Wednesday, April 30, 2025

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी अधिवेशन

 





🌀🌀🌀🌀🌀🌀

    माननीय नामदार पालकमंत्री उदयजी सामंत साहेब  यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हा परिषद या ठिकाणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांची शिक्षकांच्या जिल्हास्तर व राज्यस्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आज बैठक घेतली .त्या बैठकीत झालेले विषय व चर्चा पुढीलप्रमाणे


*️⃣  पालकमंत्री महोदय यांनी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केल्याबद्दल  व 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल सर्व संघटना यांच्या वतीन त्यांचा सन्मान करण्यात आला.


*️⃣ आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यासाठी माननीय शिक्षण संचालक महोदय यांच्याशी चर्चा करून व जिल्हा परिषद उत्पन्नातून एक विशिष्ट योजना तयार करून वेतन वाढ देता येईल का ते पहावे व हा प्रश्न सोडवावा अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी  यांना दिल्या.


*️⃣ तीन वर्ष कालावधी पेक्षा जास्त कालावधी ज्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे त्यांचा पदभार रोटेशनने  दुसऱ्या विस्तार अधिकारी यांच्याकडे देण्यात द्यावा अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी दिल्या.

*️⃣ केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया न्यायालयात प्रविष्ट असल्याने न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून केंद्रप्रमुख पदोन्नती पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या.

*️⃣ नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका येथे बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना ऑफलाइन एनओसी  देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी दिली.

*️⃣ शिक्षकांना क्यू आर कोड असलेले डिजिटल आयकार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकर राबवावी अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी दिल्या.

*️⃣ सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्त दिनांकाच्या दिवशी त्याची सर्व प्रकारचे देयके मिळण्यास विलंब का होतो , त्यांना आनंददायी पेन्शन योजनेचा लाभ का लगेच मिळत नाही याची विचारणा पालकमंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांना  केली. भविष्यात याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

*प्रॉव्हिडंट फंड रकमा मागणी केल्यास लवकरात लवकर त्या शिक्षकांना मिळत नाहीत त्याबाबत पालकमंत्री महोदयांनी  त्या लवकरात लवकर कशा मिळतील याची काळजी घेण्याच्या  सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

*️⃣ वैद्यकीय बिले तात्काळ मंजूर करण्यात यावेत.त्यात कोणीही दिरंगाई करू नये.

*️⃣ शालेय पोषण आहार धान्य पुरवठा वेळेत होत नसल्याबाबत पालकमंत्री महोदय यांनी नाराजी व्यक्त केली व संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषद या ठिकाणी बोलावून  घेऊन धान्य पुरवठा वेळेत कसा होईल याची काळजी घेण्यात यावी असे सांगितले.

*️⃣ संघटनांचे जिल्हाध्यक्ष किंवा सचिव यांना महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हा परिषद मध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात यावी व तसे अधिकृत पत्र काढावे असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

*️⃣ दिव्यांग शिक्षक यांना शासननिर्णया प्रमाणे विविध  सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

*️⃣ पालकमंत्री महोदय यांनी  विद्यार्थी सुरक्षा,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

*️⃣ राज्यस्तरावरील संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे ,मुख्यालय अट रद्द करणे, शिक्षण सेवक कालावधी रद्द करून नवीन शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक करणे, शिक्षकांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देणे व जुनी पेन्शन योजना लागू करणे या विषयासाठी राज्यस्तरावर संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत  संघटनांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदय यांनी दिले.

 

पालकमंत्री महोदय यांनी ही सभा आयोजित केल्याबद्दल  त्यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, April 28, 2025

अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी

 *






अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सोलापूरात बैठक संपन्न.*

🌹🌹🌹🌹🌹🌹

*नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.*

*सोलापूर येथील जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात अखिल सोलापूर जिल्हा कार्यकारीणी निवडीसाठी नेते बाळासाहेब ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे, उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख दिपक भुजबळ,माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, नांदेड जिल्हा सल्लागार तुका पाटील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आज संपन्न  झालेल्या  बैठकीत अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची नुतन कार्यकारीणी खालील प्रमाणे निवडण्यात आली.*

*जिल्हा नेते: बाळासाहेब ढगे*

*दिनानाथ बाबर(सोलापूर) जिल्हाध्यक्ष,*

 *रामकृष्ण काटकर (अकलूज)  सरचिटणीस,*

*मनोज गादेकर (माढा) कार्याध्यक्ष,* 

*आनंद होनराव (बार्शि) कोषाध्यक्ष,* 

*अंबादास बनसोडे (उत्तरसोलापूर) वरिष्ठ उपाध्यक्ष*  

 *यावेळी जहांगिर शेख, किशोर कुलकर्णी,अरविंद शिंदे,अल्ताफ अत्तार, सचिदानंद बरबडे,अभिमन्यू गायकवाड,अनिल गुंड, बाळासाहेब खूने यांची उपस्थिती होती.*

अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ भंडारा.. नूतन कार्यकारिणी

 







*अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ भंडारा*

`जिल्हा सभा`


*आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोज रविवारला जे. के. हायस्कूल भंडारा येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भंडाराची सभा मा.अन्नाजी आडे सर कार्याध्यक्ष राज्य संघटना यांच्या अध्यक्षतेखाली मा. गोरे सर, मा. पवार सर, मा.केशव बुरडे सर मा.लोकेश गायकवाड सर राज्य पदाधिकारी तसेच मा.रमेश सिंगनजुडे सर जिल्हा सल्लागार, मा. बाळकृष्ण भुते सर जिल्हाअध्यक्ष मा. राजेश सुर्यवंशी सर. मा.विकास गायधने सर, मा. रशेष फटे सर, मा. सुरेश कोरे सर. मा. नरेश शिवरकर सर, मा. आदेश बोंबार्डे सर संचालक ग्राहक, शिक्षक पतसंस्था, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी, सभासद बंधू आणि भगिनी यांचे उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी विस्तार व रीक्तपदे भरण्यासंदर्भात सभा पार पडली.*

*सभेमध्ये खालीलप्रमाणे जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात आली.*

*श्री.मनोहर कहालकर - अध्यक्ष*

 *श्री.देवानंद दुबे - सरचिटणीस*

*श्री. बाळकृष्ण भुते - शिक्षक नेते* 

*श्री.ओंकार कठाने -  कार्याध्यक्ष*

 *श्री.विजय जाधव - कोषाध्यक्ष*

*श्री.महेश जगनीक - प्रवक्ता*

 *श्री.रामभाऊ गेडाम - संयुक्त सरचिटणीस*

*श्री.सिताराम मारबते  व श्री.प्रदीप दिघोरे - प्रसिद्धी प्रमुख*

*श्री. भांडारकर सर - जिल्हा उपाध्यक्ष*

*महिला जिल्हा अध्यक्ष - कु.ज्योती नागलवाडे*

 *माला नगरे मॅडम - सरचिटणीस*

 *रोहिणी खोकले - राज्य महिला प्रतिनिधी*

*यांची एकमताने निवड झाली.*


*सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा💐🌷🌹.*

अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारणीची निवड

 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*🤛संघटन म्हणजे पोलादी मनगट🤜*







🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*जिल्हा कार्यकारिणी निवड सभा*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

      आज दिनांक 27/04/2025 रोज रविवार ला विदर्भ बुनयादी हायस्कूल सक्करदरा नागपूर येथे *अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची* सभा संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष *आदरणीय श्री अशोक बावनकुळे सर* यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

       या सभेला *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जनरल कॉन्सिल सदस्य श्री रामूभाऊ गोतमारे सर*  राज्य संघटनेचे उपाध्यक्ष *श्री शिवानंद सहारकर सर* राज्य संघटक *सौ. आशाताई झीलपे मॅडम* सन्माननीय श्री वंजारी सर, श्री सुनील पेटकर सर, श्री मनोहर बेले सर, श्री प्रकाश बांबल सर, श्री चामट सर, सौ टिपरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.


      सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठी खालील प्रमाणे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.


*🤝जिल्हा अध्यक्ष🤝*

*श्री धनराज बोडे सर*


*🤝जिल्हा सरचिटणीस 🤝*

*श्री वीरेंद्र वाघमारे सर*


*🤝कार्याध्यक्ष 🤝*

*श्री आनंद गिरडकर सर*


        वरील प्रमाणे प्रमुख तीन पदांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीचा उर्वरित विस्तार करण्याचे अधिकार  नवनियुक्त अध्यक्ष, सरचिटणीस व कार्याध्यक्ष यांना सभेच्या वतीने सर्वानुमते देण्यात आले.


या सभेला जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यातील तालुका अध्यक्ष व सचिव तथा जिल्हा व तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. 


नवनियुक्त अध्यक्ष, सरचिटणीस व कार्याध्यक्ष यांचे राष्ट्रीय कॉन्सिल चे पदाधिकारी, राज्य पदाधिकारी व जिल्यातील सर्व उपस्थितांनी स्वागत केले. 

       सभेला श्री डी व्ही वंजारी सर व श्री अशोक बावनकुळे सर यांनी मार्गदर्शन केले.

