*चलो दिल्ली! चलो दिल्ली !!चलो दिल्ली!!!*
✊🏽🔰🔰🔰🔰🔰🔰✊🏽✊🏽
`🟣 अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त समिती काढणार संसदेवर मोर्चा*`
> नवीदिल्ली ः प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त मोर्चाच्या वतीने 5 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री बसवराज गुरीकर यांनी कळविले आहे.
*☸️सेवेतील शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा मुक्त करण्याचा निर्णय न्यायालयीन प्रकरणात देण्यात आलेला असून त्याचबरोबर शिक्षणाचे खाजगीकरण, कमी पटाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात येत असून गोरगरिबाचे शिक्षण यामुळे प्रभावित होत आहे या सर्व गोष्टीचा विचार करून देश पातळीवर काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येत संसद घेराव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*
*🌀यापूर्वी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली असून ती न्यायप्रविष्ठ आहे. तसेच २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे प्रातिनिधिक धरणे करून सरकारला इशारा दिला होता. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान व शिक्षणमंत्री यांना व लोकसभा व राज्यसभेचे सर्व सन्माननीय सदस्य यांना निवेदन देण्यात आले होते.संसदेत त्यावर चर्चा झाली असली तरी ठाम निर्णय शासनाने घेतलेला नाही.*
`🟣मागण्या :-`
*1.सेवेतील सर्व शिक्षकांना TET मधून सूट मिळावी*
*2.NPS/UPS रद्द करा - OPS लागू करा*
*3.NEP-2020 मागे घ्या*
*4.शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा*
*5.शाळांचे विलीनीकरण आणि कमी पटाच्या शाळा बंद करणे थांबवा*
*6.अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा.*
*7.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि किमान वेतन लागू करा.*
*8.आठव्या वेतन आयोगाची वेळेवर अंमलबजावणी*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*या शिक्षक हिताच्या प्रमुख मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिक्षक सदर मोर्चात उपस्थित राहातील या दृष्टीने प्रयत्न करावेत .व शिक्षकांच्या विराट शक्तीचे दर्शन घडवावे.*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
आपले विश्वासू-
*🔴श्री.देविदास बस्वदे*
*राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्याध्यक्ष*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
*🟤श्री.कल्याण लवांडे*
*राज्य सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
