*🟣केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🟥नवीदिल्ली: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय श्री धर्मेंद्र प्रधान यांची आज दि.१०/१२/२०२५ रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली व टिईटी अनिवार्यतेतून शिक्षकांना वगळण्यासाठी संशोधन बील केंद्र शासनाने संसदेत मांडावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.*
*🟣यावर मा.शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच योग्य तो निर्णय केंद्र सरकार घेईल असे अश्वासन प्रतिनिधी मंडळास दिले.*
*🟥प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उत्तर प्रदेश चे विधानपरिषद सदस्य मा.श्री.देवेंद्र प्रताप सिंह यांनी केले .समवेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुरीकर, ज्युनिअर हायस्कूल शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.योगेश त्यागी ,उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.विनय तिवारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री.उमाशंकर सिंह जी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.*
*☸️अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनाचे तसेच सर्व संसद सदस्यांना दिलेल्या निवेदनाचा परीणाम स्वरूप संसदेच्या दोन्ही सभागृहात टिईटी मुद्दा गाजत आहे .*
*🌀अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही दाखल केलेली आहे.*
*टिईटी प्रश्नी शिक्षकांनालवकरच योग्य तो न्याय मिळेल असा आशावाद राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बसवराज गुरीकर यांनी व्यक्त केला असून शिक्षकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक हितासाठी सदैव तयार आहे.*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*☸️ श्री.देविदास बस्वदे -राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष*
*🌀कल्याण लवांडे-राज्य सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
