Monday, March 10, 2025

संकलित मुल्यमापन चाचणी /PAT परिक्षा वेळापत्रकात बदल

 





 

संकलित मुल्यमापन चाचणी /PAT  परिक्षा वेळापत्रकात बदल करुन एप्रिल महिन्याच्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात परिक्षा  घेणेबाबत मा.शिक्षण आयुक्त व संचालक एनसीईआरटी यांना निवेदन देण्यात आले....


अखिल महाराष्ट्र  प्राथमिक शिक्षक बंघ

आंतरराष्ट्रीय महिलादिन व सुलभाताई ...







 *विनम्र  अभिवादन*

🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वरीष्ठ उपाध्यक्ष, तसेच वुमन नेटवर्क च्या चेअरपर्सन, सार्क टिचर फेडरेशनच्या कोषाध्यक्ष आदरणीय स्वर्गीय सुलभाताई दोंदे यांची आज ८मार्च रोजी जयंती......*


    *आंतरराष्ट्रीय महिलादिन व सुलभाताई यांचा जन्मदिन एकाच दिवशी.. हा नुसता योगायोगच नव्हता तर हजारो महिला आज शिक्षकांच्या चळवळीत ताईंच्या प्रेरणेने विविध पदे भुषवतात.... जो काळ संघटनेत चार दोन महिला भगीनी सक्रिय काम करत अशा काळात ताईंनी संघटन चळवळीत कामास सुरुवात केली.*

   *एक अतिशय अभ्यासू, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे व सर्वसामान्य शिक्षकाला अतिशय सन्मान व प्रेम देणा-या ताई म्हणून त्या केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातील शिक्षकांच्या ताई झाल्या...*

 *त्याग करीत राहिले की जीवनास मोल प्राप्त होते ही दोंदे घराण्याची शिकवण ताईंच्या अ़ंगवळणी पडली होती...*

*स्वतःची लढाई लढून त्यांनी स्वतः चं अस्तित्व तयार केलं होतं ....म्हणून पदं त्यांना कर्तृत्वावर मिळत गेली....आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संघटनेत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते....*

*भाई साहेबाच्या निधनानंतर आभाळभर दु:खातून त्या तितक्याच हिमतीने उभ्या राहिल्या ...कधी शौर्याची ढाल कधी उबदार शाल बनून शिक्षकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.....*

*अतिशय हळव्या , तितक्याच प्रेमळ, प्रसंगी तितक्याच कठोर अशा वेगवेगळ्या स्वभाव छटा त्याच्या व्यक्तीमत्वात होत्या म्हणून प्रत्येकाच्या मनात एक आदरयुक्त दरारा त्याच्या विषयी नेहमीच राहिला.*

   *आज आंतरराष्ट्रीय महिला दिन ताईंच्या अभिनंदना शिवाय साजरा करताना मनोमन दुःख होत आहे...*


* त्याच्या जयंतीनिमित्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व तमाम संघ सैनिकांकडूनविनम्र अभिवादन ....👏🏻👏🏻*

*तु नारी, तु घे भरारी* 

*व्यापुन टाक क्षितिजे सारी!* 


*प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*


💐💐💐💐💐💐💐


*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेची मा.शिक्षण आयुक्त व एससीईआर टी चे संचालक यांचे समवेत चर्चा

 






*🟠प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेची मा.शिक्षण आयुक्त व एससीईआर टी चे संचालक यांचे समवेत चर्चा...🔴*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*पुणे-प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांचे शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त मा.श्री.सचिंद्र प्रताप सिंह व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे संचालक मा.श्री.राहुल रेखावार साहेब यांचे समवेत दि.१०मार्च रोजी विविध विषयी चर्चा करून निवेदन दिले.्*


*🟡१)संचमान्यतेत अनेक पदवीधर पदे कमी होत असलेबाबत- संचमान्यतेच्या नवीन निकषाप्रमाणे विशेषतः ग्रामीण भागातील ६ते ८वर्गांना शिकवीणारे हजारो शिक्षकांची पदे अतिरिक्त होणार असून या वर्गाना शिक्षक न राहिल्याने वरचे वर्ग बंद होतील ही बाब निदर्शनास आणून दिली.*

