी व्यक्त केली आहे. 
  आई-वडिलांच्या नात्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे नातं अधिक दृढ असतं घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी दिवसभर शिक्षकांच्या सानिध्यात असतो असे असताना संबंधित शिक्षकाचा फोटो वर्गामध्ये लावण्याचा नेमका हेतू काय ?सदरचा फोटो लावणे म्हणजे शिक्षक अपराधी आहे की काय ? अशी भावना सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे .शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दृढ नात्यांमध्ये कुठे ही फोटो लावण्याची आवश्यकता आजपर्यंत वाटली  नाही.त्यामुळे शिक्षकांचे फोटो वर्गात  लावण्याच्या निर्णयास  संघटनेचा विरोध असेल.व संघटना या उपक्रमावर बहिष्कार टाकत आहे.तरी हा  निर्णय त्वरीत मागे घ्यावा ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नम्र विनंती.

आपले विश्वासू,



देविदास बस्वदे    कल्याण लवांडे
अध्यक्ष           सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

Monday, August 22, 2022

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशारा.

*संघ शक्ती युगे युगे!!*

*शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशारा...*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, वारंवार शाळास्तरावर  राबविण्यात येणारे उपक्रम,यासर्व बाबींचा शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनावर परीणाम करणा-या आहेत.शिक्षकांपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यत अनेक पदे रिक्त आहेत.या सर्व बाबी शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चा उल्लंघन करणाऱ्या आहेत.*
     *"शिक्षकांना वर्गात शिकवू द्या" या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचा इशारा दिला असून दि.२२आँगस्ट रोजी समक्ष मंत्रालय  येथे आंदोलनाची नोटीस शासनाला देण्यात आली आहे.*
   *५सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन होणार असून शेवटच्या टप्प्यात दिल्ली येथे जंतरमंतर वर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे.*

*⏺️मंत्रालयीन आढावा ः* *प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.*
*१)शिक्षणसेवक मानधन वाढः याबात संबधीत अस्थापना कडे विचारना केली असता फाईल वित्त विभागाकडे मंजुरी स्तव पाठवली आहे.*
*२)केंद्रप्रमुख पद भरणेबाबतः केंद्रप्रमुख पदां बाबत अभिप्राय साठी फाईल ग्रामविकास विभागाकडून  शिक्षणविभागाकडे पाठविण्यात आली आहे.याबाबत एकत्रित बैठक होऊन या पदभरती बाबत निर्णय होईल.*
*३)नंदुरबार जिल्हा एकस्तर प्रश्न ः याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला असता लवकरच याबाबत पत्र जिल्हा परिषदेला निर्गमित करण्यात येईल अशी माहिती दिली.* 
*४) शिक्षकांच्या बदल्याबाबतः शिक्षकांच्या आंतरजिल्हा प्रक्रिया जवळपास पुर्ण झाली असून त्यानंतर लगेचच जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरुवात होणार आहे.*

🔴 *श्री.देविदास बस्वदे-राज्य अध्यक्ष*
*श्री.कल्याण लवांडे- सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
निवेदन लिंक 
निवेदन क्लिक करा 

