Saturday, August 27, 2022

शिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....





प्रति, 
मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, 
 मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.ना.देवेंद्र फडवणीस साहेब,
  उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.ना.दिपकजी केसरकर साहेब,
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.रणजीत सिंह देओल (भा.प्र.से)
अपर मुख्य सचिव 
शालेय शिक्षण  विभाग, महाराष्ट्र राज्य.

विषयःशिक्षकांचा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत ....

मा.महोदय,
"आपले गुरुजी" या उपक्रम अंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये A4 साईज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत  देण्यात आले आहेत.
       शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सदरचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख पत्रामध्ये आहे.व  दोन आठवड्यात या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शिक्षकांचा सन्मान करण्याची शासनाची भूमिका असेल तर शिक्षकाला  पुर्ण वेळ शाळेमध्ये उपस्थित राहाता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.ना की शिक्षकांचे फोटो शाळेत  लावून, या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान दुखवल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून,याबाबत शिक्षकांनी संघटनेकडे नाराजी व्यक्त केली आहे. 
  आई-वडिलांच्या नात्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे नातं अधिक दृढ असतं घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी दिवसभर शिक्षकांच्या सानिध्यात असतो असे असताना संबंधित शिक्षकाचा फोटो वर्गामध्ये लावण्याचा नेमका हेतू काय ?सदरचा फोटो लावणे म्हणजे शिक्षक अपराधी आहे की काय ? अशी भावना सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे .शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दृढ नात्यांमध्ये कुठे ही फोटो लावण्याची आवश्यकता आजपर्यंत वाटली  नाही.त्यामुळे शिक्षकांचे फोटो वर्गात  लावण्याच्या निर्णयास  संघटनेचा विरोध असेल.व संघटना या उपक्रमावर बहिष्कार टाकत आहे.तरी हा  निर्णय त्वरीत मागे घ्यावा ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नम्र विनंती.

आपले विश्वासू,



देविदास बस्वदे    कल्याण लवांडे
अध्यक्ष           सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

Monday, August 22, 2022

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशारा.

*संघ शक्ती युगे युगे!!*

*शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशारा...*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, वारंवार शाळास्तरावर  राबविण्यात येणारे उपक्रम,यासर्व बाबींचा शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनावर परीणाम करणा-या आहेत.शिक्षकांपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यत अनेक पदे रिक्त आहेत.या सर्व बाबी शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चा उल्लंघन करणाऱ्या आहेत.*
     *"शिक्षकांना वर्गात शिकवू द्या" या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचा इशारा दिला असून दि.२२आँगस्ट रोजी समक्ष मंत्रालय  येथे आंदोलनाची नोटीस शासनाला देण्यात आली आहे.*
   *५सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन होणार असून शेवटच्या टप्प्यात दिल्ली येथे जंतरमंतर वर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे.*

*⏺️मंत्रालयीन आढावा ः* *प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.*
*१)शिक्षणसेवक मानधन वाढः याबात संबधीत अस्थापना कडे विचारना केली असता फाईल वित्त विभागाकडे मंजुरी स्तव पाठवली आहे.*
*२)केंद्रप्रमुख पद भरणेबाबतः केंद्रप्रमुख पदां बाबत अभिप्राय साठी फाईल ग्रामविकास विभागाकडून  शिक्षणविभागाकडे पाठविण्यात आली आहे.याबाबत एकत्रित बैठक होऊन या पदभरती बाबत निर्णय होईल.*
*३)नंदुरबार जिल्हा एकस्तर प्रश्न ः याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला असता लवकरच याबाबत पत्र जिल्हा परिषदेला निर्गमित करण्यात येईल अशी माहिती दिली.* 
*४) शिक्षकांच्या बदल्याबाबतः शिक्षकांच्या आंतरजिल्हा प्रक्रिया जवळपास पुर्ण झाली असून त्यानंतर लगेचच जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरुवात होणार आहे.*

🔴 *श्री.देविदास बस्वदे-राज्य अध्यक्ष*
*श्री.कल्याण लवांडे- सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
निवेदन लिंक 
निवेदन क्लिक करा 