*तसेच माध्यमिक शाळेला १०० विद्यार्थी संख्येवर मुख्याध्यापक पद आहे मात्र प्राथमिक शाळेला १५०ची अट आहे.*

*यावर मा.आयुक्त साहेब यांनी याबाबत विस्तृत अहवाल शिक्षण विभागास पाठवला जाईल व पदवीधर व मुख्याध्यापक पदास संरक्षण दिले जाईल असे सांगितले.मुख्याध्यापक पदाबाबत मी स्वतः आग्रहीआहे असे ते म्हणाले*

*२)आधार नसलेल्या विद्यार्थ्याबाबत-आधार नसलेले विद्यार्थी संचमान्यतेत ग्राह् धरणेबाबत-या विद्यार्थ्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात ल्या असून, ज्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड नाहीत त्यासाठी मुख्याध्यापक पत्रावर किंवा बोनाफाईडवर परवानगी द्यावी याबाबत विचार करु असेही यावेळी सांगितले.*

*🟠३)पदोन्नतीची प्रक्रिया वर्षातून दोनदा राबविण्याबाबत प्रत्येक जिल्ह्यास निर्देश देणे-राज्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची अनेक पदे रिक्त राहातात .याबाबत अनेक जिल्हा प्रशासन औदासिन्य दाखवले जाते.याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही परिणाम होतो. त्यामुळे पदोन्नती राबवावी.*

*याबाबत राज्याचा मुख्याध्यापक रीक्त पदाचा आढावा घेवून पत्र देण्यात येईल.केंद्रप्रमुख पदोन्नती न्यायालयीन पक्रीयेत आहे.त्याबाबत ही १०/१५ दिवसात धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे.*

*🔴४)परिक्षा १८एप्रिल पर्यंत घेणे-याबाबत१८,तारखेपर्यत घेणेबाबत चर्चा झाली .याबाबत बोलताना मा.रेखावार साहेब बोलताना म्हटले की, अनेक शाळा परीक्षेनंतर शाळांना सुट्टी देतात त्यामुळे विद्यार्थ्या अध्यापनाचे तास पुर्ण होत नाही.*

*याबाबत सकारात्मक मार्ग काढू असे शिक्षण आयुक्त साहेबांनी सांगितले.तसेच पेपर संपल्यानंतर त्या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी देवून उर्वरित वेळेत शिक्षकांनी परिक्षाविषयक कामे करावी अशी लेखी पत्र काढण्यात येईल असे सांगितले.*

*⏺️५)शिक्षक प्रश्नांसाठी संघटनांना अधिकृत वेळ-शिक्षकांच्या अडीअडचणी निराकरण करण्यासाठी दुसऱ्या शनिवारी दुपारी आँफलाइन बैठक व दुरवरच्या पदाधिकारी यांचेसाठी  व्हिसीद्वारे  संवाद साधला जाईल व प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन मा.शिक्षण आयुक्त यांनी दिले.*


*MDM ची अवास्तव माहिती दररोज भरावी लागत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या बाबत लवकरच सॉफ्टवेअर डेव्हलप करीत असून एका क्लिवर  माहिती भरली जाणार असून,दैनंदिन आँफलाइन माहिती भरावी लागणार नाही,त्यामुळे  शिक्षकांचा कामाचा ताण कमी करणार असल्याचे माननीय शिक्षण आयुक्तांनी सांगितले.*


*अतिशय सकारात्मक चर्चा झाली .गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघटना प्रशासनासोबत असून असरच्या बाबी आपण सर्व कृतीतून व शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे दाखवून देवू असे पदाधिकारी यांनी सांगितले.*


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*यावेळी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष माननीय केशवराव जाधव सरचिटणीस श्री राजेश सुर्वे, पदवीधर संघटनेचे सरचिटणीस मनोज मराठे, अखिल संघाचे सरचिटणीस श्री.कल्याण लवांडे आदि उपस्थित होते. .*

संकलित मुल्यमापन चाचणी /PAT परिक्षा वेळापत्रकात बदल

    संकलित मुल्यमापन चाचणी /PAT  परिक्षा वेळापत्रकात बदल करुन एप्रिल महिन्याच्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात परिक्षा  घेणेबाबत मा.शिक्षण आयुक्...