Friday, August 5, 2022

शिक्षक समन्वय समिती सभा पुणे 2022

*महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती ची सभा संपन्न..*
*पुणे ः " शिक्षकांना शिकवू दया'' या मागणी साठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीची सभा शिक्षक भवन पुणे येथे २ आँगस्ट रोजी नेते श्री.संभाजी तात्या थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.मधुकर काठोळे व समन्वय समितीचे सरचिटणीस तथा शिक्षक समितीचे अध्यक्ष  श्री.उदय शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.*
          *कोरोना काळानंतर शाळा सुरू झाल्या परंतु शिक्षकांना अनेक  समस्यांना व प्रश्नांना समोरे जावे लागत आहे. त त्यामध्ये प्रामुख्याने शालेय पोषण आहार चे खाजगी संस्थे द्वारे होणारे ऑडिट , शिक्षक बदल्या,जुनी पेन्शन, सीएमपी प्रणाली, बीडीएस प्रणाली, केंद्रप्रमुखांचे प्रश्न, विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अडचणी, विद्यार्थी हिताच्या बाबी आदी बाबी प्रलंबित आहेत..*
       *शिक्षकांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवून शिक्षणाशिवाय सर्व काही अशी स्थिती निर्माण झाली आहे.*
    *या सर्व बाबींचा विचार करून महाराष्टातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून दि.८आँगस्ट रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून.*
       *माहे सप्टेंबर -२२मध्ये मोठे आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.त्यासंबंधी लवकरच समन्वय समितीची मुंबई येथे सभा घेण्याचे ठरले.*
  **दि.८ आँगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात सर्व शिक्षक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*
 *या सभेस उपस्थित समन्वय समिती व शिक्षक संघाचे नेते माननीय श्री संभाजीराव थोरात, समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर जी काठोळे, समन्वय समितीचे सरचिटणीस तथा शिक्षक  समितीचे अध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष चिंतामण वेखंडे, उर्दू संघटनेचे साजिद निसार, स्वाभिमान संघटनेचे यादव पवार, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे सरचिटणीस कल्याण लवांडे, प्राथमिक शिक्षक महासंघाचे बाळासाहेब झावरे अखिल शिक्षक संघटनेचे दीपक भुजबळ, नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन जी ताकाटे, स्वाभिमान  संघटनेचे पानसरे सर प्रदीप पेखळे आदि उपस्थित होते.*

Tuesday, August 2, 2022

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचा मंत्रालयीन दौरा

*!@ संघ शक्ती युगे युगे!!*
🟣 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ मंत्रालयीन दौरा अपडेट...*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
➡️ *मुंबई ःअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दि. १/०८/२०२२ रोजी शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रश्नांसंबधी मंत्रलयात विविध पदाधिकारी, अधिकारी यांच्या भेटीगाठी घेवून यशस्वी पाठपुरावा केला.*

🔴 *१) मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट- मा.ना.एकनाथ शिंदे साहेब  यांची मंत्रालयात भेट घेवून शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षकांच्या प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब, आ.शिवेंद्रसिंहराजे भासले, केंद्रीय मंत्री खा.रावसाहेब दानवे यांच्या भेटी संघटनेच्या वतीने घेण्यात आल्या.*

 ⏺️ *२) शिक्षणसेवक मानधन वाढविणेः संघटनेने सातत्याने शिक्षणसेवक मानधन वाढविणेबाबत मागणी केली असून तत्कालीन माजी उर्जा मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शिफारशीसह प्रस्ताव सादर करण्यात आला होता.वित्त मंत्रालयाने सदर प्रस्ताव फेटाळल्यामुळे मानधन वाढीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.त्यानंतर पुन्हा शिक्षणसेवकांसह तीन वर्ष मानधन तत्वावर असणारे  सर्व कर्मचारी यांचा एकत्रित प्रस्ताव वित्त विभागाकडे (१५ ते २०  हजार पर्यत वाढ )सादर केलेला आहे . असे कार्या.अधिक्षक काळे साहेब यांनी सांगितले. तसेच केंद्रप्रमुख यांची पदे भरण्यासंदर्भात उच्च स्तरीय अधिकारी यांची बैठक लवकरच होत आहे.त्यानंतर निर्णय होईल असे सांगितले.*

⏺️ *३)शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे - यासंबंधी अभ्यास गटाकडून सकारात्मक अहवाल आला असून सदर प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागात पाठविण्यात आलेला आहे.*

⏺️ *३) समग्र शिक्षा चे खाते एचडीएफसी बँकेत काढण्याचा निर्णय रद्द करणे तसेच ६ ते ८ वर्गाना शिकवणा-या सर्व पदवीधर शिक्षक तसेच विषय शिक्षकांना  सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देणेबाबत मा.शिक्षण सचिव रणजितसिंग  देओल यांना निवेदन देण्यात आले.*

⏺️   *३) ग्रामविकास उपसचिव का.गो.वळवी साहेब यांची भेट-*
*मा.साहेबांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन दिले .शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतंर्गत बदलीसंदर्भात चर्चा करण्यात आली.त्यांनी सांगितले की, शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार बदली प्रक्रीया सुरु असून १५ आँगस्ट पुर्वी आंतरजिल्हा बदल्या  करण्यात येतील. व नंतर लगेचच जिल्हातंर्गत बदल्या करण्यात येणार आहेत*