सभेचे संचलन श्री वीरेंद्र वाघमारे व श्री हांडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री दिलीप जीभकाटे सर यांनी केले.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

*वृत्तांकन:- श्री लोकेश सुर्यवंशी*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कर्तुत्वाने व नेत्रदानाने अजरामर झालेल्या तेजस्वी स्व. सुनिताताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

 *कर्तुत्वाने व नेत्रदानाने अजरामर झालेल्या तेजस्वी स्व. सुनिताताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली* 


अखिल अमरावती महिला जिल्हा संघाच्या आधारस्तंभ कित्येक महिला शिक्षिकांच्या प्रेरणास्त्रोत,अखिल परिवारातील एक हसतमुख कार्यमग्न व्यक्तिमत्व सुनीता किरण पाटील. अकस्मात अपघाताचे निमित्त घडून अखिल परिवाराला कायमचा सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. जीवनाच्या वाटेवरून निघून जातानाही आपले नेत्रदान करून कुण्यातरी व्यक्तीला जग दाखविण्याचं सामर्थ्य देऊन गेल्या. जग सोडून जाताना आपले अवयव इतरांना देऊन, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, ही त्यांची विचारसरणी.अवयवदान करण्याची पायाभरणी त्यांनी आधीच केलेली होती.पती श्री किरणजी पाटील,मुलगी तनुजा पाटील व इतर कुटुंबातील सदस्यांसोबत अवयवदानाबद्दल त्यांनी यापूर्वीच चर्चा करून निर्णय घेतलेला होता.या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय कठीण प्रसंगात असामान्य धैर्य दाखवून पाटील कुटुंबीयांनी पूर्णत्वास नेऊन स्व. सुनीताताईंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली.

      अमरावती जिल्हा संघाच्या संघटनेच्या जडणघडणीत ज्या शिक्षकांचा वाटा आहे, त्यामध्ये महिला शिक्षकांमधून सुनिता ताईंचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण जिल्ह्याभर अखिल परिवाराचे जाळे अमूल्य योगदान आहे.संघटनेचा कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या नियोजनात स्व. सुनीताताईंचा सहभाग नाही,असं कधी घडलं नाही. स्टेजची तयारी असो,स्वागताचा कार्यक्रम असो,कार्यक्रमात त्यांनी आपली यशस्वी भूमिका व कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडले.संघ परिवार त्यांचेही अभूतपूर्व कार्य कधीही विसरू शकणार नाही. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांची उपस्थिती ही प्रकर्षाने राहायची. अनेक महिला व त्यांच्या कुटुंबांना घेऊन संपूर्ण भारतभर कित्येक यशस्वी प्रवासाचे नियोजन त्यांनी पार पाडले. सहकाऱ्यांना कठीण प्रसंगी मदत करून त्यांची समस्या सोडविण्यात ताईंचा वाटा आहे.

     प्राथमिक शिक्षिका म्हणून स्व.सुनीताताईंचा प्रवास सुरू झाला. एक आदर्श उपक्रमशील शिक्षिका व शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी लढणारी एक रणरागिणी हे दोन्ही रूपे पाहावयास मिळाली. चिखलदरा सारख्या दुर्गम भागातून त्यांनी सेवेची सुरुवात केली, त्यानंतर पदवीधर शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य केले. क्रीडा महोत्सवामध्ये प्रत्येक वर्षी त्यांनी टेनीक्वाईटच्या अंतिम किंवा उपविजेते हमखास ठरलेलं पारितोषिक त्यांच्या नावावर असायचं.यामध्ये सातत्य होते.कधीच खंड पडला नाही. खेळण्याची त्यांना प्रचंड आवड होती आणि हीच खेळाडूवृत्ती त्यांनी जीवनामध्ये उपयोगात आणली.संपूर्ण कुटुंबात प्रसन्न वातावरण तयार करून श्री. किरणजी पाटील यांना समर्थपणे साथ दिली.ताईंच्या अनेक आठवणी अखिल परिवारातील अनेकांना सोबत जोडलेल्या आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या स्व. सुलभाताई दोंदे यांचा अमरावतीमधील मुक्काम सुनीता ताईंच्याच घरी असायचा. ताईमुळे मी आज शिक्षक आहे, हे आवर्जून श्री अमोलजी आखाडे सर सांगतात; नाहीतर मी एक मवाली म्हणूनच राहिलो असतो, हे ते स्वतः सांगतात. स्व . चंदनजी खर्चान सर यांच्या आजारांवर उपचारांसाठी श्री किरणजी पाटील सरांनी घेतलेल्या निणर्याच सुनिता ताईनी समर्थन करून खंबीर पाठिंबा दिला .ताईंचे अकस्मात निघून जाणे अखिल अमरावती जिल्हा संघासाठी फार मोठी हानी आहे. ही पोकळी भरून येणे अशक्य आहे. नियती पुढे मनुष्याचे काही एक चालत नाही. मिळालेलं आयुष्य तुम्ही कशाप्रकारे जगलंत, यावरच तुमचं मूल्यमापन होतं. ताईंच्या या आयुष्याचं मूल्यमापन करताना हेच करावं लागेल,संघटनेसाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ताई एक समर्पित व्यक्तिमत्व होत्या.