Friday, August 5, 2022

शिक्षक समन्वय समिती सभा पुणे 2022

*महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती ची सभा संपन्न..*
*पुणे ः " शिक्षकांना शिकवू दया'' या मागणी साठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीची सभा शिक्षक भवन पुणे येथे २ आँगस्ट रोजी नेते श्री.संभाजी तात्या थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.मधुकर काठोळे व समन्वय समितीचे सरचिटणीस तथा शिक्षक समितीचे अध्यक्ष  श्री.उदय शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.*
          *कोरोना काळानंतर शाळा सुरू झाल्या परंतु शिक्षकांना अनेक  समस्यांना व प्रश्नांना समोरे जावे लागत आहे. त त्यामध्ये प्रामुख्याने शालेय पोषण आहार चे खाजगी संस्थे द्वारे होणारे ऑडिट , शिक्षक बदल्या,जुनी पेन्शन, सीएमपी प्रणाली, बीडीएस प्रणाली, केंद्रप्रमुखांचे प्रश्न, विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अडचणी, विद्यार्थी हिताच्या बाबी आदी बाबी प्रलंबित आहेत..*
       *शिक्षकांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवून शिक्षणाशिवाय सर्व काही अशी स्थिती निर्माण झाली आहे.*
    *या सर्व बाबींचा विचार करून महाराष्टातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून दि.८आँगस्ट रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून.*
       *माहे सप्टेंबर -२२मध्ये मोठे आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.त्यासंबंधी लवकरच समन्वय समितीची मुंबई येथे सभा घेण्याचे ठरले.*
  **दि.८ आँगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात सर्व शिक्षक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*
 *या सभेस उपस्थित समन्वय समिती व शिक्षक संघाचे नेते माननीय श्री संभाजीराव थोरात, समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर जी काठोळे, समन्वय समितीचे सरचिटणीस तथा शिक्षक  समितीचे अध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष चिंतामण वेखंडे, उर्दू संघटनेचे साजिद निसार, स्वाभिमान संघटनेचे यादव पवार, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे सरचिटणीस कल्याण लवांडे, प्राथमिक शिक्षक महासंघाचे बाळासाहेब झावरे अखिल शिक्षक संघटनेचे दीपक भुजबळ, नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन जी ताकाटे, स्वाभिमान  संघटनेचे पानसरे सर प्रदीप पेखळे आदि उपस्थित होते.*

Tuesday, August 2, 2022

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचा मंत्रालयीन दौरा

*!@ संघ शक्ती युगे युगे!!*
🟣 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ मंत्रालयीन दौरा अपडेट...*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
➡️ *मुंबई ःअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दि. १/०८/२०२२ रोजी शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रश्नांसंबधी मंत्रलयात विविध पदाधिकारी, अधिकारी यांच्या भेटीगाठी घेवून यशस्वी पाठपुरावा केला.*

🔴 *१) मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट- मा.ना.एकनाथ शिंदे साहेब  यांची मंत्रालयात भेट घेवून शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षकांच्या प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब, आ.शिवेंद्रसिंहराजे भासले, केंद्रीय मंत्री खा.रावसाहेब दानवे यांच्या भेटी संघटनेच्या वतीने घेण्यात आल्या.*

 ⏺️ *२) शिक्षणसेवक मानधन वाढविणेः संघटनेने सातत्याने शिक्षणसेवक मानधन वाढविणेबाबत मागणी केली असून तत्कालीन माजी उर्जा मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शिफारशीसह प्रस्ताव सादर करण्यात आला होता.वित्त मंत्रालयाने सदर प्रस्ताव फेटाळल्यामुळे मानधन वाढीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.त्यानंतर पुन्हा शिक्षणसेवकांसह तीन वर्ष मानधन तत्वावर असणारे  सर्व कर्मचारी यांचा एकत्रित प्रस्ताव वित्त विभागाकडे (१५ ते २०  हजार पर्यत वाढ )सादर केलेला आहे . असे कार्या.अधिक्षक काळे साहेब यांनी सांगितले. तसेच केंद्रप्रमुख यांची पदे भरण्यासंदर्भात उच्च स्तरीय अधिकारी यांची बैठक लवकरच होत आहे.त्यानंतर निर्णय होईल असे सांगितले.*

⏺️ *३)शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे - यासंबंधी अभ्यास गटाकडून सकारात्मक अहवाल आला असून सदर प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागात पाठविण्यात आलेला आहे.*

⏺️ *३) समग्र शिक्षा चे खाते एचडीएफसी बँकेत काढण्याचा निर्णय रद्द करणे तसेच ६ ते ८ वर्गाना शिकवणा-या सर्व पदवीधर शिक्षक तसेच विषय शिक्षकांना  सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देणेबाबत मा.शिक्षण सचिव रणजितसिंग  देओल यांना निवेदन देण्यात आले.*

⏺️   *३) ग्रामविकास उपसचिव का.गो.वळवी साहेब यांची भेट-*
*मा.साहेबांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन दिले .शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतंर्गत बदलीसंदर्भात चर्चा करण्यात आली.त्यांनी सांगितले की, शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार बदली प्रक्रीया सुरु असून १५ आँगस्ट पुर्वी आंतरजिल्हा बदल्या  करण्यात येतील. व नंतर लगेचच जिल्हातंर्गत बदल्या करण्यात येणार आहेत*

