Monday, February 9, 2026

TET.मधून सूट देण्यासाठी कायद्यात सुधारणा. AIPTF

 




*अखिल भारतीय शिक्षक संयुक्त कृती  समितीची शिक्षणमंत्री मा.धर्मेद्र प्रधान यांचेशी चर्चा मागण्याचे निवेदन केले सादर...*

> नवी दिल्लीःअखिल भारतीय शिक्षक संघ संयुक्त कार्य समिती (AIJACTO) ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना TET मधून सूट देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची विनंती केली. राज्यसभेचे  सदस्य खा.शिवदासन यांच्या नेतृत्वाखाली, समितीचे सदस्य बसवराज गुरीकर, कमलाकांत त्रिपाठी,नरसिंह रेड्डी  आणि एन. भारती यांनी शुक्रवारी संसद भवनात मंत्र्यांना समक्ष निवेदन सादर केले व चर्चा केली.

 

*🟡१ सप्टेंबरपासून दोन वर्षांच्या आत TET उत्तीर्ण न झाल्यास सेवारत शिक्षकांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकण्यात येईल, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा देशभरातील ३० लाख शिक्षकांवर परिणाम झाला आहे,ही बाब अधोरेखीत केली.*


 *🌀त्याच बरोबर शिष्टमंडळाने नवीन पेन्शन योजना  रद्द करणे, शिक्षक एमएलसी निवडणुकीत प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणातील  सरकारी शिक्षणाला हानी पोहोचवणारे मुद्दे रद्द करणे या प्रश्नी लक्ष वेधले.*


*🟣केंद्रीय शिक्षणमंत्री मा.धर्मेंद्र प्रधान यांनी शिष्टमंडळाला सांगितले की,  टीईटी मुद्द्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर न्यायव्यवस्थेशी   चर्चा करत आहोत.सन २०११ पूर्वीच्या शिक्षकांना सरकार न्याय देण्याच्या भुमिकेत आहे ,असे सांगितले. परंतु पेन्शन बाबतच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगले, पूर्वीच्या सरकारचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.* *🟥त्यानंतर,शिष्टमंडळाने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष मा.मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली. विरोधी पक्षाने टीईटी मुद्द्याचे निराकरण करण्यासाठी व जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करावा अशी शिष्टमंडळाने विनंती केली.*

**************************

*🟣देविदास बस्वदे-राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष*

*🟡कल्याण लवांडे-सरचिटणीस*

 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

TET.मधून सूट देण्यासाठी कायद्यात सुधारणा. AIPTF

  *अखिल भारतीय शिक्षक संयुक्त कृती  समितीची शिक्षणमंत्री मा.धर्मेद्र प्रधान यांचेशी चर्चा मागण्याचे निवेदन केले सादर...* > नवी दिल्लीःअखि...