सासू आणि आईमध्ये फरक न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुनीता ताई पाटील. सासूचा धुमधडाक्यात अमृत महोत्सव साजरा करणारी, सुनेचं पूर्ण कर्तव्य पार पाडणारी सुनीता ताई एक अनोखं व्यक्तिमत्त्व होतं.

सुनीता ताईंचं अचानक निघून जाणं हे अनाकलनीय आहे. ताईंच्या बाबतीत 'जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला' हेच वाक्य लागू पडते. अखिल अमरावती जिल्हा संघ परिवाराकडून ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.



✒️ सुभाष सहारे, जिल्हा सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती

🟰🟰🟰🟰🟰🟰

विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण ..अखिलच्या पाठपुराव्यास यश..

 🌴🌴🌴🌴🌴

*Education International*

🛑 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी सलग्न* 

🟥 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


🟪 *राज्यातील शाळांमधील अस्तित्वात असलेल्या विविध शालेय समित्यांचे अखेर एकत्रीकरण*


 🟢 *शालेय शिक्षण मंत्री ना दादा भुसे साहेब यांचा ऐतिहासिक निर्णय*


 🟦 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा सुमारे सात वर्षापासूनचा या प्रलंबित प्रश्नाच्या पाठपुराव्यास यश*


🟣 *राज्यातील शाळांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण करून शालेय स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अन्य समिती यांचा समावेश करून विविध शालेय समित्यांचे समावेशन करण्याची मागणी तत्कालीन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडेस दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजी संघटनेने निवेदन देऊन केली होती . शासनाने याची दखल घेऊन विविध शालेय समित्यांचे एकत्रीकरण करून शालेय स्तरावर फक्त चारच समित्या गठित करण्यात आल्या आहेत*


🟤 *तत्पूर्वी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यकार्याध्यक्ष अण्णा आडे ( जि चंद्रपूर ) व राज्यसंघटक राजेंद्र निमसे ( जि . अहिल्यानगर यांच्या दि ४ ऑक्टोबर २०१८ च्या निवेदनानुसार शिक्षण संचालक (प्राथ) यांचा शालेय समिती एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव हा शालेय शिक्षण विभाग , मुंबई यांना ४ एप्रिल २०१९ रोजी सादर झाला होता . मात्र पूढे कोविड २०१९ च्या महामारीमूळे हा प्रस्ताव रखडला होता . अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने तत्कालीन महसूलमंत्री मा राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत निवेदन देऊन याबाबत शिफारस करण्याची विनंती केली होती . मा ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री ना दीपक केसरकर यांच्याकडे १०ऑक्टोबर २०२२ रोजी तशी शिफारस केली होती . मात्र मंत्रालयीन पातळीवरील प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षेतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता .तरीही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा मंत्रालय पातळीवरील पाठपुरावा अथकपणे चालूच होता*


🟩 *दरम्यान राज्याचे कर्तबगार शालेय शिक्षणमंत्री ना दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शिक्षक समन्वय संघटनांची जयहिंद कॉलेज ,मुंबई येथे ५ जानेवारी २०२५ रोजी बैठक घेऊन यामध्ये विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते . या आश्वासनामध्ये प्रामुख्याने शालेय स्तरावर अस्तित्वात असलेल्या विविध १५ समित्यांच्या क्लिष्ट कामामुळे मुख्याध्यापक व शिक्षक मेटाकुटीस आल्याची तक्रार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना यांचे बरोबरच अन्य संघटनांनी मांडली होती . त्याच अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथ)शरद गोसावी व शिक्षण संचालक ( माध्य) संपत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी राज्यातील विविध प्रशासकीय अधिकारी , मुख्याध्यापक व तज्ञ शिक्षक यांच्या राज्यस्तरीय १६ कमिटी सदस्यीय समिती स्थापन केली .या समितीने राज्यभरातील प्राथमिक ,माध्यमिक व खाजगी शाळांमधील शालेय स्तरांवर अस्तित्वात असलेल्या समित्यांचे सर्व शासकीय दस्तावेज व त्यांची  सर्व परिपत्रके , शासन निर्णय यांचा संयुक्तपणे अभ्यास करून कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाइन मॅरेथॉन बैठका घेऊन एक प्रारुप तयार करण्यात आले . सदर प्रारूप शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पातळीवरून शालेय शिक्षण विभाग , मुंबई यांना सादर करण्यास आले होते .*