⏺️ *ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अट काढून टाकणेःअस्था -७ भेटः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणी नुसार फाईल पुट अप करण्यात आली . परंतु सदरील निर्देश पंचायत राज समिती यांच्या अहवालातील सूचनेनुसार दिलेले आहेत .त्यामुळे ग्रामविकास विभाग त्यावर प्राप्त परिस्थितीत त्यावर निर्णय घेवू शकत नाही असे सांगितले.*

⏺️ *शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरणः सदर निवेदन  आस्था १४ चे कार्या विभाग प्रमुख कावरे साहेब यांचे कडे सादर केलेले आहे.शिक्षण विभागाने खाजगी  शिक्षकांना सदर शासन निर्णय लागू केला असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  शिक्षकांना लाभ मिळावा अशी विनंती केली.त्यांनी सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव पाठवू असे शिष्टमंडळास सांगितले.*

  ⏺️ *यानंतर नंदुरबार जिल्हा एकस्तर प्रश्नः कक्ष अधिकारी श्री.राऊत साहेब यांची भेट घेतली . लवरच मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मागवलेल्या मार्गदर्शनावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.*
      *तसेच MSCIT प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे काही जिल्ह्यात(रायगड, हिंगोली ) सेवानिवृत्ती वेळी वसुली होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित बाब आहे असे  सांगितले,तरी सामान्य प्रशासन विभागाने स्थगिती दिली असल्याने सेवानिवृत्त होताना वसुली होऊ नये अशी संघटनेने मागणी केली आहे*
    *शिष्टमंडळा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे, सरचिटणीस कल्याण लवांडे, सहसचिव श्री.दिपक भुजबळ यांचेसह नारायण पेरके उपस्थित होते.*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *कल्याण लवांडे*
       *सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Thursday, July 28, 2022

शिक्षक नायक स्व. अरुणभाई दोंदे व नेत्या स्व.सुलभाताई दोंदे स्मृतीदिन समारंभ

संघशक्ती युगे युगे!!
*सर्व राज्य पदाधिकारी* 
*जिल्हा संघाचे/नपा संघाचे अध्यक्ष व सरचिटणीस तसेच सर्व अखिल प्रेमी शिक्षक बंधू-भगिनी*

*▶️विषयः शिक्षक नायक स्व. अरुणभाई दोंदे व नेत्या स्व.सुलभाताई दोंदे स्मृतीदिन समारंभ*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣 *स्थळः सेंच्युरी रेआँन विश्राम भवन,कल्याण नगर रोड,बिर्ला गेट, ता.कल्यऻण जि.ठाणे*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*दि.३१/०७/२०२२*
 *वेळः स.११:००वा.*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⏺️ *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
*श्री.देविदास बस्वदे*
 *राज्यअध्यक्ष*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
*तथा उपाध्यक्ष , अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

🔴 *प्रमुख पाहुणे*
▶️ *मा. सौ .रेशमाताई भोइर सभापती ,पं.स.कल्याण*
⏺️ *मा.श्री.भरत (भाऊ) गोंधळे उपसभापती,पं.स.कल्याण* 
⏺️ *मा.श्रीम. रुपालीताई  खोमणे* 
*गटशिक्षणाधिकारी,* 
*पंचायत समीती ,कल्याण*
        *तसेच राज्य संघाचे सन्मिनीय सल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.*
🔴 *कार्यक्रम रूपरेषाः*
*१)प्रास्ताविक*
*२)स्वागत*
*३)विविध जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्था /पतपेढ्या मध्ये नवनिर्वाचित चेअरमन /व्हा.चेअरमन तसेच संचालक सत्कार समारंभ*
*४) स्व.शिक्षकनायक भाईसाहेब दोंदे व शिक्षक नेत्या स्व .सुलभाताई दोंदे  यांच्या प्रतिमेला पुष्पांजली*
*५) मान्यवरांचे भाषण*
*६) अध्यक्षीय भाषण*
*७) समारोप व आभार*

⏺️ *द्वितीय सत्र*
*कार्यकारी मंडळ सभा*

*तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती...*

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *कल्याण लवांडे*
 ..*राज्य सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Tuesday, July 26, 2022

शालेय पोषण आहार योजनेचे सुलभीकरण



शालेय पोषण आहार योजनेचे सुलभीकरण करण्याची मागणीः
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण संचालकांना निवेदन 