⏺️ *ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अट काढून टाकणेःअस्था -७ भेटः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणी नुसार फाईल पुट अप करण्यात आली . परंतु सदरील निर्देश पंचायत राज समिती यांच्या अहवालातील सूचनेनुसार दिलेले आहेत .त्यामुळे ग्रामविकास विभाग त्यावर प्राप्त परिस्थितीत त्यावर निर्णय घेवू शकत नाही असे सांगितले.*

⏺️ *शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरणः सदर निवेदन  आस्था १४ चे कार्या विभाग प्रमुख कावरे साहेब यांचे कडे सादर केलेले आहे.शिक्षण विभागाने खाजगी  शिक्षकांना सदर शासन निर्णय लागू केला असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  शिक्षकांना लाभ मिळावा अशी विनंती केली.त्यांनी सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव पाठवू असे शिष्टमंडळास सांगितले.*

  ⏺️ *यानंतर नंदुरबार जिल्हा एकस्तर प्रश्नः कक्ष अधिकारी श्री.राऊत साहेब यांची भेट घेतली . लवरच मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मागवलेल्या मार्गदर्शनावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.*
      *तसेच MSCIT प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे काही जिल्ह्यात(रायगड, हिंगोली ) सेवानिवृत्ती वेळी वसुली होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित बाब आहे असे  सांगितले,तरी सामान्य प्रशासन विभागाने स्थगिती दिली असल्याने सेवानिवृत्त होताना वसुली होऊ नये अशी संघटनेने मागणी केली आहे*
    *शिष्टमंडळा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे, सरचिटणीस कल्याण लवांडे, सहसचिव श्री.दिपक भुजबळ यांचेसह नारायण पेरके उपस्थित होते.*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *कल्याण लवांडे*
       *सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Thursday, July 28, 2022

शिक्षक नायक स्व. अरुणभाई दोंदे व नेत्या स्व.सुलभाताई दोंदे स्मृतीदिन समारंभ

संघशक्ती युगे युगे!!
*सर्व राज्य पदाधिकारी* 
*जिल्हा संघाचे/नपा संघाचे अध्यक्ष व सरचिटणीस तसेच सर्व अखिल प्रेमी शिक्षक बंधू-भगिनी*

*▶️विषयः शिक्षक नायक स्व. अरुणभाई दोंदे व नेत्या स्व.सुलभाताई दोंदे स्मृतीदिन समारंभ*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣 *स्थळः सेंच्युरी रेआँन विश्राम भवन,कल्याण नगर रोड,बिर्ला गेट, ता.कल्यऻण जि.ठाणे*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*दि.३१/०७/२०२२*
 *वेळः स.११:००वा.*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⏺️ *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
*श्री.देविदास बस्वदे*
 *राज्यअध्यक्ष*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
*तथा उपाध्यक्ष , अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

🔴 *प्रमुख पाहुणे*
▶️ *मा. सौ .रेशमाताई भोइर सभापती ,पं.स.कल्याण*
⏺️ *मा.श्री.भरत (भाऊ) गोंधळे उपसभापती,पं.स.कल्याण* 
⏺️ *मा.श्रीम. रुपालीताई  खोमणे* 
*गटशिक्षणाधिकारी,* 
*पंचायत समीती ,कल्याण*
        *तसेच राज्य संघाचे सन्मिनीय सल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.*
🔴 *कार्यक्रम रूपरेषाः*
*१)प्रास्ताविक*
*२)स्वागत*
*३)विविध जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्था /पतपेढ्या मध्ये नवनिर्वाचित चेअरमन /व्हा.चेअरमन तसेच संचालक सत्कार समारंभ*
*४) स्व.शिक्षकनायक भाईसाहेब दोंदे व शिक्षक नेत्या स्व .सुलभाताई दोंदे  यांच्या प्रतिमेला पुष्पांजली*
*५) मान्यवरांचे भाषण*
*६) अध्यक्षीय भाषण*
*७) समारोप व आभार*

⏺️ *द्वितीय सत्र*
*कार्यकारी मंडळ सभा*

*तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती...*

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *कल्याण लवांडे*
 ..*राज्य सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक.

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक...* ▪️▪️▪️▪️▪️🇳🇪🇳🇪▪️▪️▪️ *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी स...