 🟪 *शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव विजय भोसले यांनी याच अनुषंगाने शालेय स्तरावर चार समित्या व त्यांची नेमणूक , कार्यप्रणाली याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे .*


 🟣 *या शासन निर्णयामुळे शालेय स्तरावरील विविध प्रकारच्या समित्यांची संख्या कमी होऊन  आवश्यक तेवढ्याच कायद्यानुसार तयार झालेल्या फक्त चारच समित्या ठेवण्यात आल्या आहेत . त्यामुळे या १५ समित्याच्या बैठका घेणे , अजेंडा पाठविणे , इतिवृत्त ठेवणे या किचकट कामातून मुख्याध्यापक व शिक्षकांची बव्हंशी या अतिरिक्त कामातून मुक्तता मिळाल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे*


🔴 *या ऐतिहासिक शासन निर्णयाचे स्वागत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदास बस्वदे ,राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य कार्याध्यक्ष अण्णा आडे ,राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर ,राज्य सल्लागार प्रकाश दळवी ,सुरेश भावसार, विश्वनाथ सूर्यवंशी, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील ,राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे ,राज्य संघटक बाळासाहेब कदम ,राज्य महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला बोंडे ,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष  प्रदीप चक्रनारायण ,सुनील शिंदे विलास लवांडे ,सुधीर बोऱ्हाडे ,सुरेश नवले ,सुधीर रणदिवे ,दत्तात्रय परहर , रज्जाक सय्यद ,संदीप भालेराव, मधुकर डहाळे ,रामप्रसाद आव्हाड ,विष्णू बांगर,भाऊसाहेब घोरपडे ,ज्ञानदेव कराड,महेश लोखंडे,बाळासाहेब जाधव,सुनील दरंदले ,बजरंग बांदल,संदीप शेळके , बापूराव वावगे,राजकुमार शहाणे , शिवाजी ढाकणे,प्रकाश पटेकर ,पांडुरंग देवकर,नंदू गायकवाड,लक्ष्मण चेमटे,संतोष ठाणगे ,संजय शेळके,संदीप काळे , भारत शिरसाठ ,शहाजी जरे ,रवींद्र अनाप ,जनार्दन काळे,सुखदेव डेंगळे ,संभाजी तुपेरे,शिवाजी माने , पांडुरंग झरेकर ,प्रवीण शेळके , विनायक गोरे ,अनिता उदबत्ते , संगीता घोडके ,संगीता निमसे ,संगीता निगळे ,उज्वला घोरपडे ,मनीषा क्षेत्रे , सुरेखा बळीद यांनी केले आहे .*


🛑 *तालुकास्तर ते  देशपातळीवरील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवणारी व त्या समवेत संपूर्ण शासकीय दस्तावेज व शासन निर्णय व तत्संबंधी परिपत्रकाद्वारे प्रलंबित प्रश्न सोडविणारी राज्यातील एकमेव प्राथमिक शिक्षक संघटना*


 🔸 *आपला स्नेहांकित*🔸


      *(राजेंद्र निमसे)*

     *राज्य संयुक्तसचिव* 

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

तथा 


           *(संचालक )*

 *प्राथमिक शिक्षक:विकास मंडळ*

 *जिल्हा -अहिल्यानगर*

( ऐक्य मंडळ - अहिल्यानगर )

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

अखिल सांगली प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष निवड

 






*आज सांगली येथे मार्गदर्शक सदाशिवराव मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.देविदास बस्वदे,उपाध्यक्ष दिपक भुजबळ, माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, तुका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मोहीते पाटील सरांनी टिम अखिलचे मनस्वी स्वागत केले.*

*तदनंतर अखिल सांगली जिल्हा कार्यकारीणीची मोहीते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली   अखिल सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मुकूंद पंडीत तसेच सरचिटणीस पदी संतोष आंबे यांची निवड करण्यात आली.*यावेळी सदाशिव मोहीते,जिल्हानेते भानूदास चव्हाण, प्रकाश सुतार,प्रकाश कुचकर, सिद्राम मलमे यांची उपस्थिती होती*

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी अधिवेशन

  🌀🌀🌀🌀🌀🌀     माननीय नामदार पालकमंत्री उदयजी सामंत साहेब  यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनामध्ये आश्वासन द...