 प्रतिनिधी ःशालेय पोषण आहार योजने अंतर्गत  राज्यातील सर्व शाळांचे सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या पाच  वर्षाच्या कालावधीतील  शालेय पोषण आहार योजनेच्या अभिलेख्याचे लेखापरीक्षण शिंदे चव्हाण  गांधी अँड कंपनी या खाजगी  संस्थेमार्फत करण्याचा घाट घातला जात आहे.याला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला असून तसे निवेदन शिक्षण संचालक यांना अध्यक्ष देविदास बस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने दिले आहे.
         शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात  शाळांकडून विहित नमुन्यात २२ पानी माहिती मागविण्यात आलेली आहे.तसेच सदर माहिती सोबत सर्व पोषण आहार अभिलेख्याच्या छायांकित प्रतीही मागविण्या बाबत निर्देश दिलेले आहे.ज्या शाळा लेखापरीक्षण करणार नाही त्यांना २५००० रु दंड करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
     वास्तविक दरवर्षी शालेय पोषण आहार योजनेचे स्थानिक निधी लेखापरीक्षण समिती कडून.लेखापरीक्षण शासनामार्फत केले जाते. त्यासंबंधी उपयोगिता प्रमाण पत्र  शाळांकडून घेण्यात येते. तसेच वेळोवेळी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेमार्फत वेळोवेळी अभिलेख्याची व  अंमलबजावणी बाबत तपासणी केली जाते.असे असतांना हे खाजगी लेखापरीक्षणाचा अट्टाहास का? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
     कोरोना परीस्थिती नंतर नुकत्याच शाळा सुरु झाल्या असतांना  विद्यार्थीना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळणे आवश्यक  आहे .त्यासाठी शिक्षकांचा अधिकाधिक वेळ हा अध्यापन कार्यासाठी खर्च होणे अपेक्षित आहे.राज्यातील अनेक शाळा द्विशिक्षकी आहेत.तेथील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाबरोबर सर्व प्रशासकीय कामे करावी लागतात,ही वस्तुस्थिती आहे.गेले वर्षभरापासून पोषण आहारासंबधी कोणतेही अनुदान शाळांना देण्यात आले नाही.८०% शाळांचे शाळा अनुदान आँनलाइन प्रक्रीयेत जमा झाले नाही. हा सर्व खर्च भागवावा कसा असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
       शालेयपोषण योजनेअंतर्गत लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करणे व पाच वर्षाचे सर्व अभिलेखे लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करणे हे अतिशय क्लिष्ट व वेळखाऊ काम असल्याने शिक्षकांनी  याबाबत संघटनेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.व या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ अध्यक्ष संजीवन जगदाळे, सरचिटणीस अजित राक्षे ,कार्याध्यक्ष गणेश जाधव, खजिनदार विजयकुमार भुजबळ, राज्य संघटक रजनी चव्हाण ,शहनाज तडसरकर यांनी केली आहे.

.भा.शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा(General council meeting

*
 *विषय: नोव्हेंबर 2022 मध्ये आगामीअ.भा.शिक्षक संघाची  सर्वसाधारण सभा(General council meeting).*

 

 प्रिय सहकारी,सर्व राज्याचे अध्यक्ष /सरचिटणीस
 AIPTF कडून नमस्कार

 4 नोव्हेंबर 2022 रोजी शिलाँग, मेघालय येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्वसाधारण बैठकीबाबत कळविण्यात येते की,.अखिल मेघालय शिक्षक संघाने   AIPTF ला खालील वेळापत्रकासह परिषद बैठक आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे:

 · शिलाँग येथे आगमन: 3 नोव्हेंबर 2022

 · सर्वसाधारण परिषद बैठक: 4 नोव्हेंबर 2022

 · साइड सीन  पाहणे: 5 नोव्हेंबर 2022

 · रिटर्न : 6 नोव्हेंबर 2022


 शिलाँगमध्ये हॉटेल्सची संख्या फारच मर्यादित असल्याने केवळ कौन्सिल सदस्यांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे अतिरिक्त व्यक्ती सोबत   आणण्यास अडचण  असेल अशी माहिती राज्याकडून देण्यात आली आहे.
 तुम्हाला २५ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी तुमच्या सहभागाची पुष्टी करण्याची विनंती करण्यात आली आहे. बैठकीचे ठिकाण, निवास, अजेंडा यासंबंधीचे तपशील लवकरच शेअर केले जातील.

 कोणत्याही स्पष्टीकरणाच्या बाबतीत, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

 हार्दिक शुभेच्छांसह

 कमलाकांता त्रिपाठी
 सरचिटणीस
 अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ (AIPTF)
 शिक्षक भवन 41-संस्थात्मक क्षेत्र,
 डी-ब्लॉक, जनकपुरी, नवी दिल्ली-110058, भारत
 दूरध्वनी: +91-11-28522606,
 ई-मेल: aiptfindia@yahoo.com www.aiptfindia.org

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक.

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक...* ▪️▪️▪️▪️▪️🇳🇪🇳🇪▪️▪️▪️ *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी स...